Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

NSDL IPO: एनएसडीएलचा आयपीओसाठी सेबीकडे अर्ज दाखल; 'या' 6 कंपन्या आपला हिस्सा विकणार

NSDL IPO

Image Source : www.pymnts.com

NSDL IPO: नॅशनल सिक्युरिटी डिपॉझीटरी लिमिटेड (National Security Depository Limited-NSDL) ही संस्था सरकारमान्य शेअर डिपॉझीटरी आहे. शेअर डिपॉझीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर होल्ड करतात.

नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड म्हणजेच एनएसडीएल (NSDL)ने आपला आयपीओ आणण्यासाठी सेबीकडे कागदपत्रे दाखल केली आहेत. एलएसडीएल ही गुंतवणूकदारांचे शेअर्स डिजिटली होल्ड करण्याचे आणि शेअर्स ट्रान्सफर करण्याची सेवा पुरवते. याबाबत 'महामनी'ने 6 डिसेंबरला एनएसडीएल आपीओ आणण्याच्या तयारीत असे वृत्त दिले होते.

सीडीएसएलच्या आयपीओला 2017 मध्ये भरघोस प्रतिसाद

एनएसडीएलचा आयपीओ यशस्वीरीत्या लिस्टिंग झाला तर शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग होणारी ही दुसरी डिपॉझटरी सर्व्हिस देणारी कंपनी ठरेल. यापूर्वी 2017 मध्ये सीडीएसएल (Central Depository Services Limited-CDSL) मार्केटमध्ये लिस्टिंग झाली होती. या आयपीओमधून सीडीएसएलला जबरदस्त फायदा झाला होता. गुंतवणूकदारांनी जवळपास 170 पटीने हा आयपीओ सब्स्क्राईब केला होता. तर कंपनीने यातून 524 कोटी रुपये जमा केले होते.

आता पुन्हा एकदा एनएसडीएलच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना डिपॉझिटरी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. NSDLचा आयपीओ हा पूर्णपणे ऑफर-फॉर-सेल (Offer for Sale-OFS) असणार आहे. यात IDBI Bank, SBI, HDFC Bank, Union Bank of India आणि NSE (National Stock Exchange) आपला हिस्सा विकणार आहे. NSDL ने आयपीओच्या माध्यमातून 4.50 कोटी रुपये मिळवण्याचा मानस व्यक्त केला आहे. यासाठी कंपनी 5.72 कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे.

NSDL काय आहे?

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेड (National Security Depository Limited-NSDL) ही एक संस्था सरकारमान्य शेअर डिपॉझिटरी कंपनी आहे. 8 ऑगस्ट, 1996 मध्ये याची स्थापना करण्यात आली होती. ही देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक डिपॉझिटरी आहे. शेअर डिपॉझीटरी हे इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये शेअर होल्ड करतात. पूर्वी प्रत्यक्ष म्हणजे ऑफलाईन शेअर्सची खरेदी-विक्री होत होती. तेव्हा शेअर्स पेपर सर्टिफिकेटद्वारे घेतले जायचे. आता हेच शेअर्स डिजिटल फॉर्ममध्ये होल्ड किंवा खरेदी-विक्री केले जातात. ते डिजिटली ठेवण्याचे काम NSDL करते.

नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरीमध्ये केंद्र सरकारचा 6.83 टक्के वाटा आहे. एचडीएफसी बँकेकडे एनएसडीएलमध्ये एकूण 8.95 टक्के हिस्सा आहे. त्यातील  2 टक्के हिस्सा बँक विकणार आहे. आयडीबीआय आपल्या हिश्श्यातील 2.22 कोटी, तर एनएसई 1.8 कोटी शेअर्स, युनिअन बँक ऑफ इंडिया 56.2 लाख शेअर्स, एसबीआय 40 लाख शेअर्स आणि युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया 34 लाख शेअर्सची विक्री करणार आहे.