Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Increase in price of fruits : उन्हाचा सपाटा वाढला आणि फळांची आवक कमी असल्याने फळांच्या किंमतीत वाढ...

Fruits

Increase in price of fruits : उन्हाळ्यामुळे फळांची मागणी वाढली आणि आवक कमी असल्याने किमतीतही मागील वर्षीपेक्षा 20 ते 25% वाढ झाली आहे.

Increase in price of fruits : जसा उन्हाळा वाढत आहे, तशी उन्हाळी फळांची मागणी सुद्धा वाढत आहे. उन्हाळ्यात कलिंगड, लिंबू, ऊस, आणि काकडीला जास्त मागणी असते. या वर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे अनेक पिकांना फटका बसला. इतर पिकांप्रमाणे फळांना सुद्धा चांगलाच फटका बसला त्यामुळे आता मार्केटमध्ये फळांची आवक कमी झाली आहे, आणि उन्हाळ्यामुळे मागणी वाढली आहे. 

या सर्व बाबींचा प्रभाव फळांच्या किमतीवर झाला आहे. कलिंगड, लिंबू सरबत, उसाचा रस आणि काकडी हे पदार्थ उन्हाळ्यात औषध म्हणून काम करतात. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कलिंगड, उस, काकडी या फळांच्या किंमती 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत. लिंबाचीही आवक घटली आहे. लिंबांना आता संत्री आणि मोसंबी इतका भाव वाढल्याने लिंबू सरबतही महागले आहे. 

या वर्षी काकडीचे भावही वाढले आहे. एका मोठ्या काकडी मागे पाच ते दहा रुपये मोजावे लागत आहेत. त्याचबरोबर कलिंगडामध्ये वीस ते पंचवीस रुपयांनी वाढ झाली आहे. उसाचे दरही वाढले आहे. लिंबू सरबत, उसाचा रसही मागील वर्षीपेक्षा 10 ते 15 रुपयांनी वाढला आहे. 

सध्याचे फळांचे दर 

फळ 

किमती (प्रति किलो)

कलिंगड 

50 रुपये 

केळी 

60 रुपये (डझन) 

द्राक्षे 

80 रुपये 

काकडी 

60 रुपये 

किवी 

150 रुपये 

खरबूज 

40 रुपये 

मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी फळांची किंमत 20 ते 25% नी वाढली आहे. उदा. मागील वर्षी कलिंगड 10 ते 20 रुपयात मिळत होतं आता ते 40 ते 50 रुपये किमतीचे झाले आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया…

सरफापुर येथील शेतकरी प्रमोद घुलक्षे सांगतात, मी गेले 5 वर्ष केळीची शेती करत आहे. पण एकही वर्ष भरघोस नफा मिळाला नाही. अवकाळी पावसाने तर फटका दिलाच पण मालाचे भावही कमीच आहे. आमच्याकडून कमी किमतीत माल खरेदी करतात आणि मार्केटमध्ये तिप्पट चौपट किमतीने विकतात. शेतकऱ्याला त्याने केलेली मेहनत सुद्धा कधी कधी प्राप्त होत नाही. मागील वर्षी आमच्याकडून घेतलेले कलिंगड मार्केटमध्ये 30 ते 50 रुपये किलोप्रमाणे विकले आणि यांच्याकडून ते 5 रुपये किलोने खरेदी करून नेले.