Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EPFO Recommend for Interest Hike: कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याज? 'EPFO'ने केली शिफारस

EPFO Interest Rate

EPF Interest Rate Hike: देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या ईपीएफओच्या बैठकीतून एक खूशखबर समोर आली आहे.आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याद देण्याची शिफारस ईपीएफओने केली आहे. यासंबधीचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. अर्थमंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या ईपीएफओच्या बैठकीतून एक खूशखबर समोर आली आहे.आर्थिक वर्ष 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर 8.15% व्याज देण्याची शिफारस ईपीएफओने केली आहे. यासंबधीचा प्रस्ताव अर्थमंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे. अर्थमंत्रालयाने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

आर्थिक वर्ष 2021-22 साठी ईपीएफवर 8.10% इतके व्याज आहे. त्यात 0.05% वाढ करण्याची शिफारस ईपीएफओने केली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची 233 वी बैठक आज दिल्लीत पार पडली. या बैठकीत ईपीएफवर 8.15% व्याज देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. देशभरात ईपीएफओचे 6.5 कोटींहून अधिक सभासद आहेत. 

मागील पाच वर्षात ईपीएफच्या व्याजदरात घसरण झाल्याचे दिसून आले आहे. केंद्र सरकारने अल्प बचतीचे व्याजदर कमी केल्याचे त्याचा परिणाम ईपीएफवर दिसून आला होता.मात्र महागाई वाढत असल्याने रिझर्व्ह बँकेने रेपो दर वाढवला. बँकांची कर्जे महागली असून ठेवींचे दर देखील वाढत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी भविष्य निर्वाह निधीवर जादा व्याज मिळेल, अशी अपेक्षा ईपीएफओच्या सभासदांनी व्यक्त केली होती.

ईपीएफवर वर्ष 2015-16 मध्ये सर्वाधिक 8.8% व्याज देण्यात आले होते. मात्र त्यानंतर व्याजाचा दर कमी होत गेला. वर्ष 2016-17 मध्ये 8.65% आणि 2017-18 मध्ये 8.55% असे व्याज देण्यात आले होते. 2018-19 मध्ये सरकारने व्याजदरात कपात करत तो 8.65% इतका केला. 2019-20 मध्ये तो 8.65% इतका ठेवण्यात आला तर वर्ष 2020-21 मध्ये तो 8.55% इतका कमी करण्यात आला. ईपीएफवर दिले जाणारे व्याज हे त्याआधीच्या सात वर्षांतील सर्वात कमी व्याज होते.

वर्ष 2021-22 मध्ये ईपीएफवरी व्याजदरात सरकारने कोणताही बदल केला नाही. तो 8.55% इतका ठेवण्यात आला होता. गेल्या वर्षी सरकारने अल्प बचत योजनांप्रमाणेच ईपीएफवरील व्याजाला मोठी कात्री लावली. वर्ष 2022-23 साठी 'ईपीएफ'चा व्याजदर 0.40% ने कमी करुन तो 8.10% इतका केला होता.  

ईपीएफवर व्याज ठरण्याची पद्धती

  • कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीमधील शिल्लक रकमेवर दरवर्षी व्याज दिले जाते.
  • केंद्रीय अर्थमंत्रायल ईपीएफओच्या शिफारशींवर निर्णय घेते.
  • दर महिन्याला खात्यातील शिल्लक रकमेवर व्याजाचे कॅल्युलेशन होते मात्र व्याजाची संपूर्ण रक्कम वर्ष पूर्ण झाल्यावर अदा केली जाते.
  • 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या वर्षासाठी ईपीएफवर 8.10% व्याज जाहीर करण्यात आले आहे.
  • सलग 36 महिने ईपीएफ खात्यात रक्कम जमा झाली नाही तर ते खाते निष्क्रिय खाते होते. त्यात सरकारकडून व्याज दिले जात नाही.