Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Industry: EV उद्योगांना प्राधान्याने कर्जपुरवठा होणार का? PSL कर्जपुरवठा म्हणजे काय?

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांचा प्राधान्यक्रम कर्ज पुरवठा (PSL) क्षेत्रात समावेश करण्याबाबत सरकार विचार करत आहे. तसा प्रस्ताव सरकारकडे आला आहे. EV उद्योगांना निधीची कमतरता भासू नये, यासाठी या क्षेत्रातील कंपन्यांनी तशी मागणी केली आहे. PLS म्हणजे काय? बँकांना किती कर्ज द्यावे लागेल, जाणून घ्या.

Read More

E-Vehicle : FAME-2 सबसिडीच्या कपातीमुळे आलेल्या मंदीनंतर इलेक्ट्रिक दुचाकीच्या विक्रीत पुन्हा तेजी

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या VAHAN पोर्टलच्या आकडेवारीनुसार, जुलैच्या पहिल्या 17 दिवसात ई-दुचाकी वाहनांची सरासरी दैनंदिन विक्री 1,702 युनिट्सपर्यंत वाढली आहे. तर जूनमध्ये सरासरी 852 युनिट्सची विक्री झाली होती. थोडक्यात 1 जुलै ते 17 जुलै या कालावधीत एकूण 28,937 ई-वाहनांची विक्री झाली आहे. तर जूनमध्ये एकूण 14,499 इ-वाहनांची विक्री झाली होती.

Read More

BYD EV in India : चीनच्या BYD इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपनीचा भारतात 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव

चीन मधील BYD(Build Your Dreams)या वाहन निर्मात्या कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी उत्पादन करण्यासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. ही गुंतवणूक स्थानिक कंपनीच्या भागीदारीत केली जाईल

Read More

Battery swapping policy: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी बदलून घेण्याच्या पॉलिसीला कंपन्यांचा विरोध

इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी चार्जिंग स्टेशनवरुन बॅटरी बदलून घेण्याची संकल्पना केंद्र सरकारने आणली होती. मात्र, या संकल्पनेस बॅटरी आणि वाहन निर्मिती कंपन्यांनी विरोध केला आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यास 30 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ लागतो. बॅटरी बदलून घेण्याची व्यवस्था उभी राहील तर चालकांना वाट पाहत बसण्याची गरज नाही.

Read More

EV charging Station: इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरु करा आणि कमवा लाखो रुपये…

जसे पेट्रोल-डीझेलवर इतर वाहने चालतात तशीच इलेक्ट्रीकल वाहने चार्जिंग करून वापरली जातात. यासाठी तुमच्याकडे नियमित विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या, विशेषतः कारच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत असताना चार्जिग स्टेशनची उपलब्धता हा देखील सध्या महत्वाचा मुद्दा बनला आहे.

Read More

EV incentives to Employee: इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी 'या' कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळतेय आर्थिक मदत

कॉर्पोरेट कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. एल अँड टी, वेदांता आणि मेक माय ट्रीप या कंपन्यांनी अशा पर्यावरण पूरक धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे. भविष्यात आणखी कंपन्या कर्मचाऱ्यांना इव्ही खरेदीसाठी इंसेंटिव्ह देतील, असे डेलॉइट या कंपनीने केलेल्या रिसर्चमध्ये म्हटले आहे.

Read More

Moody's report on EV: इलेक्ट्रिक वाहनांची भारत बनेल मोठी बाजारपेठ, 'मुडी'चा अहवाल

Electric Vehicles in India: जागतिक स्तरावर वाहनांच्या बाजारपेठेत भारताचा चौथा क्रमांक लागतो. असे असले तरी इलेक्ट्रिक वाहनांचा टक्का केवळ 1% इतका आहे. भारतीय वाहन बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहने अगदीच सुरुवातीच्या टप्प्यावर आहेत. परंतु इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता 2030 पर्यंत भारत जगातील महत्वाची वाहन बाजारपेठ बनू शकते असेही या अहवालात म्हटले आहे.

Read More

इलेक्ट्रिक दुचाकींची वाढ सुसाट! 2030 पर्यंत तब्बल 2 कोटी 20 लाख गाड्या दिसणार रस्त्यावर

भारतामध्ये येत्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेलचा वाढता खर्च तसेच वाहन देखभालीच्या खर्चामध्ये वाढ होत असल्याने ग्राहकांची पसंती इलेक्ट्रिकल टु व्हिलरला राहील, असे या अहवालात म्हटले आहे.

Read More

Union Budget 2023: EV कार होईल स्वस्त; भारतीय वाहन उद्योगावर अर्थसंकल्पाचे 'हे' होतील परिणाम

Auto Sector Budget 2023: भारताच्या अर्थमंत्री, निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर केला ज्यात ग्रीन एनर्जी (Green Energy) आणि इलेक्ट्रिक वाहने जनतेला परवडणारी बनविण्यावर भर दिला गेला. विशेष म्हणजे, सरकारने नवीन व्यक्तिगत कर (Personal Income Tax) धोरणानुसार उत्पन्न मर्यादा 5 लाखांवरून 7 लाख रुपये केली आहे.

Read More

Budget 2023 Update: इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी उत्पादनाला चालना मिळण्यासाठी लिथियम-आयन बॅटरीवरील कस्टम ड्युटीत कपात

Budget 2023 Update: लिथियम आयन बॅटरी आणि बॅटरी बनवण्याच्या कच्च्या मालावरील कस्टम ड्युटी कमी केली आहे. यामुळे भारतात लिथियम आयन बॅटरीच्या उत्पादनाला चालना मिळेल. त्याचबरोबर इलेक्ट्रिक वाहने स्वस्त होतील. कस्टम ड्युटीवरील ही कपात एका वर्षासाठी असणार आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढेल आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडेल.

Read More

Economic Survey 2023 : ईव्ही उद्योग 5 कोटी रोजगार निर्माण करेल

आर्थिक सर्वेक्षण 2023 (Economic Survey 2023) मांडण्यात आला आहे. अनेक संकटं असतानाही औद्योगिक क्षेत्राने चांगली कामगिरी केल्याचे या सर्वेक्षणात म्हटले आहे. औद्योगिक क्षेत्राविषयी आणखी काय म्हटले आहे? ते पाहूया.

Read More

Toyota CEO Resign's : EV कार निर्माता म्हणून टेस्लाचे वर्चस्व, हा धोका लक्षात घेऊन टोयोटा कंपनीच्या सीईओंचा राजीनामा

Toyota CEO Resigns : टोयोटा कंपनीचे माजी सीईओ टोयोडा ( Toyota Ex CEO Toyoda) यांनी राजीनामा दिला आहे.कंपनीचे भविष्यातील EV संदर्भातील धोरण टोयोडा यांना मान्य नाही. त्यामुळे त्यांनी सीईओ पदाचा कार्यभार सोडला. कंपनीचे माजी ब्रँडींग अधिकारी किजो सातो (Kijo Sato) यांची सीईओ पदावर नेमणूक करण्यात आली आहे.

Read More