PAN-Aadhaar Link: नॅशनल पेन्शन सिस्टिममध्ये देशभरातील सरकारी आणि खासगी क्षेत्रातील लाखो नागरिकांचे खाते आहे. निवृत्तीनंतरची चिंता दूर करण्यासाठी NPS ला नागरिकांतून मोठा प्रतिसाद आहे. जर तुमचे NPS खाते असेल आणि आधार पॅन कार्ड लिंक नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. पॅन-आधार लिंक केलेले नसेल तर NPS खात्यांवर केले जाणाऱ्या व्यवहारांवर निर्बंध लावले जाऊ शकतात. म्हणजेच तुमचे NPS खाते बंद होऊ शकते. त्यामुळे जर आधार-पॅन लिंक नसेल तर घाई करण्याची हीच वेळ आहे.
NPS खातेधारकांवर काय परिणाम होणार?
पॅन-आधार लिंक नसेल तर NPS खात्याचे KYC पूर्ण झाले नाही, असे समजण्यात येऊ शकते. कारण ही दोन्ही कार्ड ओळखपत्र म्हणून महत्त्वाचा पुरावा आहे. 1 एप्रिलपासून NPS कडून तुम्हाला KYC पुन्हा करण्याबाबत सांगण्यात येऊ शकते. म्हणजे पॅन आधारशी लिंक केल्यानंतरच तुमचे NPS खाते पुन्हा सुरू होईल. तोपर्यंत NPS खात्यावरील व्यवहार करता येणार नाहीत.
पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे. एक हजार रुपये दंड भरून लिंक करता येते. 31 मार्च नंतर ज्यांनी पॅन-आधार लिंक केले नसेल त्यांना किती दंड आकारला जाईल, याबाबची माहिती आयकर विभागाने अद्याप दिली नाही. NPS खात्यावरील सर्व व्यवहार सुरळीत चालू राहण्यासाठी आणि दंड आकारला जाऊ नये, यासाठी आधार पॅन लिंक करा, असे Pension Fund Regulatory And Development Authority (PFRDA) ने म्हटले आहे.
PAN हा खातेधारकाचा महत्त्वाचा ओळख क्रमांक आहे. सोबतच KYC साठीचा महत्त्वाचा दस्ताऐवज आहे. NPS खातेधारक आणि संबंधित intermediaries ला KYC चे नियम लागू आहेत, असे PFRDA ने म्हटले आहे. पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. त्यानंतर ज्यांनी लिंक केले नसेल त्यांचे पॅन Inoperative म्हणजेच बंद होईल. पॅन आधार लिंक नसणाऱ्यांना 31 मार्च 2023 नंतर दंडही होऊ शकतो. यासंबंधी Central Board of Direct Taxes (CBDT) एक सर्क्युलर काढले आहे. पॅन आधार लिंक करण्याची सविस्तर माहिती तुम्हाला या लिंक वर मिळेल.