Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI Penalty on Banks: बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँकेने 'या' 6 बँकांना ठोठावला लाखोंचा दंड

RBI Penalty on Banks

Image Source : www.livemint.com

RBI Penalty on Banks: रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे पालन देशातील 6 बँकांनी न केल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. या बँकांना शिक्षा स्वरुपात लाखो रुपयांचा दंड आकारला गेला आहे. नेमकं कारण काय आणि दंडाची रक्कम किती याबद्दल जाणून घेऊयात.

खासगी आणि सरकारी बँकिंग व्यवस्थेचा कारभार सुरळीत चालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) काम करते. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून काही नियम आणि मापदंड निश्चित करण्यात आले आहेत. या नियमांचे पालन बँकांनी केले नाही, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा किंवा त्यांना दंड ठोठावण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या याच नियमांचे देशातील 6 बँकांनी उल्लंघन केले आहे. ज्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड 1.10 लाखांपासून ते 3 लाखांपर्यंत आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या बँका नेमक्या कोणत्या आहेत आणि दंडाची रक्कम किती आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

‘या’ 6 बँकांना RBI ने ठोठावला दंड  

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, 1950 च्या नियमांकडे दुर्लक्ष करून डिपॉजिट रकमेवर व्याज देताना बँकांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यामध्ये देशातील अलीगढ जिल्हा सहकारी बँक (Aligarh Zila Sahkari Bank), दिल्ली नागरिक सहकारी बँक (Delhi Nagrik Sehkari Bank), कोलकाता पोलीस सहकारी बँक (Kolkata Police Co-operative Bank), मेहसाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Mehsana District Central Co-operative Bank), व्यापारी सहकारी बँक मर्यादित (Vyapari Sahakari Bank) आणि श्री गणेश सहकारी बँक लिमिटेड (Shri Ganesh Sahakari Bank Ltd) या बँकांचा  समावेश आहे. नियमांचे उल्लंघन केल्याने रिझर्व्ह बँकेने त्यांना 1.10 लाखापासून ते 3 लाखांपर्यंत दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे ग्राहकांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष काळजी घेतली आहे.

कोणत्या बँकेला नेमका किती दंड ठोठवला जाणून घ्या

bank-1.jpg

Source: https://bit.ly/3lGPvpn