Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ponzi scheme fraud : ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या लातुरच्या एका तरुणाला पुण्यातून अटक

Ponzi scheme fraud : ऑनलाईनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या लातुरच्या एका तरुणाला पुण्यातून अटक

Online Fraud : पोन्झी स्किमच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयाची फसवणूक करणाऱ्या विशाल सखाराम उटकर या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.

Ponzi scheme fraud : ऑनलाईन पॉन्झी स्किमच्या माध्यमातून कोट्यावधीचा गंडा घालणाऱ्या एका आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. विशाल सखाराम उटकर असे आरोपिचे नाव असून तो मूळचा लातुर जिल्ह्यातला आहे. ओडिसातील भूवनेश्वर येथील दिब्याज्योती कर यांनी यासंदर्भातली तक्रार दाखल केल्यानंतर भूवनेश्वर आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. लवकरच या आरोपीला ओडिसातील प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स (OPID)  या कोर्टासमोर हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, विशाल उटकर यांच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.

काय आहे पोन्झी स्किम (Ponzi Scheme)

एका वाक्यात पोन्झी स्किम काय आहे के सांगायचे झाले तर “एका रात्रित तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करून देणार असे आमिष दाखवून फसवणाऱ्या या योजना.” विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हा फसवणूकीचा व्यवसाय केला जातो. या व्यवसायामध्ये मुख्यत: गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाते. एखाद्या अॅपच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे पैसे गुंतवायला सांगून कमी वेळेत अधिक व्याज दिले जाणार असल्याचे भासवले जाते. सुरूवातीला तुम्हाला वेळेवर तुमचे व्याज मिळत जाते. मात्र तीन ते सहा महिन्याच्या कालावधीनंतर अचानक व्यवहार ठप्प होतात. तोवर अधिकतर मोबदला वा दामदुपटीने मिळणाऱ्या पैशाच्या हव्यासापोटी तुम्ही तुमचे सर्वाधिक पैसे गुंतवून स्वत:ची फसवणूक करून घेतलेली असते.  

दिब्याज्योती कर यांची फसगत कशी झाली?

गेटसो या क्रिप्टो करन्सीसंबंधित व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून दिब्याज्योती कर यांची फसवणूक करण्यात आली. या गेटसो या कंपनीच्या मॅनेजर पदावरील व्यक्तिने गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये दिब्याज्योती यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड केले गेले. या ग्रुपमध्ये त्यांना या क्रिप्टो करन्सीचा व्यवहार करणाऱ्या या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त केले. या गुंतवणूकीच्या बदल्यामध्ये दर दिवसाला 6 टक्के व्याज देणार असल्याचे कंपनीने आश्वासन दिले. महत्त्वाचं म्हणजे ही व्याजाची रक्कम दिब्याज्योती यांना दररोज काढण्याची मुभा होती. कोणिही या आमिषाला बळी पडेल अशीची ही ऑफर आहे. दररोज 6 टक्के व्याज आणि कोणत्याही अटींशिवाय दररोज व्याजाची रक्कम काढण्याची मुभा. दिब्याज्योती यांनी झटपट श्रीमंत होण्याचा विचार करून या स्किममध्ये पैसा गुंतवण्यास तयार झाले. त्यानंतर कंपनीकडून त्यांना या गुंतवणूकीसाठी आवश्यक असलेले खाते (Account) खोलण्यासाठी एक लिंक पाठवण्यात आली. दिब्याज्योती यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर या दोन महिन्याच्या कालावधीत तब्बल 1.27 लाख रूपये गुंतवले. कालांतराने कंपनीचा व्हॉट्सअॅप ग्रुप बंद झाला. दिब्याज्योती यांनी खात्यावर जाऊन पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता गेटसो कंपनीकडून त्यांची रिक्वेस्ट नाकारण्यात आली. वारंवार असे घडल्यानंतर अखेर दिब्याज्योती यांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे आपली तक्रार नोंदवली आणि हा घोटाळा उघडकीस आणला.

144 कोटीचा घोटाळा

यासंपूर्ण प्रकरणाच्या चौकशी दरम्यान, पुण्यातून अटक करण्यात आलेल्या विशाल उटकर या तरूणाच्या खात्यावर 9 कोटी रूपये जमा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. हा संपूर्ण घोटाळा 144 कोटीहून अधिक किंमतीचा असण्याची शक्यता आर्थिक गुन्हे खात्याच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.