Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Real Estate Fraud: जमिनीची नोंदणी खरी की बनावट हे ओळखण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे?

Real Estate

Real Estate Fraud: जमीन नोंदणीबाबत अनेक घोटाळे समोर येतात. एकच दोघांना विकणे, खोटे कागदपत्र देणे, जमीन स्वतः च्या मालकीची नसतांना विकणे या सर्व बाबीमुळे अनेकदा फसवले जाते. फसवणूक टाळण्यासाठी कोणते डॉक्युमेंट चेक करावे? याबाबत माहित करून घ्या.

Real Estate Fraud: जमीन नोंदणीबाबत अनेक घोटाळे समोर येतात. एकच दोघांना विकणे, खोटे कागदपत्र देणे, जमीन स्वतः च्या मालकीची नसतांना विकणे या सर्व बाबीमुळे अनेकदा फसवले जाते. त्याच बरोबर जमिनीची डबल रजिस्ट्री मिळवून चोर अनेक वेळा लोकांची फसवणूक करतात. या फसवणुकीपासून वाचण्यासाठी तुम्हाला खरी आणि बनावट रजिस्ट्रीमधील फरक माहीत असणे आवश्यक आहे. 

भारतात जमीन नोंदणी ही कायदेशीररित्या केली जाते. परंतु  काही वेळा यात फसवणूक केली जाते. माहित करून घ्या, जमिनीच्या नोंदीशी संबंधित फसवणुकीचे प्रकार कोणते? आणि फसवणूक झाली का? हे कसे ओळखायचे. 

जमिनीच्या नोंदीशी संबंधित फसवणुकीचे प्रकार पुढीलप्रमाणे, 

अंदाजे दरवर्षी देशातील 40 टक्के रजिस्ट्री खोट्या म्हणजेच बनावट असतात. जमीन खरेदी करतांना अनेक लोक फक्त जमिनीची रजिस्ट्री आणि खतौनी कागदपत्रे चेक करतात, पण तेच पुरेसे नाही, यावरून सिद्ध होत नाही की जमिनीचा मालकी हक्क नेमका कोणाकडे आहे? 

जमिनीच्या रजिस्ट्रीमधील फसवणुक टाळण्यासाठी, सर्वप्रथम तुम्ही जमिनीची नवीन आणि जुनी रजिस्ट्री चेक करावी. जी व्यक्ती तुम्हाला जमीन विकत आहे, त्याने ती जमीन दुसऱ्याकडून विकत घेतली असेल, तर त्या व्यक्तीला जमिनीची नोंदणी करून घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे का? तिथं खतौनी चेक करावी. खतौनीतील क्रम पाहावा. जर तुम्हाला ही कागदपत्रे समजत नसतील तर या प्रकरणांशी संबंधित कायदेशीर तज्ञाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. 

फसवणुकीचे प्रकार 

  • बोगस कागदपत्रे, व्यक्ती
  • एकच जमीन दोन, तीन जणांना विकणे
  • इसार एकाचा, विक्री दुसऱ्याला
  • गहाण जमिनीची विक्री
  • वारसांची हरकत

एकत्रीकरण रेकॉर्ड 41-45 चेक करा

एकत्रीकरणाचे 41 आणि 45 अभिलेख चेक करा, त्यावरून ही जमीन कोणत्या वर्गातील आहे हे माहित होईल. ही जमिनीची सर्वात महत्त्वाची नोंद आहे. एकतर ही सरकारी जमीन नाही किंवा चुकून विक्रेत्याच्या नावावर आली नाही. एकत्रीकरणाच्या 41 आणि 45 नोंदीवरून जमिनीची खरी स्थिती स्पष्ट होते की ती जमीन सरकारची, वन विभागाची किंवा रेल्वेची आहे. 

अनेक वेळा मृत्युपत्र किंवा दुहेरी रजिस्ट्रीचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असते. म्हणूनच तुम्ही जेव्हाही जमीन खरेदी कराल तेव्हा त्यावर एकही केस प्रलंबित नाही ना, याबाबत माहिती काढा. हे तहसीलमधील जमिनीच्या डेटा क्रमांकावरून आणि जमीन मालकाच्या नावावरून माहित होऊ शकते. 

जमीन खरेदीविषयी लक्षात ठेवायाच्या बाबी 

  • जमिनीचा सातबारा आणि फेरफार उतारा नीट पाहणे. 
  • भूधारणा पद्धत तपासून घेणे. 
  • जमिनीच्या गटाचा नकाशा पाहणे. 
  • शेत रस्ता
  • खरेदी खत

(source: https://bit.ly/40UoX2Y)