Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PNB New Rule : PNB ने खातेदारांना दिला झटका, अकाउंटमध्ये किमान शिल्लक न ठेवता पैसे काढल्यास द्यावा लागणार चार्ज

Punjab National Bank

PNB New Rule : इतर बँकांबरोबरच पंजाब नॅशनल बँक (PNB) 1 मे 2023 पासून नवीन नियम लागू करणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये बँक नियमानुसार सांगितलेली पुरेशी रक्कम नसेल, तरीही तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला आता चार्ज द्यावा लागेल. याबाबत माहिती बँकेने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

Punjab National Bank New Rule: आर्थिक वर्ष 2023-2024 मध्ये बँकिंग क्षेत्रात अनेक नवीन नियम लागू झाले आहेत. इतर बँकांबरोबरच पंजाब नॅशनल बँक (PNB) 1 मे 2023 पासून नवीन नियम लागू करणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये बँक नियमानुसार सांगितलेली पुरेशी रक्कम नसेल, तरीही तुम्ही एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला आता चार्ज द्यावा लागेल. याबाबत माहिती बँकेने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.

head-image-1-2.jpg

किती चार्ज द्यावा लागेल? 

बँकेच्या वेबसाइटनुसार, 1 मे 2023 पासून जर तुम्ही अकाऊंटमध्ये पुरेशी रक्कम नसतांना ATM मधून पैसे काढले तर तुम्हाला 10 रुपये शुल्क आणि GST द्यावा लागणार आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांना डेबिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड्सवर जास्त शुल्क भरावे लागू शकते. हे कार्ड अॅक्टिव्ह करण्यासाठी आणि वर्षभर त्याबाबत अडचणी सोडवण्यासाठी लागणारा वार्षिक चार्जसुद्धा वाढवण्याचा विचार बँक करत आहे. 

बँक पीओएस आणि डेबिट कार्डद्वारे केलेल्या ईकॉम ट्रान्झॅक्शनवर सुद्धा चार्ज आकारण्याचा विचार बँक करत आहे. म्हणजेच, जेव्हा तुम्ही Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटवरून वस्तू खरेदी करता आणि POS आणि डेबिट कार्डने पैसे देता, परंतु काही कारणास्तव तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसते आणि ट्रान्झॅक्शन फेल  होतात. तेव्हाही बँक चार्ज आकारण्याचा विचार करत आहे.

head-image-2-1.jpg

ATM ट्रान्झॅक्शन फेल झाल्यास बँक काय सुविधा देते? 

उदा. जेव्हा तुम्ही तुमच्या एटीएममधून पैसे काढता, तेव्हा अनेक वेळा पैसे हातात येत नाही पण अकाउंटमधून कापले जातात. तेव्हा बँक सांगते की ही समस्या 7 दिवसात निकाली लागेल. परंतु बँकेच्या नियमानुसार  30 दिवसांच्या आत या समस्येचे निराकरण झाले नाही तर बँक दररोज 100 रुपये चार्ज देईल. तुम्ही 01202490000 वर तक्रार करू शकता. 

तुम्ही 1800 180 2222 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून तुमचे कार्ड ब्लॉक करू शकता. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 5607040 वर एसएमएस पाठवून इंटरनेट बँकिंग सेवांमध्ये लॉग इन करून ब्लॉकिंग केले जाऊ शकते.

या सर्व नियमांबद्दल माहिती PNB च्या अधिकृत वेबसाइटवर मिळवू शकता, त्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा. 

  • पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. 
  • त्यानंतर होम पेजवरील 'whats new' या ऑप्शनवर क्लिक करा. 
  • त्यात तुम्हाला सर्व माहिती मिळेल. उदा. एटीएमबाबत नवीन नियम, लोन, डेबिट कार्ड आणि बरेच काही.