Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Interest Rates: वाढत्या व्याजदरात भारताचा आहे जगात सहावा क्रमांक, कसा ते वाचा

Interest Rates

RBI Policy : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ने गेल्या वर्षीच्या मे (2022) महिन्यापासुन रेपो दरात (Repo Rate) 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकुण रेपो रेट 2.75 टक्के एवढा वाढलेला असु शकते.

Inflation Is Above Prescribed Range: दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्यातही आता सगळ्यात जास्त व्याजदर असणाऱ्या देशांमध्ये भारताचा सहावा क्रमांक आहे, असे रॉयटर्सच्या सर्वेक्षणानुसार पुढे दिलेला इंडेक्स सांगतो. 

country.jpg

भारत जगात सहाव्या क्रमांकावर 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) व्याजदर वाढवणाऱ्या जगातील आघाडीच्या देशांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. आणि अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षीपासून केंद्रीय बँकांनी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी (Control Inflation) दर वाढवण्याची पद्धत अवलंबली होती. असे असूनही, बहुतेक देशांमध्ये चलनवाढ (Inflation)अजूनही त्यांच्या निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आहे.

एकुण रेपो रेट 2.75 टक्के असु शकतो

आरबीआय ने गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून रेपो दरात 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.  त्यामुळे एकुण रेपो रेट 2.75 टक्के एवढा वाढलेला असु शकते.

सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचू शकते रेपो रेट

रेपो दर सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचू शकतो, असे मत रॉयटर्सच्या सर्वेक्षणातील अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केले. आता परत आरबीआयने एप्रिलमध्ये रेपो दर 0.25 टक्क्यांनी वाढविल्यास तो सात वर्षांच्या उच्चांकावर पोहोचू शकते. तर याबाबतीत मध्यवर्ती बँक काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पुढील वर्षी महागाई 4 टक्क्यांच्या खाली येऊ शकते

डच बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक दास म्हणाले की, महागाईशी संबंधित जोखमीचा (Risk) सामना करण्यासाठी आरबीआय सर्व पर्याय खुले ठेवेल. आर्थिक वर्ष 2023 मध्ये महागाई 6.70% च्या वर राहू शकते. तर पुढील वर्षी ती आणखी सुमारे 4 टक्कयांनी वाढू शकते.

रेपो दर (Repo Rate)

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास रेपो रेट (Repo Rate) म्हणजे रिझर्व्ह बँकेने इतर बँकांना दिलेला कर्जाचा दर. या शुल्कापोटी बँक आपल्या ग्राहकांना कर्ज देते. रेपो दर कमी केल्याचा अर्थ असा आहे की, ग्राहकांना आता गृहकर्ज आणि वाहन कर्जासारखी कर्जेही कमी दरात मिळणार आहेत.

रिव्हर्स रेपो दर (Reverse Repo Rate)

या शब्दाचाच अर्थ असा आहे की, बँकांना त्यांच्या वतीने आरबीआयकडे जमा केलेल्या पैशावर व्याज मिळत असते. रिव्हर्स रेपो रेट बाजारातील रोख रकमेच्या तरलतेवर नियंत्रण ठेवतो. आरबीआय रिव्हर्स रेपो रेट वाढवते, जेणेकरून बँक अधिक व्याज मिळविण्यासाठी आपले पैसे त्याच्याकडे ठेवु शकेल.