Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Trading : 13 जुलैपासून थांबतील HDFC च्या शेअर्सचे व्यवहार

HDFC Trading : 13 जुलैपासून थांबतील HDFC च्या शेअर्सचे व्यवहार

एचडीएफसी बँकच्या विलीनि‍करणानंतर 13 जुलैला शेअर बाजारात एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्सचे ट्रेडिंग थांबवण्यात येणार आहे. एचडीएफसीच्या विलीनि‍करणानंतर HDFC ltd च्या शेअर धारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स दिले जाणार आहेत. यासाठी यासाठी HDFC भागधारकांनी 25 शेअर्सच्या पटीत शेअर होल्डिंग राखणे आवश्यक आहे.

HDFC बँक आणि HDFC या दोन कंपन्यांचे एकत्रीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे जगभरातील आणि भारतातील टॉप कंपन्यांच्या यादीत एचडीएफसी बँकेने वरचे स्थान पटकावले आहे. दरम्यान एचडीएफसी बँकच्या विलीनि‍करणानंतर आता शेअर बाजारात एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्सचे ट्रेडिंग थांबवण्यात येणार आहे. 13 जुलैला एचडीएफसी लिमिटेडच्या ट्रेडिंगचा शेवटचा दिवस असेल. एचडीएफसी लिमिटेडच्या शेअर्समध्ये व्यवहार करता येणार नाहीत.

42:25 या गुणोत्तरानुसार शेअर्सचे वाटप

एचडीएफसीच्या विलीनीकरणानंतर HDFC ltd च्या शेअर धारकांना त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक 25 शेअर्ससाठी HDFC बँकेचे 42 शेअर्स दिले जाणार आहेत. यासाठी यासाठी HDFC भागधारकांनी 25 शेअर्सच्या पटीत शेअरहोल्डिंग राखणे आवश्यक आहे. भागधारकांना शेअर होल्डींगमध्ये आवश्यक ते बदल करायचे असल्यास त्यांना आजची (12 जुलै पर्यंत )शेवटची मुदत आहे. जर भागधारकाकडे HDFC चे 15 शेअर्स असतील तर तर वरील वाटप सूत्रानुसार त्या भागधारकास HDFC बँकेचे 25.2 शेअर्स लागू होतात. अशा वेळेस त्यास 25 शेअर्स मिळतील आणि 0.2 शेअर्स मूल्य रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

जगातील सर्वात मोठी बँक

HDFC-HDFC bank merger मुळे जगभरातील टॉप बँकांच्या यादीत एचडीएफसी बँक चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. तर भारतातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी बनली आहे. एचडीएफसीने बाजार भांडवल आता 172 बिलियन डॉलरवर पोहोचले आहे. तसेच HDFC-HDFC bank merger चा व्यवहार भारतीय कॉर्पोरेट इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार ठरला आहे.