Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Byju’s Crisis: कोरोना काळात घराघरात पोहचलेली बायजू आर्थिक संकटात; गुंतवणुकदारांनीही साथ सोडली

BYJU

Image Source : www.theliberalworld.com

सध्या बायजूवर 1.2 बिलियन डॉलरचे टर्म लोन आहे. मात्र, हे कर्ज फेडण्याची कंपनीची क्षमता नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने कर्जदारांनी बायजूविरोधात खटला दाखल केला आहे. दरम्यान, बायजूनेही कर्जदारांच्या अटी अवास्तव असल्याचे म्हणत उलट गुन्हा दाखल केला आहे. संचालक मंडळातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींनी काल (शुक्रवार) राजीनामा दिला.

Byju’s Crisis: भारतामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले होते तेव्हा संपूर्ण देशात टाळेबंदी होती. शाळा-महाविद्यालयेही बंद असल्यानं ऑनलाइन एज्युकेशनला डिमांड होती. त्यावेळी बायजू ही कंपनी घराघरात पोहचली. पहिलीपासून ते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन एज्युकेशन घेऊन आलेल्या बायजूने प्रचंड नफा कमावला आणि कंपनीचा विस्तारही केला. मात्र, कोरोना साथ जशी ओसरली तशी कंपनीचा नफा खाली आला. आता कंपनी पूर्णत: आर्थिक संकटात सापडली असून संचालक मंडळातील महत्त्वाच्या व्यक्तींनी राजीनामे दिले आहेत.

सध्या बायजूवर 1.2 बिलियन डॉलरचे टर्म लोन आहे. मात्र, हे कर्ज फेडण्याची कंपनीची क्षमता नाही. कर्जाचे हप्ते थकल्याने कर्जदारांनी बायजूविरोधात खटला दाखल केला आहे. दरम्यान, बायजूनेही कर्जदारांची अवास्तव मागणी असल्याचे म्हणत उलट गुन्हा दाखल केला आहे. संचालक मंडळातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींनी काल (शुक्रवार) राजीनामा दिला. राजीनाम्याचे वृत्त बायजूने सुरुवातीला फेटाळले होते. मात्र, नंतर या तीनही सदस्यांनी राजीनामा देत असल्याचे अधिकृत घोषित केले. हे तीनही सदस्य कंपनीतील महत्त्वाचे गुंतवणूकदार आहेत.

तीन गुंतवणूकदारांचे संचालक मंडळावरुन राजीनामे

Peak XV Partners (पूर्वीचे नाव Sequoia Capital India)  या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जी. व्ही रवीशंकर, Prosus व्हेंचर कॅपिटलचे प्रमुख Russell Dreisenstock आणि चॅन झकेरबर्ग इन्व्हेस्टमेंटची प्रमुख विवाव वू यांनी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्याने बायजू कंपनीतील सावळा गोंधळा समोर आला आहे. आता बायजूच्या संचालक मंडळावर कंपनीचे मालक रविंद्रन आणि त्यांचे कुटुंबीय आहेत. दरम्यान, कंपनी वार्षिक निकाल जाहीर करण्यास उशीर करत असल्याचे कारण देत डेलॉइट या ऑडिट कंपनीनेही बायजूसोबत काम करण्यास नकार दिला.

बायजू कंपनीचा तोटा वाढत असल्याने गुंतवणूकदार आणि मालक रविंद्रन यांच्यामधील मतभेद बाहेर येत आहेत. 2022 पासून कंपनीच्या तोट्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी मोठी नोकरकपात केली आहे. नुकतेच 1 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला.

अमेरिकेत खटला दाखल

Glas Trust Company सह इतर गुंतवणूकदारांनी अमेरिकेत बायजू विरोधात खटला दाखल केला आहे. कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी बोलणी सुरू आहेत. मात्र, त्यात अद्याप प्रगती नाही. ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने कंपनीचा नफाही कमी झाला आहे. आकाश आणि व्हाइट हॅट ज्युनियर या बायजूच्या उप कंपन्या आहेत. मात्र, त्यातूनही म्हणावा असा नफा येत नाही. जागतिक मार्केटमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी मोठी गुंतवणूक केली असून त्यातून परतावा मिळत नाही.