Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Health Insurance Fraud : आरोग्य विमा असूनही लाखो रुपये का भरावे लागतात? 'हॉस्पिटल स्कॅम' पासून कुटुंबाला असे वाचवा

Health Insurance Fraud

Health Insurance Fraud : 50 लाखांचा आरोग्य विमा असूनही उपचाराचे बिल का भरावे लागते? 'हॉस्पिटल स्कॅम', 'रीझनेबल ॲन्ड कस्टमरी क्लॉज' आणि आर्थिक फसवणूक टाळण्याचे 3 सोपे उपाय.

तुमच्याकडे 50 लाख रुपयांचा आरोग्य विमा (Health Insurance) असला तरी, रुग्णालयाचे बिल (Hospital Bill) स्वतःच्या खिशातून भरावे लागण्याची शक्यता असते. आरोग्य विमा कंपन्या (Insurance Companies) आणि काही रुग्णालये यांच्या कार्यपद्धतीत एक अशी त्रुटी आहे, ज्यामुळे ग्राहक आर्थिक संकटात सापडतात. या जाळ्याला 'हॉस्पिटल स्कॅम' (Hospital Scam) म्हणून ओळखले जाते.

स्कॅमचे जाळे कसे काम करते:

बिलात वाढ: जेव्हा हॉस्पिटलला कळते की तुमच्याकडे 50 लाख रुपयांची मोठी पॉलिसी (Policy) आहे, तेव्हा ते उपचाराचे बिल वाढवतात. समजा, एखाद्या उपचाराचा वाजवी खर्च 4 लाख रुपये असेल, तर हॉस्पिटल ते बिल 7 लाख रुपये करते. विमा असल्यामुळे तुम्ही काळजी न करता क्लेम (Claim) दाखल करता.

विमा कंपनीचा नियम: यानंतर विमा कंपनी 'रीझनेबल ॲन्ड कस्टमरी क्लॉज' (Reasonable And Customary Clause) नावाचा एक गुप्त नियम वापरते. कंपनीच्या मते, 7 लाख रुपयांचे बिल 'अवाजवी' असते आणि ते फक्त 4 लाख रुपये, म्हणजेच 'नियमांनुसारचा दर' देण्यास सहमत होतात.

रुग्ण गोत्यात: आता हॉस्पिटल त्यांच्या 7 लाखांच्या बिलावर ठाम राहते आणि विमा कंपनी 4 लाखांपेक्षा जास्त देत नाही. परिणामी, 3 लाख रुपयांची मोठी रक्कम भरण्याची जबाबदारी तुमच्यावर येते. या परिस्थितीत, रुग्ण थकलेला असल्याने तो लढण्याऐवजी पैसे भरतो, याच गोष्टीचा फायदा घेतला जातो.

या फसवणुकीचा सामना करण्यासाठी 3 महत्त्वाचे उपाय:

उपचारापूर्वी तुलना: कोणतीही मोठी शस्त्रक्रिया  किंवा नियोजित उपचार करण्यापूर्वी, तुमच्या विमा कंपनीकडे 'रेट चार्ट' (Rate Chart) मागा. त्यानंतर वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या खर्चाची तुलना करा आणि वाजवी दरात उपचार देणाऱ्या हॉस्पिटलची निवड करा.

दावा फेटाळल्यास 'अपील' करा: जर तुमचा आरोग्य विम्याचा दावा फेटाळला गेला, तर निराश होऊ नका. तुमच्या डॉक्टरांकडून प्रत्येक शुल्काचे लिखित स्पष्टीकरण (Written Justification) मागा. हे स्पष्टीकरण विमा कंपनीकडे 'अपील' म्हणून सादर करा. हा उपाय कुटुंबाला आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवतो.

पॉलिसीची माहिती: तुमच्या पॉलिसीमध्ये 'रीझनेबल ॲन्ड कस्टमरी' क्लॉजचा उल्लेख कसा केला आहे आणि त्याचे नियम काय आहेत, हे उपचारापूर्वीच समजून घ्या.

स्कॅमपासून वाचण्यासाठी काही अतिरिक्त सुरक्षा टिप्स:

नेटवर्क हॉस्पिटलला प्राधान्य: शक्य असल्यास, विमा कंपनीच्या 'नेटवर्क' मध्ये समाविष्ट असलेल्या हॉस्पिटल्समध्येच उपचार घ्या. या हॉस्पिटल्समध्ये दर आधीच निश्चित केलेले असतात, त्यामुळे बिलात फुगवट होण्याची शक्यता कमी होते.

दैनंदिन बिलाची तपासणी: हॉस्पिटमध्ये भरती असताना दररोजचे बेड चार्जेस, औषधे आणि सेवांचे बिल नियमितपणे तपासा.

कागदपत्रे जतन करा: उपचारादरम्यान दिलेली सर्व मूळ कागदपत्रे, पावत्या आणि वैद्यकीय अहवाल अत्यंत काळजीपूर्वक जपून ठेवा. फसवणुकीविरुद्ध लढण्यासाठी हे दस्तऐवज तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहेत.