Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Mankind Pharma Listing Today: मॅनकाइंड फार्माची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, गुंतवणूकदारांना दिले 20% रिटर्न

Mankind Pharma Listing Today: कंडोम उत्पादक मॅनकाइंड फार्माचा शेअर आज सकाळी 10.00 वाजता राष्ट्रीय शेअर बाजारात जोरदार लिस्ट झाला. कंपनीच्या आयपीओला मिळालेला प्रतिसाद पाहता मॅनकाइंड फार्माचा शेअर प्रीमियमवर लिस्ट होईल, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला होता. त्यानुसार 20% रिटर्न देऊन मॅनकाइंडने गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी मालामाल केले.

Read More

Share Market rally: शेअर मार्केट अचानक तेजीत येण्यामागील 7 कारणे कोणती?

भांडवली बाजारात मागील वर्षभरापासून चढउतार होत आहेत. जागतिक मंदी आणि महागाईमुळे शेअर मार्केट दिशाहीन असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी दोन्ही प्रमुख निर्देशांक खाली आले होते. मात्र, आज दिवसभर बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सेन्सेक्स 710 अंकानी वधारला. तर निफ्टी 18,250 अंकांच्या पुढे गेला.

Read More

MRF Share Price: लाखाचा शेअर! 'MRF' चा शेअर 1 लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला

MRF Share Price: मद्रास रबर फॅक्ट्री अर्थात 'MRF'चा शेअरने आज सोमवारी इंट्राडेमध्ये 99933 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. याच वेळी सेन्सेक्समध्ये 700 अंकांची आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी निर्देशांकात 200 अंकांची वाढ झाली होती.'MRF'चा शेअर सध्या 97582 रुपयांवर आहे. त्यात 1005 रुपयांची घसरण झाली.

Read More

Tata Motors Dividend : टाटा मोटर्सचा लाभांश कधी येणार? लवकरच होणार फैसला

Tata Motors Dividend : टाटा मोटर्स आपला लाभांश कधी देणार याविषयी चर्चा सुरू आहे. त्यातच आता महत्त्वाची बातमी समोर आलीय. कंपनी सुमारे 5 वर्षांनंतर लाभांश देणार आहे. याआधी 2016च्या आर्थिक वर्षात कंपनीनं लाभांश दिला होता.

Read More

Tata IPO : कमाईची संधी! टाटा ग्रुपचे एक नव्हे तर दोन आयपीओ बाजारात येणार

Tata IPO : कमाईची चांगली संधी येत्या काळात निर्माण होतेय ती आयपीओच्या निमित्तानं... टाटा ग्रुपचा एक नाही तर दोन आयपीओ बाजारात येणार आहे. टाटा ग्रुपच्या दोन कंपन्यांचा हा आयपीओ असणार आहे. भांडवली बाजार नियामक सेबीनं या आयपीओला नुकतीच परवानगी दिलीय.

Read More

Market Closing Bell: शेअर मार्केट तेजीसह बंद! सेन्सेक्स 242 अंकांनी वधारला; ONGC, अदानी पॉवरचा भाव वाढला

आज (मंगळवार) दिवसभर भारतीय शेअर बाजारातील वातावरण सकारात्मक राहिले. दोन्ही प्रमुख निर्देशांक दिवसभर हिरव्या रंगात ट्रेड करत होते. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 242 अंकांच्या वाढीसह 61339 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 77 अंकांनी वाढून 18142 अंकांवर बंद झाला.

Read More

SEBI Penalty On listed company : ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर, 'या' कंपनीला ठोठावला 10 लाखांचा दंड

SEBI Penalty On Angel Broking Ltd : सिक्‍युरिटीज अँड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीनं एंजल ब्रोकिंग लिमिटेडला दंड ठोठावलाय. ग्राहकांच्या पैशांचा गैरवापर करण्याचा ठपका संबंधित कंपनीवर ठेवण्यात आलाय. जवळपास 10 लाख रुपयांचा हा दंड सेबीनं ठोठावलाय.

Read More

Market Opening Bell: भांडवली बाजार तेजीत! सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला; अदानी ग्रीन, IDFC First bank चा भाव वाढला

सलग तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर आज (मंगळवार) भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात तेजीत झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी वधारून 61,465 वर ट्रेड करत आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 59 अंकांनी वधारून 18,124 वर ट्रेड करत आहे. टाटा स्टील, अदानी टोटल गॅस, वरुण बिव्हिरेजेस, अंबुजा सिमेंट या कंपन्या आज तिमाही निकाल जाहीर करणार आहेत.

Read More

Jio Financial Services IPO : रिलायन्सचा आणखी एक धमाका! लवकरच येणार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा आयपीओ?

Jio Financial Services IPO : रिलायन्सची घोडदौड सुरूच असून येत्या काही दिवसांत एक धमाका रिलायन्स इंडस्ट्रीज करणार आहे. हा धमाका आयपीओच्या संदर्भात असणार आहे. रिलायन्स जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा आयपीओ लवकरच येणार आहे.

Read More

Mankind Pharma IPO: ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माचा शेअर तेजीत, जाणून घ्या अ‍ॅलॉटमेंट स्टेटस

Mankind Pharma IPO: कंडोम उत्पादक मॅनकाइंड फार्माचा आयपीओ 15 पटीने सबस्क्राईब झाला आहे. यामुळे ग्रे मार्केटमध्ये मॅनकाइंड फार्माच्या शेअरमध्ये तेजी आहे.मॅनकाइंड फार्माकडून 3 मे रोजी शेअरचे वाटप (Allotment of Shares) केले जाणार आहे.

Read More

Wipro Cleared Buyback Proposal: विप्रोची शेअर बायबॅकची घोषणा, 12000 कोटींचा बायबॅक प्लॅनला संचालक मंडळाची मंजुरी

Wipro Cleared Buyback Proposal: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाने 12000 कोटींच्या शेअर बायबॅक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीने आज गुरुवारी 27 एप्रिल 2023 रोजी चौथ्या तिमाहीतील निकालांची घोषणा केली.

Read More

Market Closing Bell: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 349 अंकांनी वधारला, तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम

भारतीय भांडवली बाजार आज (गुरुवार) तेजीसह बंद झाला. प्रमुख 13 निर्देशांकापैकी 12 निर्देशांक वधारले. बजाज फायनान्स, विप्रो, हिंदुस्तान युनिलिव्हरचे तिमाही निकाल जाहीर झाले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक 349 अंकांनी वाढून 60,649 वर बंद झाला. कॉर्पोरेट कंपन्यांनी चांगला नफा मिळवल्यामुळे भांडवली बाजार मंदी, भाववाढ काही काळ विसरून गेल्याचे दिसून येत आहे.

Read More