Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI Server Down : एसबीआयचे सर्व्हर डाऊन; देशभरातील ग्राहकांना नाहक मनस्ताप

SBI Server Down

Server Down : सोमवार सकाळपासून एसबीआयचा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे देशभरातील ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला. ग्राहकांना झालेल्या गैरसोयी बद्दल एसबीआयने दिलगिरी व्यक्त केली आहे.

SBI Server Down Issue : सोमवारी सकाळपासूनच एसबीआयचे (State Bank of India) सर्व्हर डाऊन झाल्यामुळे एसबीआय (SBI) च्या ग्राहकांना खूप त्रास सहन करावा लागला. अलीकडे सर्वजण नेट बँकिग, ऑनलाईन पेयमेंटचा पर्यायाचा वापरत करतात. त्यामुळे सर्व्हर डाऊन झाल्याने सगळंच ठप्प झाले. अशावेळी एसबीआयच्या ग्राहकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार नोंदवत राग ही व्यक्त केला.

एसबीआयचे स्पष्टीकरण

ग्राहकांच्या तक्रारीनंतर एसबीआयने दिलगिरी व्यक्त करत रविवारी 2 एप्रिल रोजी स्पष्टीकरण दिले. एसबीआयने म्हटले आहे की, आर्थिक वर्षाच्या ताळेबंदाच्या कामकाजानिमित्ताने एसबीआयचे नेट बँकिंग, योनो अॅप सुविधा, योनो लाईट, योनो बिझनेस, यूपीआय अशा सर्व सुविधा बंद राहणार आहेत. तरी दुपारी 4.30 वाजल्यापासून आपण या सुविधा वापरू शकता असे म्हटले होते. मात्र, एसबीआयचा सर्व्हर अजुनही कार्यरत झालेला नाहीये.

ग्राहकांच्या तक्रारी

शनिवार 31 मार्चपासूनच एसबीआय बँकेचे ग्राहक सर्व्हर संबंधित अडचणींचा सामना करत आहेत. ग्राहकांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रीय अर्थखात्यापर्यंत आपल्या तक्रारी पोहोचवल्या आहेत. तर ट्विटरवर हॅशटॅगएसबीआयडाऊन (#SBIDOWN)  ट्रेडिंगला आहे.

प्रसाद वेदपाठक या यूजरने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, 31  मार्चपासून SBI बँकेचे सर्व्हर सुव्यवस्थित कार्यरत नाही आहे. आजचा हा चौथा दिवस आहे. आजही सकाळपासून सर्व्हर डाऊन आहे. हा सायबर अटॅक आहे की हेच ते अच्छे दिन? यामुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होत आहे.


डॉ. सुनंदा लाल या ग्राहकांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, संपूर्ण दिवस प्रयत्न करूनही इंटरनेट बँकिंग, योनो अॅप सुविधा, योनो लाईट अॅप ओपन होत नाहीये. 

गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या या समस्येवर काही ग्राहकांनी जोक्स व मीम्स सुद्धा तयार केले आहेत. 

तर या ट्विटर वापरकर्त्यांनी म्हटले आहे की, विजय माल्ल्या आणि गौतम अदाणी पेक्षा कोणिही एसबीआय मॅनेज करू शकत नाहीत.