या तीन स्टॉक्सवर तेजीच्या ट्रिगर्सबरोबरच टार्गेट आणि स्टॉपलॉसदेखील आहे. सेठी फिनमार्टचे विकास सेठी यांनी युनियन बँक ऑफ इंडिया, एजिस लॉजिस्टिक्स आणि ईआयडी पॅरीला दीर्घकालीन (Long term), स्थिती (Positional) आणि अल्प मुदतीच्या (Short term) पोझिशन्ससाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. झी बिझनेसनं याविषयीचं वृत्त दिलं आहे.
दीर्घकाळात फायदाच फायदा - ईआयडी पॅरी (EID Parry)
दीर्घ मुदतीसाठी ईआयडी पॅरी (EID Parry) स्टॉकवर खरेदी करण्याची शिफारस केली आहे. शेअर 468 रुपयांवर व्यवहार करत आहे. कंपनीचा साखर आणि इथेनॉलचा व्यवसाय आहे. सध्या हे दोन्ही क्षेत्र चांगलं काम करत आहेत. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारात साखरेचे दर वाढलेले आहेत. मागणीही जोरदार आहे. इथेनॉलच्या बाबतीतही सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळे संपूर्ण साखर क्षेत्राला फायदा होत आहे. स्टॉकवर 9-12 महिन्यांचं लक्ष्य 613 रुपये आहे.
एजिस लॉजिस्टिक्स (Aegis Logistics)
मार्केट एक्सपर्ट्सनी एजिस लॉजिस्टिक शेअरला पोझिशनल पिक म्हणून निवडलं आहे. हा स्टॉक 344 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. हा देशातला आघाडीचा लिक्विड टर्मिनल ऑपरेटर आहे. यांचे देशभरात 6 स्ट्रॅटेजिकली ऑपरेटेड टर्मिनल आहेत. कंपनीनं नवीन कॅपेक्स केलं आहे. एचपीसीएल (HPCL), बीपीसीएल (BPCL), आरआयएल (RIL), एसएआयएल (SAIL), एचयूएल (HUL), एलओसीएल (IOCL) यासारख्या मोठ्या नावांचा कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये समावेश आहे. स्टॉकवर खरेदीची शिफारस करण्यात आली आहे. पोझिशनल टार्गेट 375 रुपये आहे. तसंच स्टॉपलॉस 330 रुपये आहे.
शॉर्ट टर्मसाठी यूनियन बँक स्टॉक
विकास सेठी यांनी पीएयसू क्षेत्रातली बँक युनियन बँक ऑफ इंडियाचे शेअर्स अल्प मुदतीसाठी निवडले आहेत. हा शेअर 82 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. सध्याच्या पातळीवर हा स्टॉक विकत घ्यायला हवा, असं ते म्हणाले. डिव्हिडंड यील्ड सुमारे 3 टक्के आहे. मार्च तिमाहीत बँकेची कामगिरी चांगली होती. शेअरचं शॉर्ट टर्म टार्गेट 86 रुपये आणि 78 रुपयाचा स्टॉपलॉस आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)