Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

बँक

RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँक पतधोरणात कोणता निर्णय घेणार? संभाव्य रेपो दरवाढीने कर्जदार धास्तावले

RBI MPC Meeting: खाद्यवस्तू, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत महागाईचा आगडोंब उसळला आहे. महागाईला रोखण्यासाठी व्याजदर वाढवून ग्राहकांच्या क्रयशक्तीला रोखण्याचे प्रयत्न रिझर्व्ह बँक करत आहे. मे 2022 पासून रिझर्व्ह बँकेने रेपो दरात आतापर्यंत तब्बल 2.50% वाढ केली आहे. महागाई रोखणे या एकमेव टार्गेटवर लक्ष केंद्रीत केलेली रिझर्व्ह बँक दरवाढ सुरुच ठेवणार कि काही काळ विराम देणार याबाबत उत्सुकता वा

Read More

FD Interest Rate: गुंतवणुकीवर 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज पाहिजे? मग हे पर्याय जाणून घ्या

Fixed Deposit Interest Rate: दिवसेंदिवस महागाई प्रचंड वाढत चालली आहे. या महागाईचा सामना करण्यासाठी आणि गुंतविलेल्या पैशांवर चांगला परतावा मिळावा, यासाठी गुंतवणूकदार सदैव प्रयत्नशील असतात. आज आपण मुदत ठेवींवर जास्तीत जास्त परतावा देणाऱ्या बॅंकांबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यातून गुंतवणूकदाराला 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकेल.

Read More

SBI Server Down : एसबीआयचे सर्व्हर डाऊन; देशभरातील ग्राहकांना नाहक मनस्ताप

Server Down : सोमवार सकाळपासून एसबीआयचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे देशभरातील ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. ग्राहकांना झालेल्या गैरसोयी बद्दल एसबीआयने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Read More

UBS-Credit Suisse Merger: डबघाईतील क्रेडिट स्वीस विलीनीकरणाने वाचणार पण 36 हजार कर्मचारी नोकरी गमावणार

UBS-Credit Suisse Merger: आर्थिक डबघाईला आलेल्या क्रेडिट स्वीस बँकेचे UBS बँकेत विलीनीकरण करण्याचा निर्णय स्वित्झर्लंड सरकारने घेतला.यामुळे क्रेडिट स्वीस तारणार असली तरी या दोन्ही बँकांच्या जगभरातील जवळपास 36 हजार कर्मचाऱ्यांना मात्र नोकरी गमवावी लागेल, अशी धक्कादायक बाब समोर आली आहे. यात स्वित्झर्लंडमधील किमान 11000 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार आहे.

Read More

Good Credit Score: कर्ज देण्यासाठी बँकांची लागेल रांग; 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर ठेवण्यासाठी 'हे' कराच!

जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँका कर्ज देण्यासाठी लगेच तयार होतात. मात्र, जर क्रेडिट स्कोअर खराब असेल तर कर्ज, क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचणी येतात. 750 पेक्षा जास्त स्कोअर चांगला समजला जातो. यापेक्षा जर तुमचा स्कोअर कमी असेल तर काही सोप्या पर्यायांनी तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवू शकता.

Read More

‘Money For Likes’ - निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची 1 कोटीची फसवणूक

Online Fraud - पुण्यातील एका 65 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी रूपयाची फसवणूक झाली आहे. ‘Money For Likes’ या नविन scam च्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून अधिकतर तपास सुरू आहे.

Read More

Interest Rates: वाढत्या व्याजदरात भारताचा आहे जगात सहावा क्रमांक, कसा ते वाचा

RBI Policy : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ने गेल्या वर्षीच्या मे (2022) महिन्यापासुन रेपो दरात (Repo Rate) 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकुण रेपो रेट 2.75 टक्के एवढा वाढलेला असु शकते.

Read More

SBI Bank News: ग्राहकांच्या खात्यातून SBI बँकेनं कापले 206.50 रुपये, बँकेनं स्पष्ट केलं कारण

SBI Bank News: तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बँक खाते आहे का? असेल तर आठवडाभरापूर्वी तुमच्या बँक खात्यातून कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय 206.50 रूपये कापले गेले असतील. एसबीआयने हे पैसे का कापले याचे कारण जाणून घेऊया

Read More

Non Performing Asset: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना तोटा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती

NPA: एकूण 7.34 लाख कोटी रुपयांच्या NPA मधील कर्जांपैकी केवळ 14% कर्ज सार्वजनिक क्षेत्रातील बँका वसूल करण्यात यशस्वी ठरल्या आहेत अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. तसेच 7.34 लाख कोटी अनुत्पादित मालमत्तेपैकी केवळ 1.03 लाख कोटी रुपये वसूल केले गेले आहेत.

Read More

UPI Payments Update: UPI पेमेंटसाठी पैसे द्यावेल लागणार नाहीत, NPCI ने दिले स्पष्टीकरण

UPI Payments From Bank Accounts: 1 एप्रिलपासून डिजीटल व्यवहार करणाऱ्या नागरिकांना GPay, PhonePe, Paytm अॅपद्वारे केल्या जाणाऱ्या पेमेंटवर शुल्क भरावे लागणार आहे. अशी बातमी सर्व सोशल मिडीया आणि प्रसार माध्यमांवर प्रकाशित झाल्यानंतर, 'अफवांना बळी पडू नका' असे ट्विट पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी केले आहे.

Read More

CAG Report: सरकारने SBI ला न मागताच दिले 8800 कोटी!

CAG ने मार्च 2021 रोजी गेल्या आर्थिक वर्षाच्या अनुपालन लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे की, वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वित्तीय सेवा विभागाने स्टेट बँक ऑफ इंडियाला पैसे देण्यापूर्वी आवश्यक त्या नियमांचे पालन केलेले नाही.

Read More

AePS to District Co Op Banks: सर्व जिल्हा बँकांना मायक्रो एटीएम प्रणाली, आधारने बँकिंग सेवा होणार गतीमान

AePS to All District Banks: राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँकांना मायक्रो एटीएम म्हणजेच आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम प्रणाली (AePS) उपलब्ध करुन देण्याचा निर्णय दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह बँकेने (शिखर बँक) घेतला आहे. सहकारी बँकांमधील त्रिस्तरीय रचनेचे सक्षमीकरण करण्याच्या प्रस्तावित योजनेचा एक भाग म्हणून जिल्हा बँकांना मायक्रो एटीएम सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. ही सेवा सुरु करणारी भंडारा जिल्

Read More