Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PAN, Aadhaar linking deadline: अलर्ट..! पॅन-आधार लिंक करण्यास मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येईल लिंक

PAN, Aadhaar linking deadline

पॅन आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. मात्र, आयकर विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता शेवटच्या मिनिटाला धावपळ करण्याची गरज नाही. आरामात आधार पॅन लिंक करता येईल. मात्र, नव्या डेडलाईनपर्यंत लिंक केले नाही तर करदात्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. तसेच पॅनकार्डही बंद होईल.

PAN, Aadhaar linking deadline: तुम्ही जर पॅन आधार लिंक केलं नसेल तर घाबरून जाऊ नका. आयकर विभागाने लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आधीच्या सरकारी आदेशानुसार 31 मार्च ही पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख होती. मात्र, आता 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मार्च एंड जवळ आल्याने अनेकांनी पॅन आधार लिंक करण्यासाठी धावपळ सुरू केली होती. (PAN, Aadhaar linking deadline extended) त्यांना आता घाई करण्याची गरज नाही. पुढील तीन महिन्यातही आधार-पॅन लिंक करता येईल. यासंबंधी आयकर विभागाने आदेश जारी केला आहे.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT) विभागाने आज 28 मार्चला याबाबत सर्क्युलर जारी केले आहे. "करदात्यांना पॅन-आधार लिंक करण्यासाठी आणखी वेळ मिळावा म्हणून हा निर्णय घेतला आहे. आयकर कायदा 1961 नुसार 1 जुलै 2017 पर्यंत ज्यांना पॅन कार्ड मिळाले आहे; त्यांना पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य आहे. यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2023 होती. मात्र, आता यासाठीची मुदत 30 जून 2023 करण्यात आली आहे, असे CBDT ने आदेशात म्हटले आहे.

30 जून 2023 पर्यंत आधार पॅन लिंक न केल्यास काय होईल? (What will happen if PAN-Aadhaar not linked?)

ज्यांनी पॅन-आधार लिंक केले नसेल त्यांचे पॅन 1 जुलै 2023 पासून बंद होईल. पॅन कार्ड बंद झाल्याचा परिणाम करदात्यांवरही होईल.

  • पॅन आधार लिंक नसणाऱ्या करदात्यांना रिफंड (परतावा) मिळणार नाही.
  • ज्या कालावधीपर्यंत पॅन आधार लिंक नसेल त्या कालावधीत रकमेवरील व्याजही मिळणार नाही.
  • आयकर कायदा 1961 नुसार TDS आणि TCS जास्त दराने वजावट किंवा जमा केले जातील. 
  • एक हजार रुपये शुल्क भरून पॅन आधार 30 दिवसांत लिंक करता येईल.

मात्र, त्यासाठी 1 हजार रुपये शुल्क भरावे लागेल. (PAN-Aadhaar link last new last date) पॅन आधार लिंक करण्यापासून ज्यांना सूट दिली आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय लागू नसेल. काही ठराविक राज्ये, अनिवासी भारतीय, जे भारताचे नागरिक नसतील त्यांना हा निर्णय लागू नसेल. तसेच मागील वर्षात ज्यांचे वय 80 किंवा त्यापेक्षा जास्त होते, त्यांनाही हा निर्णय लागू नसेल. आतापर्यंत 51 कोटी नागरिकांनी आधार पॅन लिंक केल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.