• 08 Jun, 2023 01:24

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर्स आणि आयपीओमधील मूलभूत फरक जाणून घ्या

learn-the-basic-difference-between-a-share-and-an-ipo

तुम्ही शेअर्स (Shares) आणि आयपीओ (IPO) मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहात का? यात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला त्यांच्यातील मूलभूत फरक जाणून घेणे आवश्यक आहे.

शेअर बाजारात पैसे गुंतवणे फार अवघड नाही आणि शेअर बाजारातून पैसे मिळवणे तितकेसे सोपे ही नाही. शेअर बाजारात उडी मारण्यापूर्वी त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. कारण शेअर बाजारामुळे अनेक जणांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. शेअर बाजारात पैसे गुंतवण्यापूर्वी त्याचा प्राथमिक अभ्यास जसे की, टेक्निकल अनालिसिस, मार्केटमधील चढउतार याविषयीची माहिती असणे आवश्यक आहे. सध्या सर्वसामान्य माणूसही शेअर बाजारात पैसे गुंतवू लागला आहे. यामध्ये तरूणांची संख्या मोठी आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवरून अनेक जण यात उतरतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग आहे प्रायमरी मार्केट आणि दुसरा सेकंडरी मार्केट.

learn-the-basic-difference-between-a-share-and-an-ipo

प्रायमरी मार्केट (Primary Market)

जेव्हा एखादी कंपनी स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून जेव्हा पहिल्यांदा आपल्या शेअर्सची विक्री करून भांडवल उभे करण्यासाठी आयपीओ (IPO- Initial Public Offering) बाजारात आणते, या बाजाराला प्रायमरी मार्केट (Primary Market) असे म्हणतात. या प्रक्रियेसाठी कंपनीला रजिस्ट्रेशन करावे लागते. एका ठराविक कालावधीनंतर ही कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट होते.

कंपनीचा विस्तार करण्यासाठी

एखाद्या कंपनीला जेव्हा आपल्या व्यवसायाचा विस्तार करायचा असतो, तेव्हा ती कंपनी आयपीओ काढते. आयपीओच्या माध्यमातून कंपनी निधी गोळा करते. कंपन्यांना व्यवसाय वाढीसाठी बॅंकेकडून कर्ज घेता येते. पण कर्जाला मर्यादा असतात. त्याचे व्याज भरावे लागते आणि ते मुदतीत फेडावे लागते. आयपीओमधून मिळालेल्या निधी परत करावा लागत नाही आणि त्यावर व्याज ही भरावे लागत नाही. म्हणून बहुतांश कंपन्या व्यवसाय वाढीसाठी आणि विस्तारासाठी आयपीओ काढतात.

आयपीओमध्ये गुंतवणूकदार आणि कंपनी असा दोन्हींचा फायदा असतो. आयपीओमधून कंपनीला जसा निधी उभा करता येतो. त्याप्रमाणेच गुंतवणूकदारांनाही कमी पैशांमध्ये कंपनीत भागीदार होण्याची संधी मिळते.

कर्ज कमी करण्यासाठी 

कंपनीवरील कर्ज कमी करण्यासाठी काही कंपन्या आयपीओद्वारे कंपनीचे काही समभाग विक्रीसाठी काढतात. आयपीओमधून कंपनीला नवीन गुंतवणूकदार आणि भागीदार मिळतात. तसेच आयपीद्वारे जमा झालेल्या निधीतून कंपनीवरील कर्जाची रक्कम कमी करण्यास मदत होते.

नवीन उत्पादन बाजारात आणण्यासाठी

काही कंपन्या नवीन उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी आणि त्या उत्पादनासाठी निधी उभा करण्यासाठी बाजारात आयपीओ आणतात. आयपीओद्वारे नवीन प्रोडक्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येते आणि त्यातून निधी ही जमा होतो.

सेकंडरी मार्केट (Secondary Market)

सेकंडरी शेअर्स मार्केटमध्ये लिस्टेड असलेल्या सर्व कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी-विक्री केव्हाही करता येते. यामधील शेअर्सच्या किमती प्रत्येक सेकंदाला कमी-जास्त होत असतात. त्यामुळे शेअर्स खरेदी व विक्री करताना बाजार भावाविषयी सतर्क असणे आवश्यक असते. सेकंडरी शेअर्स मार्केटचे सर्व व्यवहार ऑनलाईन पद्धतीने सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 यामध्ये होतात. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी शेअर्स मार्केट बंद असते. 

शेअर्स म्हणजे काय?

जेव्हा आपण कोणत्याही कंपनीचे शेअर्स खरेदी करतो तेव्हा आपण त्या कंपनीच्या मालकीचे काही टक्के भाग मिळवत असतो. कंपनीने मिळवलेल्या नफ्यावर टक्केवारीनुसार काही हक्क गुंतवणूकदाराला मिळतात. पूर्वी शेअर्स ऑफलाईन पद्धतीने खरेदी केले जात होते. आता ऑनलाईन पद्धतीने ही प्रक्रिया खूपच सोपी झालेली आहे.

शेअर्स खरेदी आणि विक्री

आपण शेअर्स ऑनलाईन खरेदी आणि विक्री करू शकतो. त्यासाठी ट्रेडिंग खाते आणि डीमॅट (डी-मटेरलाइज्ड) खाते उघडावे लागते. समभागांची खरेदी-विक्री करण्यासाठी ट्रेडिंग खात्याची आवश्यकता असते. डिमॅट खाते हे आपल्या बँकेसारखेच काम करते. जेथे शेअर्स खरेदी आणि जमा होतात.