Hyundai Moter India : ह्युंदेई मोटर इंडिया लवकरच एक नवीन यूटिलिटी व्हीकल (एसयूवी) लॉन्च करणार आहे. एसयूवी मॉडल ह्युंदेई सद्य स्थितीत बाजारात उपलब्ध असलेल्या नवीन मॉडेल्स पेक्षा अत्यंत कमी किमतीमध्ये लॉन्च केल्या जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
कधी होणार लॉन्च
देशात ह्युंदेई मोटर इंडियाच्या कारर्सच्या डिझाईन्स आणि आधुनिकतेने परिपक्व असलेले फिचर्स लोकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामुळे नवीन आव्हानं, ग्राहकांच्या पसंतीस पडेल अशी किंमत आणि आधुनिकता याचा मेळ साधत Hyundai SUV ने आपली विशेषता लवकरच लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कार ग्राहकांची खरेदी करण्याची आवड आणि परंपरा तसेच विचारसरणी लक्षात घेता, गुडीपाडव्याच्या दिवशी लॉन्च होण्याची शक्यता आहे.
काय असणार फिचर्स
दक्षिण कोरियाची ऑटो क्षेत्रातील दिग्गज कंपनी ह्युंदेईचंं, नवीन एसयूवीचा हा नवा मॉडेल Hyundai Aura और Hyundai Grand i10 Nios या दोन मॉडेल वरच आधारीत आहे. यामध्ये Hyundai आपल्या नवीन सब-कॉम्पॅक्ट SUV सोबत CNG पर्याय सादर करू शकते, असाही अंदाज वर्तवला जात आहे. 1.2-लिटर युनिटला आधीच दोन इंधन पर्याय (पेट्रोल + CNG) मिळतात.नवीन Hyundai SUV मध्ये LED हेडलाइट्स आणि टेललाइट्स, इलेक्ट्रिक सनरूफ, टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि वायरलेस चार्जर हे फिचर्स देखील असू शकतात.
किती असणार किंमत
नवीन Hyundai SUV ची किंमत (एक्स-शोरूम) 6 लाख ते 10 लाख रुपये दरम्यान असण्याची शक्यता आहे. Hyundai Venue ची किंमत 7.72 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.टाटा पंचची किंमत सुमारे 6 लाख रुपयांपासुन ते 9.47 लाख (एक्स-शोरूम) रुपये दरम्यान आहे.अशा परिस्थितीत ह्युंदाई कमी किमतीत नवीन एसयूव्ही लाँच करून टाटा पंचला बाजारात थेट टक्कर देऊ शकते. Hyundai च्या देशातील काही सर्वात लोकप्रिय SUV मध्ये Venue, Creta, Alcazar आणि Tucson यांचा समावेश आहे. याशिवाय ह्युंदाई इलेक्ट्रिक कारमध्ये कोना इलेक्ट्रिक आणि आयोनिक 5 कार देखील बाजारात उपलब्ध आहेत. आता हुंडईची नवीन एसयूवी कार ग्राहकांच्या किती पसंतीस पडते, यावर तिचं यशअपयश अवलंबून आहे.