Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Earn And Learn Tips: काम करून शिक्षण घेण्याकरिता उन्हाळ्याच्या सुट्टीत मुली करू शकतात 'असे' काही क्लासेस..

classes

Image Source : Classes

Earn And Learn Tips: सरकारने मुलींसाठी अनेक योजना आणल्यात. पण अजूनही काही कारणास्तव अनेक मुली त्यापासून वंचित राहतात. मग त्यांना शिक्षण घेण्यासाठी काही न काही मार्ग शोधावे लागतात. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये काही क्लासेस करून मुली स्वतः कमाई करू शकतात.

Earn And Learn Tips: नागपूर जिल्ह्यातील काटोल येथील रुचिका. सध्या अकराविला शिकत आहे. दहावी पर्यंतचे शिक्षण आई वडिलांनी पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तिला पुढील शिक्षणसाठी मार्ग शोधावा लागला. दहावीची परीक्षा झाल्यानंतर रुचिकाने मेहंदी क्लास केले. आणि आता ती गावातील महिलांचे मेहंदीचे ऑर्डर घेऊन कमाई करते. त्याच पैशातून ती आपले शिक्षण पूर्ण करते. 

मेहंदीचे ऑर्डर घेतल्या नंतर मिळणारे पैसे हे डिझाईनवर अवलंबून असतात. साधारणतः 500 पासून ऑर्डर सुरू होतात आणि 3000 रुपयांपर्यंत जातात.  शिक्षण घेतांना अभ्यास करून त्यासोबत महिन्यातून मेहंदीच्या 2 ते 3 ऑर्डर जारी घेतल्या तरी त्यातुन शिक्षण पूर्ण करता येऊ शकते, असे रुचिकाचे म्हणणे आहे. 

नुकतेच दहावी आणि बारावीचे पेपर संपलेत. काही विद्यार्थी कमवा आणि शिका हे उद्दिष्ट समोर ठेवून करियरची सुरवात करतात. त्या मुलींसाठी काही क्लासेस आहेत, ज्या माध्यमातून त्यांचे शिक्षण आणि कमाई दोन्ही होऊ शकते. 

शिवण क्लास 

sewing-class.jpg

क्लास फी 2000 पर्यंत असते. कोर्सचा कालावधी 3 महीने असतो. क्लास झाल्यानंतर इन्कम प्रत्येक दिवशी 300 ते 500 ( काम करण्यावर अवलंबून असते.) 

मेहंदी क्लास 

mehndi-class.jpg

क्लास फी 1500 पर्यंत असू शकते. या कोर्सचा कालावधी 2 महीने असतो. तुम्ही जितक्या लवकर सुंदर मेहंदी काढायला सुरवात कराल त्यानुसार तुमचा कालावधी सुद्धा कमी होऊ शकतो. मेहंदी मधून येणारे इन्कम एक ऑर्डर 500 ते 3000 पर्यंत असते. 

कम्प्युटर क्लास 

computer-class.jpg

कम्प्युटर क्लास फी 4000 रूपयांच्या वर असते. कोणताही कोर्स कालावधी 3 महीने असतो. यातून तुम्ही पार्ट टाइम जॉब करून 3000 ते 5000 महिना कमावू शकता. उदा. CSC सेंटर, मेडिकल 

टयूशन क्लासेस 

tution-class.jpg

तुमच्या गावातील गरजू मुलामुलींना टयूशन देऊन महिन्याला 1000 ते 5000 कमावू शकता. तुमच्या आवडत्या विषयाची टयूशन तुम्ही मुलांना देऊ शकता. तुमचं आर्थिक सोर्स होईल आणि तुम्ही ज्ञानार्जनाचे कामही त्या माध्यमातून करू शकता. 

डान्स क्लासेस

dance-class.jpg

डान्स क्लास फी  3000 पर्यंत असते. यासाठी कालावधी 2 महीने लागतो. पण तुम्ही जितक्या लवकर सांगितलेल्या स्टेप फॉलो कराल तितक्या लवकर तुमचं कोर्स समाप्त होतो. आता मुलांचे गॅदरिंग, साखरपुडा, लग्न, बारसे आणखी काही महिलांचे कार्यक्रम असतात. त्यात महिला डान्स करू इच्छितात. त्यांना डान्स शिकवून तुम्ही त्यातुन कमाई करू शकता. 

हे सर्व क्लासेस कमवा आणि शिका हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करणाऱ्या मुलींसाठी बेस्ट असू शकतात.