Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV charging Station: इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरु करा आणि कमवा लाखो रुपये…

EV charging Station

जसे पेट्रोल-डीझेलवर इतर वाहने चालतात तशीच इलेक्ट्रीकल वाहने चार्जिंग करून वापरली जातात. यासाठी तुमच्याकडे नियमित विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या, विशेषतः कारच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत असताना चार्जिग स्टेशनची उपलब्धता हा देखील सध्या महत्वाचा मुद्दा बनला आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ दिवसेंदिवस वाढते आहे. झिरो कार्बन इमिशनचा संकल्प भारताने केला असून 2070 पर्यंत भारतात शून्य कार्बन उत्सर्जन होईल यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून भारत सरकार इलेक्ट्रीकल वाहनांच्या खरेदीसाठी ग्राहकांना प्रोत्साहन देत आहे. इलेक्ट्रीकल वाहनांच्या खरेदीवर सरकारतर्फे सबसिडी देखील दिली जात आहे. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रीकल वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होणार आहे. एवढेच नाही तर दिवसेंदिवस पेट्रोल डीझेलचे भाव वाढतच चालले आहेत. त्यामुळे देखील नागरिक इलेक्ट्रीकल वाहनांना पसंती देताना दिसत आहेत.

इलेक्ट्रीकल वाहने चालतात चार्जिंगवर…

जसे पेट्रोल-डीझेलवर इतर वाहने चालतात तशीच इलेक्ट्रीकल वाहने चार्जिंग करून वापरली जातात. यासाठी तुमच्याकडे नियमित विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या, विशेषतः कारच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत असताना चार्जिग स्टेशनची उपलब्धता हा देखील सध्या महत्वाचा मुद्दा बनला आहे. रस्त्यात कुठे जर चार्जिंग संपली तर वाहन चार्ज कुठे करावे असा प्रश्न साहजिकच कार मालकाला पडू शकतो. पेट्रोल पंप ज्यापद्धतीने रस्त्या-रस्त्यावर उपलब्ध आहेत, तसे चार्जिंग स्टेशन अजूनही उपलब्ध नाहीत. त्यामुळे येत्या काळात इलेक्ट्रीकल वाहनांसाठी चार्जिंग स्टेशनची गरज भासणार आहे हे काही वेगळे सांगायला नको.

अशा परिस्थितीत, जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल जो कमी खर्चात सुरू करता येईल आणि ज्यामध्ये कमाई देखील चांगली असेल, तर इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो हे लक्षात घ्या. चार्जिंग स्टेशन सुरु करून तुम्ही दरमहा लाखो रुपये सहज कमवू शकता.

चार्जिंग स्टेशनसाठी अर्ज कसा कराल?

तुम्ही चार्जिंग स्टेशनसाठी दोन प्रकारे अर्ज करू शकता. पहिले म्हणजे, तुम्ही राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक विभागाकडे यासाठी अर्ज करू शकता. त्यांच्या परवानगीने तुम्ही तुमच्या जागेवर चार्जिंग स्टेशनचा सेटअप उभा करू शकता. यासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि वाहतूक विभाग तुम्हांला मदत करेल.

तसेच सध्या टाटा कंपनी त्यांच्या इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनची देशभरात फ्रेंचायझी देखील देत आहे.त्यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. Tata Power च्या अधिकृत वेबसाईटवर जाणून तुम्ही अर्ज करू शकता.

काय आहेत नियम व अटी?

  • इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी, तुमच्याकडे 50 ते 100 स्क्वेअर यार्डचा रिकामा प्लॉट असणे आवश्यक आहे. हा प्लॉट एकतर तुमच्या नावावर असायला हवा किंवा जर तुम्ही तो भाडेतत्त्वावर घेतला असेल तर किमान 10 वर्षांचा त्यासाठी करार झालेला असावा. 
  • तुमच्या जागेवर तुम्ही चार्जिंग स्टेशन सुरु करण्याचा विचार करत आहात, तिथे 24 तास विद्युत पुरवठा असायला हवा. 
  • तसेच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी तुम्हाला तुमच्या परिसरातील वन विभाग, अग्निशमन विभाग आणि महानगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. 
  • चार्जिंग स्टेशनवर गाड्यांची पार्किंग आणि येण्या-जाण्याची योग्य व्यवस्था असावी.
  • यासोबतच चार्जिंग स्टेशनमध्ये पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह, विश्रामगृह, अग्निशमन यंत्रणा, हवेची सुविधा या मूलभूत सुविधा असणे आवश्यक आहे.

किती खर्च येईल?

ईव्ही चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासाठी तुम्हांला सुरुवातीला किमान 20 लाख रुपये खर्च येईल. चार्जिंग क्षमता वाढविल्यास, सेटअपची किंमत देखील वाढते हे लक्षात ठेवा. यात कंपनीसोबतचा करार, मशीन, तंत्रज्ञान अडी गोष्टींचा समावेश आहे.

किती कमाई होईल?

तुम्ही 3000 kW चे चार्जिंग स्टेशन सेटअप केल्यास, तुम्ही प्रति kW  2.5 रुपये कमवाल. दिवसाला सरासरी  तुम्ही 7500 रुपये कमवू शकाल. तुमच्या चार्जिंग स्टेशनवर दिवसाला किती गाड्या चार्जिंगसाठी येतात आणी किती चार्ज करतात यानुसार हे गणित मागेपुढे होऊ शकते. पूर्ण क्षमतेने चार्जिंग केल्यास  7500 रुपये दिवसाच्या हिशोबाने महिन्याचे 2.25 लाख रुपये तुम्ही कमवू शकता. चार्जिग स्टेशनची देखभाल करण्यासाठी तुम्हाला कर्मचाऱ्यांची देखील गरज भासणार आहे. स्टेशन सुपरवायझर,तंत्रज्ञ, शिपाई या सगळ्यांच्या महिन्याचा पगार लक्षात घेता तुम्ही महिन्याला किमान 1.25 लाख रुपये कमवू शकता.