Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूक

Investment Planning: यावर्षी स्मार्ट गुंतवणूक करून मिळवा चांगला परतावा

Investment Planning: गेल्या काही महिन्यांपासून भारतात महागाईचा दर वाढतो आहे. रेपो रेटमध्ये सातत्याने वाढ होते आहे. एप्रिलमध्ये पुन्हा यांत वाढ होण्याची शक्यता आहे. या सगळ्या शक्यता लक्षात घेऊन गुंतवणूकदारांनी योग्य पर्याय निवडले पाहिजेत असा सल्ला गुंतवणूक तज्ञ संजय पवार यांनी दिलाय. जाणून घ्या सविस्तर माहिती.

Read More

PPF Update: जाणून घ्या PPF गुंतवणूकदारांसाठी 5 एप्रिल दिवस का आहे विशेष?

PPF Policy : पीपीएफ (PPF) म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते ही केंद्र सरकारची लोकप्रिय अशी बचत योजना आहे. या योजनेत हमी परताव्या बरोबरच कर सवलतही मिळते. या योजनेचा व्याजदर प्रत्येक तिमाहीत ठरवला जातो. यावेळी एप्रिल ते जून 2023 करीता 7.1 एवढा व्याजदर निश्चित करण्यात आला आहे.

Read More

Unit Linked Insurance Plan: विमा संरक्षण आणि गुंतवणुकीचा एकत्र फायदा देणाऱ्या युलिप योजनांचे फायदे-तोटे माहीत आहेत का?

युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅनद्वारे (ULIP plan) गुंतवणूकही करता येते आणि जीवन विम्याचे संरक्षणही मिळते. मात्र, या पॉलिसीचा प्रिमियम निव्वळ जीवन विमा पॉलिसींपेक्षा जास्त असतो. तुम्ही भरत असलेला प्रिमियम युलिपकडून भांडवली बाजारात गुंतवला जातो. त्यातून मिळणारा परतावा गुंतवणूकदाराला दिला जातो. या योजनेचे फायदे तोटे काय आहेत ते पाहूया!

Read More

Bangalore Rent Hike: बंगळुरुमधील घरभाडे दुपटीने वाढले; दरवाढीत मुंबईलाही टाकले मागे

बंगळुरू शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हटले जाते. आयटी हब असण्याबरोबरच अनेक कंपन्यांची मुख्यालयेही बंगळुरूमध्ये आहेत. सोबतच स्टार्टअप कंपन्याही शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. कॉर्पोरेट्समध्ये काम करणाऱ्यांकडून घरांसाठी मोठी मागणी असल्याने भाड्याने घर मिळणे मुश्किल झाले आहे. भाडेवाढीमध्ये बंगळुरू शहराने भारताची आर्थिक राजधानी मुंबईलाही मागे टाकले आहे.

Read More

भारतात सोन्याची तस्करी का वाढू लागली आहे?

Gold Smuggling Rise in India: गेल्या काही महिन्यात भारतात सोन्याची तस्करी वाढत असल्याचे दिसून आले आहे. मागील 11 महिन्यात जवळपास 160 टन सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न झाला. तस्करी होण्यामध्ये मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोझिकोडे इथल्या विमानतळांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे दिसून आले.

Read More

Old Pension Scheme Update: जुन्या पेन्शन योजनेचे लाभ आता नवीन कर्मचाऱ्यांनासुद्धा! राज्य सरकारचा निर्णय

सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी संपादरम्यान केली होती. परंतु यावर तेव्हा देखील थेट भाष्य करणे मुख्यमंत्र्यांनी टाळले होते. आता जुन्या पेन्शन योजनेतील काही लाभ नव्या कर्मचाऱ्यांना देण्याची घोषणा केली गेली असली तरी सर्वांना जुनी पेन्शन लागू होणार किंवा नाही यावर मात्र अजूनही काही भाष्य केले गेले नाही.

Read More

FD Rate Of Interest : आयडीबीआय बँकेची नवीन एफ डी योजना जाणून घ्या

FD Scheme : सध्या काही मोजक्याच बँक अशा आहेत, ज्या ग्राहकांनी गुंतवणूक केलेल्या एफडीवर (FD) 8 टक्कयांच्या वर व्याज देत आहेत. त्यात आता आयडीबीआय बँकेनी आपली नवीन योजना घोषित केलेली आहे. या योजनेचं नाव 'अमृत महोत्सव एफडी' योजना आहे.

Read More

Wheat procurement: अवकाळी पावसामुळे गव्हाचे नुकसान! शेतकऱ्यांकडून खरेदी करताना सरकार नियमावली शिथिल करणार?

मागील वर्षी रब्बी हंगामात उष्णतेच्या लाटेमुळे गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संपूर्ण देशभरात गव्हाचे दर कडाडले होते. किरकोळ बाजारात तर गव्हाचे दर 3 हजार रुपये क्विंटलच्या पुढे गेले होते. दरम्यान, यावर्षीही अवकाळी पाऊस आणि गारपीटीने गहू पिकाचे नुकसान झाले आहे. पूर्णत: गहू पिक वाया गेले नसले तरी गव्हाची गुणवत्ता खालावली आहे. उत्तरेकडील राज्यांना खराब हवामानाचा फटका बसला.

Read More

FD Interest Rate: गुंतवणुकीवर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज पाहिजे? मग हे पर्याय जाणून घ्या

Fixed Deposit Interest Rate: दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत चालली आहे. या महागाईचा सामना करण्यासाठी आणि गुंतविलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळावा, यासाठी गुंतवणूकदार सदैव प्रयत्नशील असतात. आज आपण मुदत ठेवींवर जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या बॅंकांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यातून गुंतवणूकदाराला 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल.

Read More

Housing Price Hike: नवं घर घेणं आणखी महाग! देशातील प्रमुख शहरांमध्ये सदनिकांच्या किमती वाढल्या

भारतातील प्रमुख शहरांमध्ये नवं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. कारण मुंबई, हैदराबाद, बंगळुरु सारख्या प्रमुख शहरांमधील सदनिकांच्या किंमतीमध्ये 5 ते 7% टक्के वाढल्या आहेत. ही दरवाढ नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च कालावधीत नोंदवली गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात सतत वाढ करण्यात येत आहे.

Read More

Housing Price Hike: नवं घर घेणं आणखी महाग! देशातील प्रमुख शहरांमध्ये सदनिकांच्या किमती वाढल्या

भारतातील प्रमुख शहरांमध्ये नवं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. कारण मुंबई, हैदराबाद, बंगळुरु सारख्या प्रमुख शहरांमधील सदनिकांच्या किंमतीमध्ये 5 ते 7% टक्के वाढल्या आहेत. ही दरवाढ नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च कालावधीत नोंदवली गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात सतत वाढ करण्यात येत आहे.

Read More

Ather Electric scooter Sales: अथर कंपनीने एकाच महिन्यात विकल्या 1,754 इलेक्ट्रिक स्कुटर्स

Electric scooter : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या पेट्रोलच्या किमतींमुळे ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याकडे वळले आहे. एथर (Ather) या इलेक्ट्रिक स्कूटरला भारतीय इलेक्ट्रिक मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. एथर एनर्जीने मार्च महिन्यात एकूण 11,754 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. तसेच, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 82,146 ईव्ही वाहनांची विक्री केली.

Read More