Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI on Inflation: महागाईमुळे सामन्यांच्या खरेदी क्षमतेत घट, उद्योगधंद्यांवर जाणवतो आहे परिणाम

RBI on Inflation

महागाईच्या उच्च दरामुळे, सामान्य नागरिकांच्या खाजगी वापरावरील खर्चात घट झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांनाच्या उद्योगधंद्यावर देखील थेट परिणाम पहायला मिळतो आहे. सध्या सर्विस सेक्टरमधील कंपन्या धीम्या गतीने वाटचाल करत असून सामान्य नागरिक काटकसरीने पैसे खर्च करत आहेत. यामुळे कंपन्यांचा विस्तार मंदावला असून खाजगी गुंतवणूक कमी होत आहे. आरबीआयने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांनी वाढत्या महागाईचा सामाना केला आहे. परंतु गेल्या महिन्या, दोन महिन्यांचे महागाईचे आकडे पाहिले तर सामान्य नागरिकांना महागाईपासून थोडासा दिलासा जरूर मिळाला आहे. अशातच महागाई दरात तीव्र वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम लोकांच्या वैयक्तिक खरेदीवर झाला आहे, असे खुद्द आरबीआयनेच म्हटले आहे. सध्या जाती किरकोळ आणि घाऊक महागाईत घट झाली असली तरी सामान्य नागरिकांच्या समस्या पूर्णपणे संपलेल्या नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.

महागाईचा प्रभाव अजूनही कायम!

महागाईच्या उच्च दरामुळे, सामान्य नागरिकांच्या खाजगी वापरावरील खर्चात घट झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांनाच्या उद्योगधंद्यावर देखील थेट परिणाम पहायला मिळतो आहे. सध्या सर्विस सेक्टरमधील कंपन्या धीम्या गतीने वाटचाल करत असून सामान्य नागरिक काटकसरीने पैसे खर्च करत आहेत. यामुळे कंपन्यांचा विस्तार मंदावला असून खाजगी गुंतवणूक कमी होत आहे. आरबीआयने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर मायकल देवव्रत पात्रा (RBI Deputy Governor Michael Patra) यांच्या नेतृत्वाखालील टीमने आरबीआय बुलेटिनमध्ये लिहिलेल्या एका लेखात या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या बुलेटिनमध्ये प्रकाशित झालेल्या या लेखात असे म्हटले आहे की, देशातील महागाई कमी करण्याची गरज आहे जेणेकरून ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि सामान्य नागरिकांच्या हाती पैसा खेळता राहील.

देशातील कंपन्या तर तीन महिन्यांनी त्यांचा तिमाही अहवाल सादर करत असतात. या अहवालांचा अभ्यास केला असता सध्या कॉर्पोरेट महसूल तसेच कंपन्यांचा नफा कमी झालेला दिसतो आहे, असे आरबीआयच्या लेखात म्हटले आहे. कंपन्यांची विक्री कमी होत असल्यामुळे त्यांना त्यांच्या आर्थिक विस्तार करता येत नसल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

देशाची अर्थव्यवस्था रुळावर 

आरबीआय बुलेटिनमधील या लेखानुसार, जागतिक पातळीवर जर्मनी, अमेरिका व इतर युरोपियन देश आर्थिक संकटांचा सामना करत असताना भारतासारख्या विकसनशील देशाची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा विकासाच्या दिशेने धावते आहे हे आशादायी चित्र असल्याचे म्हटले आहे. महागाई कमी करण्यासाठी केंद्र सरकार करत असलेले प्रयत्न देखील महत्वाचे असून, वेगवगेळ्या योजनांद्वारे देशात उद्योजकता वाढवली जात आहे असेही या बुलेटीनमध्ये म्हटले आहे. तसेच वाढत्या स्टार्टअपमुळे रोजगार देखील वाढत असून त्याचा परिणाम जाणवू लागला आहे असे देखील स्पष्ट केले आहे.

एप्रिल आणि मे महिन्यात महागाईच्या आघाडीवर मात्र चांगली बातमी आली आहे. अन्नधान्याच्या चलनवाढीत घट झाल्यामुळे मे महिन्यात किरकोळ महागाई 4.25 टक्क्यांवर आली आहे, त्यानंतर पुढील पतधोरण बैठकीत व्याजदराच्या आघाडीवर चांगली बातमी अपेक्षित आहे.