Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IPL 2023 - Jio Backup Plan: रिलायन्स जिओची IPL साठी भन्नाट ऑफर, 198 रुपयांत 28 दिवस मिळेल अनलिमिटेड डेटा

Jio Backup Plan

IPL 2023 - Jio Backup Plan: ने नुकताच ग्राहकांसाठी एक प्लॅन लाँच केला आहे. जिओ IPL 2023 च्या आधी जिओने हा बॅकअप प्लॅन जाहीर केला आहे. ब्रॉडबँड धारकांना या प्लॅनचा लाभ घेता येणार आहे.JioCinema अॅपवर संपूर्ण आयपीएल मोफत पाहता येणार आहे.

IPL स्पर्धेचा काउंटडाऊन सुरु झाला असून Reliance Jio ने ग्राहकांसाठी एक जबरदस्त मोबाईल प्लॅन लाँच केला आहे. जिओने या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लँडलाईन व्हॉईस कॉल्स देखील ऑफर केले आहेत. या प्लॅन अंतर्गत ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत डेटा उपलब्ध होणार आहे. हा एक बॅकअप प्लॅन आहे असे कंपनीने म्हटले आहे.

प्रतिस्पर्धी कंपन्यांना आव्हान

Jio नेहमी उत्तम कनेक्टिव्हिटी आणि नेटवर्क ग्राहकांना देत आहे. शुक्रवारपासून सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सिझन सुरु होण्याच्या आधी हा प्लॅन लाँच केला आहे. JioCinema अॅपवर संपूर्ण आयपीएल मोफत पाहता येणार आहे. नवीन ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी प्लॅन टुर्नामेंट सुरु होण्याच्या एक दिवस आधी 30 मार्चपासून उपलब्ध होईल. सध्या, कंपनी 30 Mbps वेगाने अमर्यादित डेटासह 399 रुपये प्रति महिना या शुल्कासह ब्रॉडबँड प्लॅन ऑफर करते. जिओचा प्रतिस्पर्धी Bharti Airtel चा 499 रुपयांचा  ब्रॉडबँड प्लॅन 40 Mbps पासून सुरु होतो.

Jio करणार मोफत प्रक्षेपण (Jio will Broadcast IPL  for free)

नवीन ब्रॉडबँड प्लॅनमुळे स्मार्टटीव्हीवर घरातूनच आयपीएलचा आनंद घेता येईल. यामुळे रिलायन्सला प्रेक्षकांच्या संख्येबाबत IPLचे अधिकृत अधिकार असलेल्या डिस्ने स्टारला मागे टाकणे शक्य होणार आहे. जिओ ही स्पर्धा मोफत दाखवणार आहे. 7 कोटी पेक्षा जास्त वापरकर्त्यांसह होम ब्रॉडबँड सेवा ऑफर करत जिओ या मालिकेत आघाडीवर आहे. त्यानंतर बीएसएनएल (BSNL) आणि भारती एअरटेल  (Airtel) यांचा क्रमांक लागतो.

जिओ फायबर कनेक्शन कसे बुक करावे? (How to book Jio Fiber Connection?)

तुम्ही Jio रिटेलर किंवा पार्टनरद्वारे 99 रुपये भरून Jio Fiber कनेक्शन घेऊ शकता. याशिवाय Jio.com/fiber वर भेट देऊन किंवा 600086008 वर कॉल करून देखील कनेक्शन बुक केले जाऊ शकते. मनोरंजन अपग्रेडप्लॅनसह मोफत 4K सेट-टॉप बॉक्स देखील उपलब्ध आहे. ग्राहकबॅकअप प्लॅनसाठी (990 रुपये) पाच महिन्यांसाठी एकाच वेळी पैसे देऊ शकतात. ज्यामध्ये त्यांना इन्स्टॉलेशनसाठी 1490 रुपये आणि 500 रुपये द्यावे लागतील. या प्लॅनवरही जीएसटी लागू आहे.

(News Source : HBL, BusinessToday)