टोयोटा कंपनीचे माजी सीईओ अकीओ टोयोडा (Ex CEO Akio Toyoda) यांच्या कारकिर्दीत कंपनी मोठ्या प्रमाणात यशस्वी झाली.एकेकाळी टोयोटा सर्वाधिक विकली जाणारी कार होती मात्र 2020मध्ये टेस्लाने बाजारमूल्यात टोयोटाला मागे टाकले.एलोन मस्क यांच्या विस्तारवादी भूमिकेमुळे हे शक्य झाले आहे. टोयोडा यांनी सांगितले की "टोयोटा मध्ये बदल घडवून आणण्यासाठी मी या निर्णयावर पोहोचलो आहे.नवीन अध्यक्षांना (CEO) पाठिंबा देणे हे माझे कर्तव्य आहे.
2030 पर्यंत 30 मॉडेल्स लॉंच करण्याचे टोयोटाचे लक्ष्य
टोयोटा 2030 पर्यंत 30 EV मॉडेल्स आणण्यासाठी भविष्यात 31 बिलियन अमेरिकन डॉलर्स (31$) खर्च करणार आहे. यावेळी या समूहाचे माझी सीईओ टोयोडा यांनी विरोध केला. त्यांच्या मते लोक गतीने पेट्रोल-डिजेल वाहने सोडून इलेक्ट्रिक किंवा इतर इंधनवरील वाहनांकडे आकर्षित होतील का? ही शंका आहे कंपनीचा हा निर्णय न स्वीकारमुळे टोयोडा यांनी राजीनामा दिला.टोयोडा यांनी राजीनामा दिल्यामुळे माजी ब्रँडींग मुख्य अधिकारी किजो सातो यांनी पदभार स्वीकारला.
टोयोटाचे नवीन सीईओ किजो सातो यांची कारकीर्द
वासेडा विद्यापीठातून मॅकेनिकल अभियंता झाल्यानंतर1992साली सातो यांनी टोयोटा जॉइन केले.2016च्या सुरुवातीस त्यांची लेक्सस इंटरनॅशनलचे मुख्य अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि पुढील वर्षी ते टोयोटाचे प्रमुख अधिकारी झाले. यानंतर जानेवारी त्यांनी टोयोटाचे मुख्य ब्रँडींग अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. टोयोडा पायउतार झाल्यानंतर सातो हे उत्तम प्रकारे व्यवस्थापन सांभाळतील अशी खात्री आहे.
वयाच्या 66व्या वर्षी टोयोडा यांनी सीईओ पद सोडले. कंपनी आपला उत्तराधिकारी शोधतेय याची कल्पना टोयोडा यांनी मिळाली होती