पोर्टफोलिओमध्ये शेअर्सचा (Shares) समावेश करण्यासाठी तुम्ही ब्रोकरेज कंपनी आणि मार्केट एक्सपर्टची मदत घेऊ शकता. बाजार तज्ज्ञ संदीप जैन यांनी खरेदीसाठी मजबूत असा एक स्टॉक निवडला आहे. तज्ज्ञांच्या मते, या शेअरमध्ये अल्प ते दीर्घ मुदतीच्या दृष्टीनं मजबूत असा पैसा कमावता येणार आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये (Share market) गुंतवणूक (Investment) करण्यासाठी चांगल्या स्टॉकच्या शोधात असाल, तर तुम्ही ज्या स्टॉकवर तज्ज्ञांनी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे, त्यावर पैजदेखील लावू शकता. हा स्टॉक गुंतवणूकदारांना बंपर कमाई (Return) करून देणार आहे. झी बिझनेसनं याविषयीचा आढावा घेतला आहे.
Table of contents [Show]
मजबूत कमाईचा स्टॉक
मार्केट तज्ज्ञ संदीप जैन यांनी किर्लोस्कर फेरस हा शेअर खरेदीसाठी निवडला आहे. हा स्टॉक किर्लोस्कर समूहाचा आहे. तज्ज्ञांनी सांगितलं, की ते हा स्टॉक दुसऱ्यांदा देत आहेत. रिझल्टचा सीझन सुरू होणार आहे आणि मेटल स्टॉकमध्ये सध्या तेजी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत या स्टॉकमध्येदेखील जोरदार तेजी दिसून येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
किर्लोस्कर फेरस
- CMP - 497
- टार्गेट प्राइज - 560/590
- कालावधी - 4-6 महिने
गुणवत्ता आणि मार्केट शेअरचा कंपनीला फायदा
गुणवत्ता आणि मार्केट शेअरचा या कंपनीला भरपूर फायदा झाल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. ही कंपनी सिलेंडर एड्स, ट्रान्समिशन पार्ट्स यांसारखी उत्पादनं बनवते. तर ऑटोमोबाइल उद्योगात कंपनीची उत्पादनं मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
कंपनीचे फंडामेंटल्स?
स्टॉक 19च्या पीई मल्टिपलवर ट्रेडिंग करत आहे. इक्विटीवर 24 टक्के परतावा आहे. मागच्या 3 वर्षांचा विचार केल्यास विक्रीत 31 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय नफ्यात सुमारे 46 टक्के इतकी वाढ झाल्याचं दिसतं. या कंपनीत देशी-विदेशी गुंतवणूकदारांची भागीदारी जवळपास 12.5 टक्के इतकी आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)