Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Amazon Investment in India: ग्लोबल जायंट अ‍ॅमेझॉन भारतात 15 बिलियन डॉलर गुंतवणार

Amazon India

अमेरिकेतील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉन भारतामध्ये तब्बल 15 बिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहेत. इ-कॉमर्स, रिटेल, डेटा/क्लाऊड सेंटर्स, वाहतुकीसह इतर अनेक क्षेत्रात अ‍ॅमेझॉनने भारतात पाय रोवले आहेत. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅमेझॉनने एअर कार्गो सुविधा भारतात सुरू केली आहे.

Amazon Investment in India: अमेरिकेतील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉन भारतामध्ये तब्बल 15 बिलियन डॉलर गुंतवणूक करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर गेले असता अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जेसी (Amazon CEO andy jassy and PM modi Meet) यांनी ही घोषणा केली. त्यांनी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. भारतातील व्यवसाय आणि गुंतवणुकीवर दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली. 

इ-कॉमर्स, रिटेल, डेटा सेंटर्स, वाहतूक आणि साठवणूक क्षेत्रात अ‍ॅमेझॉनची भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक आहे. काही महिन्यांपूर्वी अ‍ॅमेझॉनने एअर कार्गो ही सुविधा भारतात सुरू केली. या सेवेचा आणखी विस्तार होणार आहे. त्यासाठी भांडवलही गुंतवण्यात येत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याबरोबरच रोजगार निर्मितीही होईल. भारतातील बंगळुरु येथे अ‍ॅमेझॉनचे मुख्यालय असून अनेक शहरांमध्ये कार्यालये आहेत.

भारतातील एकूण गुंतवणूक 26 बिलियन डॉलर ( Amazon Total investment in India)

15 बिलियन डॉलर गुंतवणुकीसह आता अ‍ॅमेझॉनची भारतातील एकूण गुंतवणूक 26 बिलियन डॉलर इतकी होईल. "पंतप्रधान मोदींसोबत माझी सकारात्मक चर्चा झाली. भारताचे आणि आमचे (अमेरिकेचे) ध्येय समान आहे. अ‍ॅमेझॉन हा भारतातील एक मोठा गुंतवणूकदार आहे. आतापर्यंत आम्ही 11 बिलियन डॉलर गुंतवणूक केली असून आणखी 15 बिलियन डॉलर येत्या काळात गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत मिळून काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असे सीईओ अँडी जेसी यांनी म्हटले. 

कोणत्या विषयांवर चर्चा झाली?

अ‍ॅमेझॉन सीईओ अँडी जेसी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात सकारात्मक चर्चा झाल्याचे ट्विट भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील केले आहे.  (Amazon CEO andy jassy and PM modi Meet) इ-कॉमर्स आणि वाहतूक क्षेत्रातील भविष्यातील संधी याबाबत चर्चा झाल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे. "लहान आणि मध्यम उद्योगांना डिजिटल बनवणं आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. भारतीय कंपन्यांची उत्पादने जगभर निर्यात करू, असे अँडी जेसी यांनी म्हटले.

गुगल 10 बिलियन भारतात गुंतवणार

आणखी एक अमेरिकन टेक जायंट गुगल भारतामध्ये 10 बिलियन डॉलर गुंतवणार आहेत. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतील. गुगलची ही गुंतवणूक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये असेल. गुगल गुजरातमध्ये फिनटेक ऑपरेशन सेंटरचीही स्थापना करणार आहे.

गुगल, अ‍ॅमेझॉनने भारतामध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली. मात्र, मागील काही महिन्यांपासून दोन्ही कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. नफा कमी झाल्याने कंपनीची पूनर्बांधनी करण्यासाठी पावले उचलल्याचं दोन्ही कंपन्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे सध्या घोषणा केलेली गुंतवणूक प्रत्यक्षात भारतात कधी येते हे येत्या काळात कळेल.