Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Stock investment: अवघ्या 2 महिन्यांत 66 टक्के परतावा! भविष्यात आणखी वाढ? जाणून घ्या, कोणता आहे हा स्टॉक...

Stock investment: अवघ्या 2 महिन्यांत 66 टक्के परतावा! भविष्यात आणखी वाढ? जाणून घ्या, कोणता आहे हा स्टॉक...

Image Source : www.investopedia.com

Stock investment: चांगला परतावा मिळावा, यामुळे अनेकजण योग्य अशा स्टॉकच्या शोधात असतात. कधी कधी अपेक्षेपेक्षा कमी परतावा मिळतो. तर कधीकधी मात्र बंपर कमाई होते. असाच एक स्टॉक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या स्टॉकनं केवळ 2 महिन्यांमध्ये तब्बल 66 टक्के परतावा दिला आहे.

इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा क्षेत्रातली कंपनी अ‍ॅव्हलॉन सर्व्हिसेस (Avalon technologies services) हा स्टॉक गेल्या काही काळापासून गुंतवणूकदारांसाठी अत्यंत फायदेशीर ठरताना दिसून येत आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस तो समाधानकारक लिस्ट झाला नाही. मात्र या खराब परफॉर्मन्सनंतर गेल्या दोन महिन्यांत स्टॉक 66 टक्क्यांहूनदेखील अधिकनं वाढला आहे. एवढंच नाही, तर स्टॉक आणखी वाढेल, असा बाजार निरीक्षकांचा अंदाज आहे. ब्रोकिंग फर्म डीअँडबीच्या (D&B) मते, त्यांनी स्टॉकवर कव्हरेज सुरू केलं आहे. या स्टॉकमध्ये जवळपास आणखी 30 टक्के वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सीएनबीसीनं हे वृत्त दिलं आहे.

अहवालात काय म्हटलं?

डीअँडबीच्या रिपोर्टनुसार, कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये लीडरशीप पोझिशनला आहे. यासोबतच कंपनीचा विस्तार परदेशी बाजारपेठेतही आहे. कंपनीचं 72 टक्के उत्पादन भारतात आहे. त्यामुळे खर्च कमी होण्यास मदत होते. तर कंपनीची मुख्य बाजारपेठ अमेरिका आहे. कंपनीच्या उत्पन्नात 59 टक्के वाटा अमेरिकेचा आहे.

कमाई दुप्पट करण्याचं उद्दिष्ट 

रेल्वेपासून एरोस्पेसपर्यंत कंपनी पसरली आहे, आता क्लीन एनर्जी आणि मोबिलिटीसारख्या नवीन विभागातही विस्तार सुरू आहे. पुढच्या 3 वर्षांत आपली कमाई दुप्पट करण्याचं व्यवस्थापनाचं उद्दिष्ट आहे. अहवालात असं म्हटलं आहे, की कोविडनंतर कंपन्या चीनवरची त्यांची निर्भरता कमी करत आहेत. याचा भारताला फायदा होऊ शकतो.

स्टॉकमध्ये आणखी 30 टक्के वाढ होणार?

सध्या जागतिक ईएमएस मार्केटमध्ये भारताचा वाटा केवळ 2-3 टक्के आहे. 2025 पर्यंत 7-8 टक्क्यांपर्यंत तो वाढेल. या वाढीचा फायदा या क्षेत्रातल्या प्रमुख कंपनीला मिळू शकतो. सकारात्मक संकेत पाहता, ब्रोकरेज हाऊसनं 781च्या लक्ष्यासह स्टॉकवर खरेदीची शिफारस केली आहे. म्हणजेच स्टॉकमध्ये आणखी 30 टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.

स्टॉकची कामगिरी कशी?

कंपनीचा शेअर एप्रिलच्या मध्यात लिस्ट झाला होता आणि त्याची लिस्टिंग काही खास नव्हती. 436ची ऑफर किंमत असलेला स्टॉक 431वर लिस्ट झाला आणि लिस्टिंगच्या दिवशीच तो 390च्या खाली आला. मे महिन्याच्या मध्यापर्यंत समभाग दबावाखाली राहिला. त्यानंतर स्टॉकमध्ये रिकव्हरी दिसून आली. 8 मे रोजी स्टॉक 360च्या पातळीवर होता. गुरुवारी हा शेअर 599च्या पातळीवर बंद झाला आहे. म्हणजेच अवघ्या 2 महिन्यांत स्टॉकमध्ये 66 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या कालावधीत स्टॉकची खालची पातळी 347 आणि सर्वोच्च पातळी 616 होती.