फॉरेक्स हा फॉरेन एक्स्चेंज यापासून तयार झालेला शब्द आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास परकी चलनातील व्यवहार. यातही आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एका चलनाच्या बदल्यात दुसर्या चलनात व्यवहार किंवा एक्स्चेंज करणे यास फॉरेक्स असे म्हणतो. म्हणजेच जेथे फॉरेक्स शब्द येतो, तेथे दोन चलन असतील. म्हणजेच पहिले चलन देऊन दुसरे चलन मिळवणे होय.
कशी होते ट्रेडिंग?
फॉरेक्स ट्रेडिंग (Forex Trading) साठी दोन चलने असतात. म्हणजेच दोन चलनाची एक जोडी असते आणि त्यात ट्रेडिंग केले जाते. भारतात सर्वसाधारपणे सात पेअरमध्ये फॉरेक्स ट्रेडिंग केले जाते. यात डॉलर/रुपया, पौंड/रुपया, युरो/रुपया, जपानी येन/रुपया, डॉलर/येन, पौंड/डॉलर, युरो/डॉलर या जोड्यांचा समावेश आहे. आपण यापैकी एका पेअरमध्ये ट्रेडिंग करू इच्छित असाल तर आपल्याला नोंदणीकृत ब्रोकरकडून खाते सुरू करावे लागेल. ब्रोकरच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्म जसे की संकेतस्थळ किंवा अॅपचा वापर करून ट्रेडिंग करू शकता.
कशी होते कमाई?
फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कमाई करणे सोपे आहे. परंतु अशा प्रकारच्या व्यवहारात सरासरी कमाई करण्यासाठी अन्य गुंतवणूक योजनेच्या तुलनेत जादा रक्कम टाकावी लागते. उदा. आपण डॉलर/रुपये या पेअरमध्ये ट्रेडिंग करू इच्छित असाल तर सर्वात अगोदर आपल्याला डॉलर खरेदी करावे लागेल. उदाहरणार्थ. आज डॉलरचा दर 75 रुपये आहे तर एक हजार डॉलर खरेदी करण्यासाठी आपल्याला 75 हजार रुपये खर्च करावे लागतील. एक हजार डॉलर घेतल्यानंतर तीन चार दिवसांनातर त्याची किंमत 75.50 रुपये झाल्यास आपण डॉलरची विक्री केल्यास 75500 रुपये मिळतील. म्हणजेच आपल्याला 500 रुपयांचा लाभ मिळेल. याप्रमाणे एक हजार अमेरिकी डॉलरची खरेदी विक्री ही महिन्यातून आठ ते दहा वेळेस केल्यास चार ते पाच हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो. वर्षाचा विचार केल्यास तो 50 ते 60 हजारांपर्यंत पोचू शकतो.
वर दिलेल्या उदाहरणाच्या मदतीने आपण एक हजार डॉलरच्या आधारे वर्षात केलेली कमाई पाहिली. यानुसार आपण अधिक खरेदी केल्यास अधिक लाभ मिळेल. साधारपणे फॉरेक्स ट्रेडिंग ही बँका, निर्यातदार किंवा अन्य वित्तीय संस्थांकडून केली जाते. जेव्हा डॉलरची किंमत वाढते, तेव्हा त्याची विक्री केली जाते. जी मंडळी लाखो डॉलर गुंतवतात त्यांचे मार्जिन देखील लाखातून तयार होते. आपण महिन्यांत पाच ते सात हजार रुपये जादा उत्पन्न मिळवू इच्छित असाल तर एक किंवा दोन हजार डॉलरची खरेदी करून आपले नशिब फॉरेक्समध्ये आजमावू शकता.
फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये शुल्क आकारणी
प्रत्यक्षात फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये कमिशन म्हणून कोणतेही शुल्क आकारले जात नाही. परंतु ब्रोकरेज सेवा देणार्या संस्था या ऑनलाइन सेवा देण्याच्या बदल्यात किरकोळ शुल्क वसुली करतात. हे शुल्क वार्षिक असते.
ऑनलाइन प्लॅटफॉर्म
फॉरेक्स ट्रेडिंगसाठी जगभरात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहेत. त्याठिकाणी चोवीस तास व्यवहार केला जातो. भारतात अनेक प्लॅटफॉर्म फॉरेक्स ट्रेडिंग उपलब्ध आहे. यात एनएसई (NSE), बीएसई (BSE), एमसीएक्स-एसक्स (MCX-SX) चा आदींचा समावेश आहे. परंतु कोणताही व्यक्ती थेटपणे ट्रेडिंग करत नाही. यासाठी सेबीद्वारे नोंदणीकृत ब्रोकरच्या मार्फतच खाते सुरू करावे लागते.
सध्याच्या काळात कोटक सिक्युरिटी, रिलायन्स सिक्युरिटी, पांच पैसा, एंजल ब्रोकिंग, जिरोधा, आयसीआयसीआय डायरेक्ट यासारखे अनेक प्लॅटफॉर्मचे पर्याय उपलब्ध आहेत. या सर्व एजन्सींनी गुंतणूकदारांना थेट ट्रेडिंग करणे आणि संकेतस्थळ किंवा अॅपची सुविधा प्रदान केली आहे. कोणताही व्यक्ती जो चलनात गुंतवणूक करु इच्छित आहे, तो या अॅपवर थेटपणे फॉरेक्स ट्रेडिंग करू शकतो.