Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Drone Destination आयपीओ आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; 11 जुलैपर्यंत करता येणार गुंतवणूक

Drone Destination IPO Open to Investment

IPO Investment: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज चांगली बातमी आहे. एकतर IdeaForge Technology कंपनीचे आज दमदार किमतीत लिस्टिंग झाले. तर दुसरीकडे आज आणखी एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाला आहे. तो आहे, ड्रोन डेस्टिनेशन (Drone Destination IPO). गुंतवणूकदार 11 जुलैपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात प्रति शेअर्स किंमत, लॉट साईज आणि लिस्टिंगची तारीख.

SME IPO Investment: आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज चांगली बातमी आहे. एकतर  IdeaForge Technology कंपनीचे आज दमदार किमतीत लिस्टिंग झाले. 672 रुपये किंमत असलेल्या या शेअर्सचे 1300 रुपयांवर लिस्टिंग झाले. या आयपीओने गुंतवणूकदारांना जवळपास दुप्पट परतावा दिला आहे.

तर दुसरीकडे आज आणखी एका कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले झाला आहे. तो आहे, ड्रोन डेस्टिनेशन (Drone Destination IPO). गुंतवणूकदार 11 जुलैपर्यंत यामध्ये गुंतवणूक करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात त्याच्या प्रति शेअर्स किंमत, शेअर्सची साईज, लॉट साईज आणि लिस्टिंगची तारीख.

ड्रोन डेस्टिनेशन ही डीजीसीए अंतर्गत मान्यता असलेली रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO) आहे. जी एक प्रमाणित संस्था आहे. ही कंपनी एसएमई आयपीओ (SME IPO)च्या माध्यमातून 44.20 कोटी रुपये उभारणार आहे. सरकार ज्या पद्धतीने ड्रोन मार्केटला प्रोत्साहन देत आहे. त्यावरून असे दिसून येते की, येणाऱ्या काही दिवसात ड्रोनची मागणी मोठ्या संख्येने वाढणार आहे. ड्रोन पायलट ही करिअरची नवीन संधी निर्माण झाली आहे. ड्रोन पायलट हा ड्रोन उडवण्याचे काम करतो. भविष्यात ड्रोन आणि ड्रोन पायलटची मागणी वाढणार आहे. ड्रोन पायलटसाठी लाखो रुपयांचा पगार अमेरिकेत दिला जातो.

ड्रोन डेस्टिनेशन प्राईस ब्रॅण्ड

कंपनीने या आयपीओसाठी प्रति शेअरची किंमत 62-65 रुपये निश्चित केली आहे. तर याची लॉट साईज 2000 शेअर इतकी असणार आहे. या आपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना किमान 1,30,000 रुपये गुंतवावे लागतील. कंपनी 10 रुपये फेस व्हॅल्यू असलेले 68 लाख शेअर्स इश्यू करणार आहे. त्यातील 35 टक्के शेअर्स हे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी, 50 टक्के  पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyers-QIB) गुंतवणूकदारांसाठी आणि 15 टक्के शेअर्स हे  गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (Non-Institutional Investors-NII) यांच्यासाठी आरक्षित आहेत.

ग्रे मार्केटमध्ये चांगला परफॉर्मन्स

ग्रे मार्केटमध्ये ड्रोन डेस्टिनेशनचा शेअर 67 टक्के प्रीमिअमवर ट्रेड करत आहे. आताच्या प्राईस बॅण्डनुसार याच्या शेअर्सचे लिस्टिंग 109 रुपयांवर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांचा उपयोग कंपनी नवीन ड्रोन विकत घेण्यासाठी, तसेच कंपनीचे भांडवल वाढवण्यासाठी वापरणार आहे. मार्च, 2023 पर्यंत कंपनीने 12.07 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता.

गुंतवणूकदार या आयपीओमध्ये 11 जुलैपर्यंत गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर आयपीओ बंद झाल्यानंतर 14 जुलै रोजी शेअर्स वाटप केले जाऊ शकते. त्यानंतर एनएसई एसएमई (NSE SME) वर याचे 19 जुलैला लिस्टिंग होऊ शकते.