उन्हाळा संपत आलाय, पावसाळ्याची चाहूल लागलीये आणि वेगवगेळ्या कंपन्यांनी आता मॉन्सून सेल सुरु केले आहेत. उन्हाळ्यात ज्या एअर कंडीशनरच्या किमती गगनाला भिडल्या होत्या, तेच एअर कंडीशनर आता तुम्ही निम्म्या किमतीत खरेदी करू शकाल. पावसाळ्यात एसीला तशीही मागणी कमी असते त्यामुळे एसीचे दर देखील कमी होतात. तुम्ही देखील एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुम्ही जाणून घ्यायला हवी. आम्ही तुम्हाला स्प्लिट एसी वर मिळणाऱ्या मोठ्या डिस्काउंटबद्दल सांगणार आहोत.
ही सवलत सॅमसंगच्या स्प्लिट एसी वर सध्या दिली जात आहे. तुम्हाला देखील 50 % सवलतीत स्प्लिट एसी खरेदी करायचा असेल तर तुम्ही फ्लिपकार्टची ही ऑफर जाणून घेतली पाहिजे. फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाईटवर एसी खरेदीवर खास सवलती दिल्या जात आहेत तसेच बँक ऑफर्सचाही लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.
सॅमसंग 1.5 टन स्प्लिट एसी
फ्लिपकार्टवर सॅमसंग कंपनीचा 1.5 टन इन्व्हर्टर एसी जवळपास निम्म्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. या एसीचे बाजारमूल्य 65,990 रुपये इतके आहे. मात्र या एसीच्या खरेदीवर तुम्हांला फ्लिपकार्ट 40% सवलत देत आहेत. त्यामुळे हा एसी तुम्ही थेट 38,999 रुपयांना खरेदी करू शकता. जरा थांबा, ही ऑफर इथेच संपत नाहीये. तुम्हाला यावर आणखी ऑफर दिली जात आहे. HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने EMI वर जर तुम्ही AC खरेदी केला तर तुम्हाला अतिरिक्त 1250 रुपयांची सूट मिळणार आहे. एवढेच नाही तर सॅमसंग कंपनीकडून या AC वर 1 वर्षाची वॉरंटी देखील दिली जाणार आहे.
सॅमसंगच्या 1.5 टन स्प्लिट एसीची वैशिष्ट्ये
सॅमसंग एसी कंप्रेसरची वॉरंटी कंपनीने 10 वर्षांसाठी दिली आहे. हा एसी 5 स्टार रेटिंगसह येतो, त्यामुळे विजेची बचत देखील होणार आहे. कोणतेही इलेक्ट्रीक उपकरण घेताना 5 स्टार रेटिंग जरूर चेक करा. यामुळे तुमच्या वीजबिलात सुमारे 25% बचत होऊ शकते. AC मध्ये तुम्हाला ऑटो रीस्टार्ट पर्याय आणि कॉपर कंडेन्सर दिला जाणार आहे.
एअर कंडिशनरची घ्या काळजी
खरे तर एसीची सर्व्हिसिंग प्रत्येक ऋतूमध्ये आवश्यक असते. केवळ उन्हाळ्यात एसी चालवून पावसाळा आणि हिवाळ्यात जर तुम्ही तो बंद ठेवत असाल तर त्यात बिघाड होऊ शकतो. एसी हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे हे लक्षात घ्या. एअर कंडीशनरची वेळोवेळी सर्विसिंग होणे गरजेचे आहे. दररोज किमान 10 मिनिटे तरी चालवला पाहिजे, जेणेकरून मशीन सुस्थितीत राहील. उन्हाळ्यामध्ये एसीचे भाव वाढतात, त्यामुळे सेलमध्ये जर सवलतीच्या दरात एसी मिळत असतील तर ही डील तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.