Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Upcoming IPO: पुढील आठवड्यात 'या' चार कंपन्यांचे आयपीओ ओपन होणार! जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO

Image Source : www.hindi.economictimes.com

Upcoming IPO: तुम्हाला देखील आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पुढील आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ ओपन होणार आहेत. या कंपन्यांच्या शेअर्सची प्राईस बँड किती असेल? कधीपर्यंत गुंतवणूक करता येईल, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

सध्या अनेक कंपन्यांनी त्यांचे आयपीओ (IPO) बाजारात आणले आहेत. ज्याच्या माध्यमातून भांडवलासाठी आणि कंपनीच्या वृद्धीसाठी गुंतवणूक मिळवली जात आहे. तुम्हीही या आयपीओमध्ये गुंतवणूक करून चांगली कमाई करू शकता. पुढील आठवड्यात चार कंपन्या त्यांचे आयपीओ बाजारात दाखल करणार आहेत. तेव्हा पैशांची जुळणी करून तुम्ही देखील या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकता. पुढील आठवड्यात कोणत्या 4 कंपन्यांचे आयपीओ ओपन होणार आहेत, जाणून घेऊयात.

अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड आयपीओ

अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड (Urban Enviro Waste Management Limited) ही कंपनी बुधवारी 12 जुलैला आपला आयपीओ (IPO) बाजारात आणणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 14 जुलै पर्यंत गुंतवणूक करू शकतात. अर्बन एन्व्हायरो वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी कचरा व्यवस्थापन करणारी कंपनी असून ती सध्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या अनेक शहरातील नगरपालिकांसोबत काम करत आहे. या कंपनीने आयपीओसाठी प्रति शेअर्स 100 रुपये प्राईस बँड निश्चित केली आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनी 11.42 कोटी रुपये उभारणार आहे.

कॉस्मिक सीआरएफ लिमिटेड आयपीओ

कॉस्मिक सीआरएफ लिमिटेड (Cosmic CRF Limited) ही कंपनी पुढील आठवड्यात 14 जुलैला शुक्रवारी आपला आयपीओ (IPO) ओपन करणार आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूकदार 16 जून पर्यंत गुंतवणूक करू शकतात. कंपनीने प्रति शेअर्स 314 ते 330 रुपयांचा प्राईस बँड निश्चित केली आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनी 60.13 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. ही कंपनी अनेक मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना कोल-रोल्ड-स्टेनलेस सेक्शन पुरविण्याचे काम करते.

सेल पॉईंट लिमिटेड आयपीओ

सेल पॉईंट लिमिटेड (Cell Point Limited) ही कंपनी मल्टीब्रँड रिटेल सेलिंग पॉईंट व्यवसायात काम करत असून ती अनेक कंपन्यांना स्मार्टफोन आणि इतर ऍक्सेसरीज विकते. ही कंपनी पुढील आठवड्यात 15 जुलै रोजी आपला आयपीओ (IPO) ओपन करेल. ज्यामध्ये 20 जुलैपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे.  या कंपनीने शेअर्ससाठी 100 रुपयांची प्राईस बँड निश्चित केली आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनी 50.34 कोटी रुपते उभारणार आहे.

बिझोटिक कमर्शिअल आयपीओ

बिझोटिक कमर्शिअल (Bizotic Commercial) कंपनी 'अर्बन युनायटेड' (Urban United) या नावाने रेडिमेड कपड्यांचे उत्पादन आणि विक्री करते. ही कंपनी पुढील आठवड्यात 12 जुलैला बुधवारी आपला आयपीओ (IPO) बाजारात ओपन करणार आहे. तर गुंतवणूकदारांना 15 जुलैपर्यंत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओसाठी कंपनीने प्रति शेअर्स 175 रुपयांची प्राईस बँड निश्चित केली आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 42.21 कोटी रुपये उभारणार आहे.

Source: hindi.news18.com