Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF : पीपीएफ खात्यातलं व्याज कधी आणि कसं जमा होतं?

PPF Interest Rate

Image Source : www.godigit.com

PPF Interest Rate : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) ही गुंतवणूकदारांमध्ये एक लोकप्रिय योजना आहे. या योजनेत गुंतविलेल्या पैशांवर चक्रवाढ व्याजाने पैसे मिळतात. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की, या योजनेत कोणत्याही महिन्याच्या पाच तारखेपूर्वी पैसे टाकणे (Investment) गरजेचे का असते.

Public Provident Fund : अलीकडेच, सरकारने PPF वगळता बहुतांश लहान बचत योजनांवर व्याजदर वाढवले ​​आहेत. मात्र एप्रिल 2020 पासून पीपीएफ वरील व्याजदर कायम आहे. तोच व्याजदर एप्रिल ते जून 2023 या तिमाहीसाठी देखील निश्चित करण्यात आला आहे. भविष्य निर्वाह निधीमध्ये 15 वर्षांच्या दीर्घ कालावधीकरीता गुंतवणूक केली जाते.

कशा पध्दतीने दिले जाते व्याज

PPF ही सरकारी योजना आहे. आणि या योजनेत गुंतवलेल्या पैशावर सरकार दर तीन महिन्यांनी व्याज जमा करतं. दरवर्षी एकदा साधारण बजेच्या सुमारास किंवा बजेट नंतर सरकारकडून PPF योजनेतल्या गुंतवणुकीवरचा व्याजदर जाहीर करण्यात येतो. तो नवीन आर्थिक वर्षासाठी लागू होतो. वर म्हटल्याप्रमाणे दर 3 महिन्यांनी म्हणजे वर्षातून चारदा तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा होते. व्याजाची गणना चक्रवाढ पद्धतीने होते. आणि महिन्याच्या पाच तारखेपासून ते महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जमा केलेली रक्कम त्या महिन्याच्या व्याजासाठी गृहित धरली जाते. त्यामुळे PPF योजनेत पैसे गुंतवताना ते प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेच्या आत गुंतवावे म्हणजे त्याच महिन्याच्या व्याज गणनेसाठी ते मोजले जातात असा दंडक आहे. 

PPF खात्यात किमान 500 ते कमाल 1,50,000 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्हाला गुंतवता येते. एका वर्षात कितीदाही गुंतवणूक करू शकता. पण, एका व्यक्तीच्या नावे एकच PPF खातं तुम्हाला उघडता येतं. 

दर महिन्याला किंवा नियमितपणे पीपीएफमध्ये पैसे टाकणाऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. वर्षातून एकदाच पीपीएफ खात्यात पैसे जमा करत असाल तर ते पैसे 5 एप्रिलच्या आत जमा केले तर त्यावर जास्त व्याज तुम्हाला मिळेल. नाहीतर पुढच्या व्याजाच्या सायकलमध्ये पैसे धरले जातील. पीपीएफ खात्यात सरकार वर्षातून चारदा आणि दर तीन महिन्यांनी व्याज जमा करतं. आणि दर वेळी महिन्याची पाचवी तारीख त्यासाठी निश्चित आहे.

उदाहरणार्थ, 31 मार्चपर्यंत तुमच्याकडे ₹ 2 लाखाची क्लोजिंग PPF मध्ये शिल्लक आहे. तुम्ही एप्रिलमध्ये आणखी  50,000 रुपयांची गुंतवणूक केल्यास, एप्रिलची शेवटची शिल्लक  2.5 लाख रुपये असेल . म्हणजे 50,000 रुपयांची गुंतवणूक 5 एप्रिल किंवा त्यापूर्वी केली असल्यास एप्रिल महिन्याचे व्याज 2.5 लाख रुपयांवर मोजले जाईल. अन्यथा, ते फक्त ₹ 2 लाखांवर मोजले जाईल.

सध्या पीपीएफ मधील गुंतवणुकीवर सरकारकडून 7.1% दराने व्याज दिलं जातं. 

पीपीएफ करमुक्त योजना

मुख्य म्हणजे पीपीएफ वरील व्याजदर कायम असतांनाही ही योजना लोकप्रिय आहे. कारण एकीकडे यावर चक्रवाढ पध्दतीने व्याज मिळते आणि दुसरे म्हणजे या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज जुन्या कर प्रणाली अंतर्गत करमुक्त आहे. जुन्या कर प्रणाली अंतर्गत, पीपीएफ मधील गुंतवणुकीची रक्कम देखील आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत वार्षिक 1.5 लाख रुपये पर्यंतच्या कर कपातीसाठी पात्र आहे. म्हणजे या योजनेत गुंतवलेल्या वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर तुम्हाला कर वजावट मिळते. तर या योजनेवर मिळणारं व्याजही पूर्णपणे करमुक्त आहे. 

गुंतवणुकीची किमान आणि कमाल मर्यादा

अशापध्दतीने, पीपीएफ वर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी, एखाद्याने कोणत्याही महिन्याच्या पाच तारखेला किंवा त्यापूर्वी PPF मध्ये गुंतवणूक केली पाहिजे. पीपीएफ खात्यातील प्रत्येक आर्थिक वर्षातील गुंतवणुकीची मर्यादा कमीतकमी 500 आणि जास्तीत जास्त  1.5 लाख रुपयांपर्यंत आहे.