जागतिक बाजारातील मंदीची परिस्थिती आणि जागतिक स्तरावरील राजकीय अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सोने खरेदी कडे वळत आहे. याचाच परिणाम म्हणून भारतातील सोन्याने प्रति 10 ग्रॅम ची किंमत 61000 रुपये हा नवा उच्चांक गाठला.आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,032 डॉलर प्रति औंस झाला. तर एमसीएक्स मध्ये सोन्याची किंमत 61,181 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चांकावर पोहोचली आणि बुधवारी सरासरी 60,978 रुपयांवर व्यवहार होऊन मार्केट बंद झाले.
Table of contents [Show]
रुपयासह बहुतेक चलनांच्या तुलनेत ग्रीनबॅक कमी
आंतरराष्ट्रीय स्तरावर, अमेरिकेतील अनेक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली. रोजगाराच्या संख्येत घट झाल्याने सोन्याला कमकुवत डॉलरचा आधार मिळाला. तसेच रुपयासह बहुतेक चलनांच्या तुलनेत ग्रीनबॅक कमी झाला. आणि रुपया डॉलरच्या तुलनेत पैश्यांनी वाढून 82 वर बंद झाला. भारतात बहुतेक सोनं हे आयात होत असल्यामुळे रुपयाच्या तुलनेत डॉलरचं मूल्य महत्त्वाचं ठरतं. कारण, सोन्याचे आंतरराष्ट्रीय व्यवहार अमेरिकन डॉलरमध्ये होतात. आणि सोनं पर्यायाने डॉलरसाठी आपल्याला जास्त रुपये मोजावे लागतात.
अधिक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून स्थान
सोन्याच्या किमती वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. अमेरिकासह अनेक देशात सुरु असलेली राजकीय अनिश्चितता, व्याजदरांनी शेअर मार्केट मध्ये मर्यादित केलेला नफा. यासारख्या अनेक घडामोडींमुळे सोन्याला अधिक सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय म्हणून स्थान मिळाले आहे.
यापूढेही वाढणार सोन्याची किंमत
तसेच, सोन्याची किंमत यापूढे देखील वाढतच राहणार आहे. मात्र जर का, विनिमय दरात बदल झाला आणि सरकारने सोन्यावर आकारण्यात येणाऱ्या करांमध्ये सुधारणा केली, तर सोन्याच्या दरात पूढे काही सुधारणा होऊ शकते. म्हणजेच सोन्याचे दर काही प्रमाणात सुधारु शकते. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, आरबीआयने फेब्रुवारी महिन्यात 3 टन सोने खरेदी केले. आणि आता भारताकडे सोन्याचा साठा 790.2 टन झाला. वर्ष 2023 मध्ये भारतातील सोन्याच्या किंमतींमध्ये सतत वाढ दिसुन आली.
मार्च महिन्यातही झाली होती सोने दर वाढ
जागतिक बाजारातील मंदीची परिस्थिती, सेंट्रल बँकांची व्याजदर वाढ आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यात वाढलेला ओघ यामुळे सोने दराने 17 मार्च 2023 नवा रोकॉर्ड तोडला होता. 17 मार्च रोजी भारतातील मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59461 रुपयांवर गेला होता.
सोन्याचा आजचा दर
सोन्याचा आजचा दर 62,365 रुपये आहे. जो कमोडिटी मार्केटमध्ये दिवसभरात आणखी वाढण्याची शक्यता आहे.