Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Monsoon Sale: मॉन्सून सेलमध्ये कपडे खरेदी करताय? बचतीच्या या टिप्स जरुर वाचा

Monsoon Sale

खरे तर मॉन्सून सेलचा विचार केला तर सगळ्यात जास्त सवलत ही कपड्यांवर दिली जात असते. अनेक गृहिणी या सेलचा फायदा घेत असतात आणि स्वस्तात मस्त आणि आकर्षक अशा कपड्यांची खरेदी करत असतात. तुम्ही देखील जर यंदाच्या मॉन्सून सेलमध्ये कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या टिप्स जरूर फॉलो करा.

यंदा मॉन्सून लांबला आहे. पावसाळा कधी सुरु होतोय याची अनेकजण वाट बघत आहेत. शेतकरी पेरणी करायची म्हणून वाट बघत आहेत तर कॉलेज तरुण मॉन्सून ट्रीपसाठी पावसाची वाट बघत आहेत. तर आपल्यापैकी काही मंडळी मॉन्सून सेलची वाट बघत आहेत.

पावसाळ्याची चाहूल लागताच अनेक दुकानदार मॉन्सून सेलची घोषणा करत असतात. 50 ते 70% सवलतीत विविध वस्तू विक्रीसाठी उलपब्ध करून दिल्या जातात. होम अप्लायन्सेस, डेकोरेशनचे सामान, कपडे, इलेक्ट्रिक वस्तू आदींवर सध्या सेल सुरु झालाय. खरे तर मॉन्सून सेलचा विचार केला तर सगळ्यात जास्त सवलत ही कपड्यांवर दिली जात असते. अनेक गृहिणी या सेलचा फायदा घेत असतात आणि स्वस्तात मस्त आणि आकर्षक अशा कपड्यांची खरेदी करत असतात. तुम्ही देखील जर यंदाच्या मॉन्सून सेलमध्ये कपडे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर खाली दिलेल्या टिप्स जरूर फॉलो करा.

बजेट सेट करा आणि वस्तुंची यादी बनवा 

सर्वात आधी तुम्हांला तुमच्या खरेदीचे बजेट बनवावे लागेल. ऑफर सुरु आहे म्हणून वाटेल तितका पैसा खर्च करणे परवडणारे नाही हे लक्षात असू द्या. ज्या वस्तू प्राधान्याने खरेदी करायच्या आहेत अशाच वस्तू निवडा. कपड्यांची एक लिस्ट बनवा. घरासाठी बेडशिट, पडदे, किचनसाठी आवश्यक पुसणे, पाय पुसणे, फ्रीजचे कवर, सोफ्याचे कवर इत्यादी गोष्टी आधीच तपासून घ्या. या सगळ्या गोष्टींची आपण वारंवार खरेदी करत नाही,या गोष्टींची वर्षातून एकदाच खरेदी होत असल्यामुळे मॉन्सून सेलमध्ये या वस्तू सवलतीच्या दरात तुम्हांला खरेदी करता येऊ शकतात.

तसेच घरातील लहान मुलांसाठी कपडे, तुम्हांला ऑफिसला जाण्यासाठी किंवा घरात घालण्यासाठी आवश्यक असलेल्या कपड्यांची लिस्ट बनवा.

जाहिरातींवर लक्ष ठेवा 

‘मॉन्सून सेल’च्या जाहिरातीवर लक्ष ठेवा. जितक्या लवकर तुम्ही सेलमध्ये खरेदी कराल तितक्या उत्तम गुणवत्तेच्या वस्तू तुम्हाला खरेदी करता येणार आहेत. वेगवेगळ्या स्टोअर्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर देखील नजर ठेवा. किमतीची आणि सवलतीची देखील तुलना करा आणि त्यानंतरच खरेदीचा विचार करा. स्टॉक संपण्यापूर्वी खरेदी करणे कधीही चांगले, त्यामुळे वेळेत सेलचा लाभ घेणे गरजेचे आहे हे लक्षात असू द्या.

गुणवत्तेचा विचार करा

स्वस्तात एखादी गोष्ट मिळते आहे म्हणजे ती खरेदी केलीच पाहिजे असे नाही हे कायम लक्षात ठेवा. तुम्ही जी लिस्ट बनवली आहे त्यातील आवश्यक त्या गोष्टीच खरेदी करा. अनावश्यक गोष्टी खरेदी करून तुमचे बजेट बिघडवू नका.

तसेच पैशांची बचत करणे महत्त्वाचे असले तरी वस्तूच्या गुणवत्तेशी अजिबात तडजोड करू नका. तुम्ही खरेदी केलेली उत्पादने चांगल्या दर्जाची आहेत आणि दीर्घकाळात तुम्हाला चांगली सेवा देतील याची खात्री करा. स्वस्त पण कमी दर्जाच्या वस्तू विकत घेतल्यास भविष्यात तुम्हाला त्याची जास्त किंमत मोजावी लागू शकते, हे लक्षात ठेवा.

रिटर्न पॉलिसी चेक करा

बहुतांश सेलमध्ये एकदा की वस्तू खरेदी केल्या की त्या बदलून दिल्या जात नाही. त्यामुळे खरेदी करताना रिटर्न पॉलिसी चेक करा. त्यामुळे ज्या गोष्टींबद्दल तुम्ही साशंक असाल अशा वस्तू खरेदी करणे टाळा.

या साध्यासोप्या टिप्सचे अनुसरण करून, मॉन्सून सेलमध्ये खरेदी करताना तुम्ही तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ शकता.