Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगल 'या' राज्यात उभारणार ग्लोबल फिनटेक सेंटर; 10 बिलिअन डॉलरची करणार गुंतवणूक

PM Modi Sundar Pichai Meet at Washington

Image Source : www.commons.wikimedia.org

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेत भेट घेऊन भारतात मोठी गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले.

PM Modi-Sundar Pichai Meet: गुगल गुजरातमध्ये ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उभारणार असल्याचे सांगून भारतातील डिजिटायझेशनसाठी 10 बिलिअन डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचा पुनर्उच्चार केला आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी शुक्रवारी (दि. 23 जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची वॉशिंग्टन येथे भेट घेतल्यानंतर ही घोषणा केली.

नरेंद्र मोदी यांना या ऐतिहासिक अमेरिकेच्या दौऱ्यात भेटणे ही माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. मोदींसोबत झालेल्या भेटीत गुगल कंपनी  भारतात डिजिटायझेशनसाठी 10 बिलिअन डॉलरची गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर आम्ही गुजरातमधील गिफ्ट सिटीमध्ये (Gujarat International Finance Tec-GIFT City) ग्लोबल फिनटेक ऑपरेशन सेंटर उभारणार आहोत, असे सुंदर पिचाई (Sundar Pichai, Google CEO) यांनी एनएनआय या संस्थेशी बोलताना सांगितले.

गुंतवणुकीबाबत सांगताना पिचाई म्हणाले की, भारतात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करत आहोत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर आम्ही सध्या काम करत आहोत. सध्या आमचे 100 भाषांवर काम सुरू असून, लवकरच भारतातील भाषांवर काम करणारे आमचे बॉट (Bot) येतील.

सुंदर पिचाई यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या सरकारच्या फ्लॅगशिप प्रोग्रॅमचे कौतुक केले. भारताने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून जे मॉडेल स्वीकारले आहे. ते नक्कीच इतर देशांसाठी आदर्शवत आहे आणि मला खात्री आहे की, इतर देश याचा ब्ल्यू प्रिंट म्हणून वापर करतील.

जुलै, 2020 मध्ये गुगलने भारतात 10 बिलिअन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची घोषणा केली होती आणि ही गुंतवणूक येणाऱ्या 5 ते 7 वर्षात केली जाईल. ज्याचा उपयोग जगभरातील प्रमुख बाजारपेठांना करता येईल, असेही पिचाई यांनी म्हटले होते. तसेच त्यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये महिलांद्वारे राबवल्या जाणाऱ्या स्टार्टअपमध्ये 300 मिलिअन डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते.