Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger IPO: महिनाभरातच झाले मल्टीबॅगर! 'या' 5 छोट्या आयपीओंमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल..!

Multibagger IPO: महिनाभरातच झाले मल्टीबॅगर! 'या' 5 छोट्या आयपीओंमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल..!

Multibagger IPO: शेअर बाजार सध्या चांगल्याच उंचीवर कामगिरी करत आहे. त्यामुळे आयपीओ मार्केटचा उत्साहदेखील वाढू लागला आहे. काही आयपीओंनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे खिसे तर आधीच भरले आहेत. काही छोट्या कंपन्यांच्या अशा आयपीओबद्दल जाणून घेऊ, ज्यांनी घसघशीत परतावा दिला आहे.

एका महिन्यात या छोट्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 125 ते 190 टक्के इतका बंपर परतावा दिला आहे आणि मल्टीबॅगर्स बनले आहेत. पाहू...

वसा डेंटिसिटी (Vasa Denticity IPO)

या कंपनीचा आयपीओ 2 जूनला लिस्ट झाला. या आयपीओची किंमत 121 ते 128 रुपये प्रति शेअर होती. त्यानंतर त्याचा हिस्सा सुमारे 65 टक्के प्रीमियमसह 211 रुपयांवर लिस्ट झाला. आता हा शेअर 370.65 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे या शेअरची किंमत तब्बल 190 टक्क्यांनी वाढली.

हेमंत सर्जिकल इंडस्ट्रीज (Hemant Surgical Industries IPO)

या आयपीओची किंमत 85 ते 90 रुपये प्रति शेअर होती. आयपीओनंतर त्याचे शेअर्स 5 जून रोजी लिस्ट झाले. लिस्टिंगच्या दिवशीच त्यानं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आणि 180 रुपयांचा उच्चांक गाठला. सध्या तो सुमारे 150 टक्क्यांच्या वाढीसह 228.50 रुपयांवर व्यवहार करत आहे.

सोनालीस कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (Sonalis Consumer Products IPO)

हा एसएमई आयपीओ फक्त 30 रुपये प्रति शेअर या दरानं लॉन्च करण्यात आला. त्याची लिस्टिंग 19 जून रोजी 38 रुपये प्रति शेअरवर सुमारे 26 टक्के प्रीमियमसह झाली. आता हा शेअर सुमारे 140 टक्क्यांच्या वाढीसह 71.55 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे.

क्रेयॉन्स अ‍ॅडव्हर्टायझिंग (Crayons Advertising IPO)

या आयपीओची किंमत 62 ते 65 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. हा शेअर 2 जून रोजी बाजारात 40 टक्के प्रीमियमवर 90 रुपये दरानं लिस्ट झाला होता. शुक्रवारच्या व्यवहारात तो 155.10 रुपये प्रति शेअरवर बंद झाला. अशाप्रकारे त्याची किंमत सुमारे 140 टक्क्यांनी वाढली.

इन्फोलियन रिसर्च सर्व्हिसेस (Infollion Research Services IPO)

कंपनीनं आपल्या आयपीओसाठी 80 ते 82 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला होता. हा शेअर 8 जूनला एनएसई एसएमई एक्स्चेंजमध्ये लिस्ट झाला. 155 टक्के प्रीमियमसह 209 रुपयांवर लिस्टिंग झाली. आता ते 186 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. याप्रकारे सुमारे 125 टक्के नफ्यात आहे.

(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)