Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Best Schools of India 2023: जाणून घ्या भारतातील दर्जेदार शाळा, जिथे प्रवेशासाठी लागते मोठी रांग!

Top government schools in India: आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि स्पर्धेच्या युगात ते टिकून राहावेत अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. देशातील या नामवंत शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी पालक इच्छुक असतात. जाणून घेऊया भारतातील काही दर्जेदार शाळा आणि तेथील सुविधांबद्दल.

Read More

Mass Layoffs : डिस्नेच्या कर्मचाऱ्यांना भरली धडकी, कॉस्ट कटिंगची पहिली फेरी जाहीर

Mass Layoffs : मनोरंजन क्षेत्रातली मोठी कंपनी असलेल्या डिस्नेनं (Disney) कॉस्ट कटिंग करणार असल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे इथल्या कर्मचाऱ्यांना धडकी भरलीय. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात (Cost Cutting) केली जाणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय. त्यातच ही तर केवळ पहिली फेरी असणार आहे. त्यामुळे कंपनी नेमकी काय भूमिका घेते, हे महत्त्वाचं आहे.

Read More

EPFO Recommend for Interest Hike: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याज? 'EPFO'ने केली शिफारस

EPF Interest Rate Hike: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या ईपीएफओच्या बैठकीतून एक खूशखबर समोर आली आहे.आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याद देण्याची शिफारस ईपीएफओने केली आहे. यासंबधीचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. अर्थमंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Read More

IPL 2023 - Jio Backup Plan: रिलायन्स जिओची IPL साठी भन्नाट ऑफर, 198 रुपयांत 28 दिवस मिळेल अनलिमिटेड डेटा

IPL 2023 - Jio Backup Plan: ने नुकताच ग्राहकांसाठी एक प्लॅन लाँच केला आहे. जिओ IPL 2023 च्या आधी जिओने हा बॅकअप प्लॅन जाहीर केला आहे. ब्रॉडबँड धारकांना या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे.JioCinema अॅपवर संपूर्ण आयपीएल मोफत पाहता येणार आहे.

Read More

Gurugram Money laundering case : युनिटेकवर धाड! गुरुग्राममधल्या भूखंडावर ईडीचा 'ताबा'

Gurugram Money laundering case : मनी लॉंड्रिंगप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ED) हरयाणाच्या गुरुग्राममध्ये मोठी कारवाई केलीय. तब्बल 245 कोटी रुपयांच्या 15 जमीन पार्सलचा ताबाच ईडीनं आपल्याकडे घेतलाय. हे सर्व भूखंड बेनामी असल्याचं ईडीचं म्हणणं आहे. या सर्व घोटाळ्यासंबंधी ईडीनं निवेदनात म्हटलं आहे.

Read More

PAN-Aadhaar Link: आधार-पॅन लिंक नसेल तर NPS खाते होऊ शकते बंद; फक्त चार दिवस शिल्लक

आधार-पॅन कार्ड लिंक नसेल तर पुढील महिन्यापासून NPS खाते बंद होऊ शकते. तुमच्या नॅशनल पेन्शन सिस्टिमच्या खात्यासंबंधित कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत. पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. 1 एप्रिलपासून आणखी दंडही होऊ शकतो.

Read More

बँकांनी कर्जदारांचे म्हणणे ऐकल्याशिवाय खाती ‘फ्रॉड’ म्हणून घोषित करू नयेत- सुप्रीम कोर्ट

Fraud Bank Accounts: कुणालाही फ्रॉड म्हणून घोषित करताना कर्जदाराला त्याचे स्पष्टीकरण देण्याची मुभा दिली जावी असा आदेश कोर्टाने बँकांना दिला आहे. कर्जदाराने दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यावर बँका कारवाई करू शकतात असेही न्यायालयाने म्हटले आहे.

Read More

Mass layoffs : कितीही आर्थिक मंदी असो, आम्ही कर्मचारी कपात करणार नाही..., 'या' ई-कॉमर्स कंपनीनं ठेवला आदर्श

कर्मचारी कपात करण्याचा नवाच ट्रेंड सध्या सुरू झालाय. आर्थिक मंदीचं कारण देत मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना नारळ देत आहेत. कोविड आणि यादरम्यान अर्थव्यवस्थेचं झालेलं नुकसान यामुळे कंपन्यांनी आपला तोटा भरून काढण्यासाठी कामगारांना घरचा रस्ता दाखवला.

Read More

Vande Bharat train seats : 'वंदे भारत'चं 225 कोटींचं कंत्राट टाटा स्टीलला... प्रवाशांना मिळणार 'या' सुविधा

Tata Steel : मेक इन इंडिया (Make in India) या उपक्रमांतर्गत वंदे भारत या अत्याधुनिक रेल्वेत चकचकीत अशा आसनांची व्यवस्था करण्यात आलीय. टाटा उद्योगसमुहाच्या टाटा स्टीलनं याचं कंत्राट मिळवलं आहे. वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) या गाडीसाठी जागतिक दर्जाची आसनव्यवस्था आणि इंटिरिअरचं हे काम टाटा स्टीलकडे आहे.

Read More

Bhavishyat Credit Card: उद्योगासाठी बँका युवकांना देणार क्रेडिट कार्ड, पश्चिम बंगाल सरकारची नवी योजना

Credit Card for Business: ‘भविष्यत' क्रेडीट कार्ड योजनेची सध्या देशभरात चर्चा सुरु आहे. पश्चिम बंगाल सरकारच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील युवकांना उद्योगधंद्यासाठी आर्थिक मदत मिळवून देणे ही या योजनेमागची कल्पना असल्याचे सरकारने म्हटले आहे.

Read More

Rahul Gandhi on Adani: अदानींच्या बनावट कंपन्यांमध्ये 20 हजार कोटींची गुंतवणूक कुणाची? राहुल गांधींचा सवाल

Gautam Adani: गौतम अदानी यांच्या देशभरात आणि विदेशातही अनेक शेल कंपन्या (बनावट) असून त्यात 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले आहेत असा थेट सवाल राहुल गांधींनी केला आहे. हा अदानींचा पैसा नाही, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

Read More

Kisan Credit Card : घटता घटता घटे..! किसान क्रेडिट कार्डांच्या संख्येय होतेय घट, काय आहेत कारण?

शेतकऱ्यांसाठीच्या केंद्र सरकारच्या विविध योजनांतर्गत किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही योजनादेखील येते. मात्र मागील काही दिवसांपासून या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. अनेक शेतकरी आपला क्रेडिट स्कोअर राखण्यात अपयशी ठरत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री जयंत सिन्हा (Jayant Sinha) यांनीच याबाबत संसदेत माहिती दिलीय.

Read More