Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pandharpur Wari 2023: लाखो वारकऱ्यांना विमा संरक्षण; राज्य सरकारकडून मोठी घोषणा

Maharashtra Govt provide insurance to all Varkari's

Pandharpur Wari 2023: पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सरकारतर्फे विमा (इन्शुरन्स) संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना घोषित केली. हे विमा संरक्षण 30 दिवसांसाठी लागू असणार आहे. ही योजना मदत व पुननर्वसन विभागातर्फे राबविण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सरकारतर्फे विमा (इन्शुरन्स) संरक्षण देणारी 'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र' योजना घोषित केली. हे विमा संरक्षण 30 दिवसांसाठी लागू असणार आहे. ही योजना मदत व पुननर्वसन विभागातर्फे राबविण्यात येत आहे.

'विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र’ योजना

  • वारीच्या दरम्यान एखाद्या वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कुटुंबियांना 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान.
  • वारीतील दुर्घटनेत कायमचे अपंगत्व किंवा विकलांगता आल्यास 1 लाख रुपये मदत.
  • अंशत: अपंगत्व आल्यास 50 हजार रुपयांची मदत.
  • वारीच्या दरम्यान आजारी पडल्यास औषधोपचारासाठी 35 हजार रुपयापर्यंतचा खर्च देणार.


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे लाखो वारकऱ्यांना सरकारच्या खर्चातून विमा संरक्षण मिळणार आहे. वारीच्या दरम्यान अनेक अपघात किंवा दुर्घटना होत असतात. त्यात बरेच वारकरी जखमी होतात. तर काहींचा दुर्देवी मृत्यू होतो. अशा वारकऱ्यांच्या कुटुंबियांना आता सरकारकडून विमा संरक्षणाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.