भारत इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात एक मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येत आहे. भारतात अनेक परदेशी कंपन्या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच चीन मधील BYD(Build Your Dreams)या वाहन निर्मात्या कंपनीने भारतात इलेक्ट्रिक वाहने आणि बॅटरी उत्पादन करण्यासाठी 1 अब्ज डॉलर गुंतवणुकीचा प्रस्ताव दिला आहे. ही गुंतवणूक स्थानिक कंपनीच्या भागीदारीत केली जाणार आहे. तसेच या गुंतवणुकीमुळे त्यामुळे अनेक नोकऱ्या निर्माण होतील, अशी माहिती रॉयटर्सने दिली आहे.
कंपनीची भारतातील पहिली ई-कार
भारतात BYD ही कंपनी वाहननिर्मिती क्षेत्रात यापूर्वीपासून कार्यरत आहेत. भारतात या कंपनीच्या सध्या Atto-3 (E-SUV आणि E6 सेडान कार मार्केटमध्ये उपलब्ध आहे. दरम्यान, 2023 मध्ये कंपनी भारतातील कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेत गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. भारत सरकारने 2030 पर्यंत 30 टक्के इलेक्ट्रिक वाहन विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब करण्यास ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे.
भागीदारीमध्ये करणार इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती-
नियोजित गुंतवणुकीचा हा प्रस्ताव BYD आणि Megha Engineering and Infrastructures या दोन कंपन्यांनी संयुक्तपणे दिला आहे. या दोन्ही कंपन्या मिळून संयुक्तपणे भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहने तयार करणार आहेत. Megha Engineering and Infrastructures ही हैदराबादेतील इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. कंपनीकडून रस्ते, पूल आणि पॉवर प्लांटच्या बांधकामात गुंतवणूक करण्यात आलेली आहे.
BYD-Megha या कंपनीच्या संयुक्त उपक्रमातून भारतात BYD-ब्रँड इलेक्ट्रिक वाहनांचे अनेक मॉडेल्स तयार करण्याचे नियोजन आहे. त्यामध्ये इलेक्ट्रिक बस आणि ट्रक, लक्झरी तयार करण्याचा विचार केला जात आहे. BYD ने आगामी काही वर्षांमध्ये भारतात दरवर्षी 1,00,000 इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करण्याची योजना आखली आहे.