Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Dhapewada Yatra: विदर्भाचे पंढरपूर धापेवाडा येथे भरते भव्य यात्रा, शेती साहित्याची होते सर्वाधिक विक्री

Pandharpur Wari 2023

Pandharpur Wari 2023: विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दरवर्षी एकादशी व आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला मोठी यात्रा असते. त्या यात्रेबाबत विशेष माहिती जाणून घेऊया.

Pandharpur Wari 2023 : प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूर जाण्याची ओढ लागलेली असते. पंढरपूर वारीसाठी अनेक वारकरी तहान भूक विसरतात. पण, अनेकवेळा काही कारणास्तव वारकऱ्यांना पंढरपूर जाण्यास अडचणी येतात. मग त्यांची निराशा होते. पण, आता त्यांना निराश होण्याचे कारण नाही. कारण विदर्भात सुद्धा एक पंढरपूर आहे. विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात दरवर्षी एकादशी व आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला मोठी यात्रा असते. 

अनेक वर्षापूर्वी धापेवाडा येथे विठ्ठलाचे भक्त श्रीसंत कोलबाजी महाराज होऊन गेले. महाराजांनी त्या काळी अनेक वर्षे पंढरपूरची वारी केली. त्यानंतर वृद्धापकाळाने महाराज पंढरपूरला जाऊ शकत नव्हते. कोलबाजी महाराज विठुरायाचे निस्सीम भक्त होते. त्यांनी विठ्ठलाचा धावा केला त्यामुळे स्वत: त्यांच्या स्वप्नात येऊन पांडुरंगाने त्यांना दृष्टान्त दिला. धापेवाडास्थित चंद्रभागेच्या काठावर असलेल्या विहिरीत पहाटे ‘मी तुला दर्शन देईल’ असे सांगितले. श्रीसंत कोलबाजी महाराज त्या पहाटे विहिरीत गेल्यानंतर त्यांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन झाले. 

Dhapewada Yatra, Vidarbha Prati Pandharpur
विदर्भातील पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धापेवाडामधील मागील वर्षीच्या यात्रेतील दृश्य.

कोलबाजी महाराज यांनी विठ्ठलासमोर विनवणी केली की, देवा तुझ्या दर्शनासाठी इतक्या दूर येण्यास येथील काही भाविकांना अडचणी येतात, काहींची परिस्थिती तशी नाही. तेव्हा तू इथेच थांब. तेव्हा स्वयंभू विठ्ठलमूर्तीच्या रूपात श्री हरी प्रगट झाले. तेव्हापासून तिथे विठ्ठलमूर्तीची स्थापना करण्यात आली. आजही गेल्या 283 वर्षांपासून आषाढी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साक्षात विठ्ठल धापेवाड्यात दाखल होत असतात, अशी आख्यायिका आहे. तेव्हापासून दरवर्षी आषाढी पौर्णिमेला भक्तांना दर्शन देतात.

लोकवर्गणीतून साजरा केला जातो लाखों लोकांचा  सोहळा 

आषाढी पौर्णिमेला धापेवाडा येथे लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यासर्व भाविकांच्या व्यवस्थेसाठी लागणारा खर्च हा लोक वर्गणीतून केला जातो. या ठिकाणी यात्रेसाठी फक्त विदर्भातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि लागून असलेल्या इतर राज्यातूनही भाविक येतात. भाविकांसाठी करण्यात येणारी संपूर्ण सोय ही गावकरी मंडळींच्या सहकार्यातून होते. सर्व सेवाकरी विनामुल्य सेवा देतात. धापेवाडा येथीलच भाविक नाही तर संपूर्ण विदर्भातील भाविक या मंदिराला वर्गणी देतात. वर्गणी फक्त पैशाच्या स्वरूपात नाही तर इतर म्हणजेच अन्नधान्य, मंदिरासाठी लागणाऱ्या इतर सुविधा देतात. तेथील पुजारी आणि इतर मंडळींशी 'महामनी'ने चर्चा केली असता ते सांगतात की, लाखों लोकांच्या सहकार्यानेच आम्ही हा सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो.

यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातीलच नाही तर इतर राज्यातूनही व्यवसायिक येतात

तेथील एका छोट्या व्यवसायिकाशी 'महामनी'ने चर्चा केली असता ते सांगतात की, काही व्यवसायिक येथे बाराही महीने आपला व्यवसाय चालवतात. पण, बरचसे व्यावसायिक फक्त यात्रेच्या वेळी येथे आपली दुकाने  लावतात. इतर राज्यात ज्या वस्तु फेमस आहेत त्याचे व्यवसायिक यात्रेमध्ये येतात. बाजारात ज्याप्रमाणे सर्वच वस्तु उपलब्ध असतात त्याचप्रमाणे येथील यात्रेमध्ये सुद्धा सर्वच जीवनावश्यक वस्तु, शोभेच्या वस्तु उपलब्ध असतात. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातून येथे व्यवसायिक येतात. नागपूर, अमरावती, चंद्रपूर, अकोला, वर्धा, बुलढाणा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, वाशिम, आणि गडचिरोली या जिल्ह्यातील सर्व फेमस असलेल्या वस्तु येथील यात्रेमध्ये विक्रीसाठी येतात. हे सर्व व्यवसायिक येथे जमले असतांना या यात्रेमध्ये लाखों रुपयांची उलाढाल होते.

internal-image-11.jpg

काही व्यवसायिक असे असतात, जे फक्त यात्रा करतात म्हणजेच विदर्भात कुठेही यात्रा असो ते त्यांचे दुकान तेथे लावतात. एका छोट्या व्यवसायिकाचे इन्कम हे पूर्णतः यात्रेमध्ये असलेल्या लोकांवर अवलंबून असते. जितके जास्त लोकं तितके जास्त इन्कम होते. या यात्रेचा सर्वाधिक फायदा हा लहान मुलांच्या वस्तु विकणाऱ्या व्यावसायिकाला आणि पूजेचे साहित्य विकणाऱ्या व्यावसायिकाला होतो.

शेती साहित्यासाठी ‘ही’ यात्रा प्रसिद्ध आहे

धापेवाडा या गावात यात्रा गेली कित्येक वर्षापासून सुरू आहे. यात अनेक बदल घडून आले. सुरवातीला या मंदिराचा इतका प्रसार झाला नव्हता, पण आता जसजसा प्रसार झाला तशी भाविकांची गर्दी वाढू लागली. गर्दी वाढली तशीच व्यवसायिकांची गर्दी सुद्धा वाढली. काही वर्षाआधी शेतीसाठी लागणारे साहित्य या यात्रेतून भरपूर विकले जात होते. विदर्भात शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त असल्याने शेतकरी शेतीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर खरेदी करत होते. ही यात्रा पेरणीच्या वेळेत येत असल्याने शेतकऱ्यांना यातून खूप फायदा होत होता.

परंतु कालांतराने, अनेक बदल घडून आले आणि आता शोभेच्या वस्तु यात्रेतून जास्तीत जास्त विकल्या जातात. विदर्भातील लोकांचे पंढरपूर असल्याने तुळशीच्या माळा, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती भाविक येथून आवडीने घेऊन जातात. विदर्भातील लोकांना पंढरपूर दूर पडत होते, त्यात सोईसुविधा फार कमी असल्याने भाविक पंढरपूरला जाऊ शकत नव्हते त्यामुळे श्रीहरी भक्तांना धापेवाडा येथेच आषाढी आषाढी पौर्णिमा प्रतिपदेला दर्शन देत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे विदर्भातील लोकांना पंढरपूर न जाता प्रति पंढरपूर धापेवाडा येथेच विठ्ठलाचे दर्शन घेता येते.

धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर म्हणजेच प्रति पंढरपूर 

दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशीला अनेक वारकरी पंढरपूरची वारी करतात. काही भाविक पायदळ वारी करतात तर काही भाविक थेट दर्शनासाठी ट्रेन, बस, स्वतःच्या गाडीने प्रवास करतात. पण, अजूनही असे अनेक भाविक आहेत ज्यांची पंढरपूर वारीची इच्छा अपूर्ण आहे. त्या भाविकांसाठी विदर्भातील धापेवाडा येथील स्वयंभू विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर म्हणजेच प्रति पंढरपूरच आहे.

internal-image-10.jpg
विदर्भाचे पंढरपूर 

धापेवाडा हे गाव नागपूरवरुन 22 किलोमीटर आहे. तेथे जाण्यासाठी तुम्हाला कमीत कमी खर्च येतो. विदर्भातील कोणत्याही कोपऱ्यातून तेथे पोहचण्यासाठी 1000 रुपयांच्यावर पैसे लागणार नाहीत. कमीत कमी खर्चात तुम्ही प्रति पंढरपूरचे दर्शन घेऊ शकता. प्रतिपंढरपूरचे दर्शन घेण्यासाठी विदर्भात विशेष बसेस चालवल्या जातात. संपूर्ण विदर्भात मागील वर्षी 47 एक्स्ट्रा बसेस चालू करण्यात आल्या होत्या. या वर्षी सुद्धा शासनाकडून याबाबत असाच निर्णय घेण्याची शक्यता आहे.