Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pandharpur Wari 2023: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी विदर्भातून धावणार विशेष ट्रेन

Vidarbha to Pandharpur Special Train

Vidarbha to Pandharpur Trains : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मागणीवरून रेल्वे मंत्रालयाने आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया, त्या विशेष ट्रेन कोणत्या?

Vidarbha to Pandharpur Special Train : विठ्ठल भक्तांसाठी पंढरपूर वारी म्हणजे जणू स्वर्ग सुखंच असते. वारकरी वर्षभरातून 2 वेळा पंढरपूरची वारी करतात. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला वारकरी पंढरपूरला जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी पंढरपूर वारीसाठी तळमळत असतात. हीच गोष्ट लक्षात घेता, केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी विदर्भातून विशेष गाड्या सुरू करण्यासाठी विनंती केली होती. 

विदर्भातील भाविकांची विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी

यांच्या मागणीला  रेल्वे मंत्रालयाने तात्काळ प्रतिसाद देत विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पंढरपूरला जाणाऱ्या विदर्भातील लाखो भाविकांची खूप मोठी मदत झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी पंढरपूरला जातात. यामध्ये विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, अकोला येथील वारकऱ्यांचा देखील समावेश आहे.

 या वर्षी 29 जूनला आषाढी एकादशी आहे. विठ्ठल फक्त 24 जूननंतर पंढरपूरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करणार आहे. विदर्भातून पंढरपूर जाण्यासाठी फक्त 1 गाडी उपलब्ध आहे. ज्याची बुकिंग आधीच पूर्ण झाली आहे. त्यामुळे अनेक वारकऱ्यांना विठ्ठलाच्या दर्शनाला मुकावे लागले असते. विठूरायाच्या दर्शनासाठी व्याकूळ असलेल्या विदर्भातील भाविकांची विशेष गाड्या सुरू करण्याची मागणी होती. विदर्भात रुखमिनीचे माहेर कौंढण्यपूर येथूनही अनेक भाविक पंढरपूरच्या वारीसाठी निघतात.

विदर्भातून पंढरपूरसाठी विशेष गाड्या

विदर्भातून पंढरपूरसाठी नेहमी सुरू असणारी ट्रेन (NGP KOP EXPRESS 11403) ही आहे. आठवड्यातून 2 दिवस म्हणजेच मंगळवार आणि शनिवार ट्रेन सुरू असते. ही ट्रेन नागपूर, वर्धा, बडनेरा आणि विदर्भातील आणखी काही ठिकाणहून जाते. त्याचबरोबर (NAVI PVR SPL 01119) ही पंढरपूर वारीसाठी विशेष ट्रेन आहे. आठवड्यातील दोन दिवस बुधवार आणि रविवारी ही ट्रेन सुरू असणार आहे. 

विशेष म्हणजे 25 जून पासूनच ही ट्रेन धावणार आहे. (NGP MRJ SPL 01205) ही ट्रेन सुद्धा विदर्भातून पंढरपूरसाठी असणार आहे. ही ट्रेन सुद्धा बुधवार आणि रविवार या 2 दिवशी धावणार आहे. या दोन्ही ट्रेनच्या बुकिंग अजून सुरू झालेल्या नाही. नेहमी धावणारी (NGP KOP EXPRESS 11403) ची स्लिपर क्लासची तिकीट 375 रुपये आहे. 3A ची तिकीट 1010 रुपये आणि 2A ची तिकीट 1440 रुपये आहे. ही सर्व माहिती IRCTC च्या app वरून घेतलेली आहे.