Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

‘Money For Likes’ - निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची 1 कोटीची फसवणूक

Online Fraud

Online Fraud - पुण्यातील एका 65 वर्षीय निवृत्त लष्करी अधिकाऱ्याची ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी रूपयाची फसवणूक झाली आहे. ‘Money For Likes’ या नविन scam च्या माध्यमातून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात पुणे पोलिसांकडून अधिकतर तपास सुरू आहे.

Cyber crime - ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन गेम्स, इंटरनेट बँकिंग या सगळ्याच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणा वर वाढत आहे. या संदर्भात सायबर पोलिसांकडूनही वारंवार सावधानतेच्या सुचना नागरिकांना दिल्या जातात. त्यासंदर्भात सायबर सेलकडून उपाययोजना ही राबवल्या जातात. मात्र, फसवणूकीचे मार्ग बदलून या इंटरनेट ठगांकडून सामान्य नागरिकांना लाखो, करोडो रूपयाचा गंडा लावला जातो. 
निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांची 1 कोटीची फसवणूक

पुण्यातील 65 वर्षीय निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची ऑनलाईन फ्रॉडच्या माध्यमातून तब्बल 1 कोटीची फसवणूक झाली आहे. केवळ दोन आठवड्याच्या काळामध्ये या इंटरनेट ठगांना या अधिकाऱ्याच्या आयुष्याची सर्व कमाईची चोरण्यात यश आले. फेब्रुवारी 2023 दरम्यान ही घटना घडली आहे. या संदर्भात पिडीत अधिकाऱ्यांने पुणे पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केली आहे.

पिडीत व्यक्तिला सुरूवातीला थायलंडमधल्या एका महिलेकडून पार्ट-टाइम नोकरीसाठी उपलब्ध असलेल्या संधीबाबत टेक्स्ट मॅसेज आला. यामध्ये युट्यूबवर त्यांनी सांगितलेल्या व्हिडीओला लाइक केल्यावर दर व्हिडीओ मागे 50 रूपये दिले जात असल्याचे त्या महिलेने सांगितले. त्यानुसार, एक व्हिडीओ लाइक केल्यावर त्याचा स्क्रिनशॉट शेअर करण्यास सांगितले. यामध्ये त्या व्यक्तिचे नाव, पत्ता आणि बँकेचे डिटेल्सही नमूद करण्यास सांगितले. पिडीत व्यक्तिने याप्रमाणे केल्यावर त्या महिलेने त्यांना वेलकम बोनस म्हणून 150 रूपये पाठवले व त्यांना फोनवरील मॅसेंजर मधल्या एम्पॉयी ट्रायल ग्रुपवर ( Employee Trial Group) अॅड केले.

या ग्रुपमध्ये अॅड केल्यावर त्या महिलेने पिडीत व्यक्तिला प्रिपेड टास्क (Prepaid Task) म्हणून 1 हजार रूपये भरण्यास सांगितले. दिलेला टास्क पूर्ण केल्यानंतर 1,480 रूपये देणार असल्याचे सांगितले. या टप्प्यामध्ये पिडीत लष्करी अधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्या महिलेने एका व्यक्तिकडून 3 हजार रूपये घेतले आणि 4 हजार रूपये परत केले.

WhatsApp Image 2023-03-31 at 17.00.17

या फ्रॉडची पुढची पायर म्हणजे व्हीआयपी ग्रुप (VIP Group). त्या महिनेने पिडीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला चांगल्या संधीसाठी व्हीआयपी ग्रुपमध्ये अॅड केले. या ग्रुपमध्ये अॅड केल्यावर पिडीत व्यक्तिकडून वेगवेगळ्या 13 बँक खात्यामध्ये 26 व्यवहारांच्या माध्यमातून तब्बल 1 कोटी रूपयांचे व्यवहार करुन घेतले. यावेळेस आपली फसवणूक होत असल्याचे या निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या ध्यानात आले आणि त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.

काय आहे ‘मनी फॉर लाईक्स’ स्कॅम

‘मनी फॉर लाइक्स’ (Money For Likes) हा एक नवीन ऑनलाईन स्कॅम आहे. यामध्ये स्कॅम या ऑनलाईन फ्रॉड टोळीने दिलेले व्हिडीओ लाइक केल्यावर प्रती व्हिडीओ 50 रूपये दिले जातात. यासाठी टार्गेट व्यक्तिला मॅसेजरच्या ग्रुपमध्ये अॅड करून त्यांना विविध टास्क दिले जातात. दिवसाअखेर पैशाची मोजणी करून पैसे ही ऑनलाईन पद्धतीने बँक खात्यावर जमा केले जातात. हळूहळू विश्वास संपादन केल्यावर  या टोळीकडून तयार करण्यात आलेल्या विशेष वेबसाईट वर लॉग-इन करायला सांगतात. टार्गेट व्यक्तिला केवळ यू-ट्यूब व्हिडीओ लाइक करून मिळत असलेल्या अधिकतर पैशाचा हव्यास होतो. त्यावेळी ही टोळी अधिकतर पैशांचे पेयमेंट करण्यासाठी त्यांनी तयार केलेल्या अॅपचा वापर करायला सांगतात. ऑनलाईन व्यवहारासाठी हे अॅप  डाउनलोड केल्यावर खऱ्या फ्रॉडला सुरूवात होते. आपले सगळे बँकिंग डिटेल्स यामध्ये दिल्यावर ही ऑनलाईन फ्रॉड टोळी सहजरित्या आपल्याला फसवून आपले पैसे चोरण्यात यशस्वी होते.