तुमचे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये बँक खाते आहे का? असेल तर आठवडाभरापूर्वी तुमच्या बँक खात्यातून कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय 206.5 रूपये कापले गेले असतील. एसबीआयने हे पैसे का कापले याचे कारण जाणून घेऊया.
प्रत्येक भारतीय बँक खातेदाराला देण्यात येणऱ्या एटीएम आणि डेबिट कार्डांसाठी वार्षिक सेवा शुल्क आकारते. स्टेट बँक ऑफ इंडिया कार्डाच्या श्रेणीनुसार 147.5, 206.5 व 295 असे शुल्क ग्राहकांच्या खात्यातून कापले आहे. युवा, गोल्ड, माय डेबिट किंवा एटीएम कार्ड असलेल्या स्टेट बँकेच्या ग्राहकांना कार्ड सेवा शुल्क भरावा लागला आहे. बँकेने कुठलीही पूर्वसूचना न देता ही कपात केली आहे.
तुम्ही युवा डेबिट कार्ड, गोल्ड डेबिट कार्ड, कॉम्बो डेबिट कार्ड किंवा मायकार्ड डेबिट किंवा एटीएम कार्ड व्यतिरिक्त इतर कोणतेही डेबिट किंवा एटीएम कार्ड वापरल्यास, एसबीआय तुमच्याकडून वार्षिक देखभाल शुल्क म्हणून 175 रुपये आकारते. तसेच, यावर 18% अतिरिक्त जीएसटी भरावा लागतो. हा जीएसटी रु. 175 च्या 18% म्हणजेच रु. 31.5 असेल, तुम्हाला एकूण 175 रुये जीएसटी 31.5 रुपये धरून 206.5 रुपये द्यावे लागतील.
देशाच्या अनेक दशकांच्या इतिहासात, स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी बँक असून देशभरात बँकेचे 46.77 कोटी ग्राहक आहेत SBI बँक 22,266 शाखा, 68,016 व्यवसाय पत्र व्यवहार आणि 65,000 हून अधिक एटीएमद्वारे ग्राहकांना सेवा देत आहे.
क्रेडिट कार्डवर देखील बँक आकारेल शुल्क
SBI क्रेडिट कार्डसाठी देखील आता आता अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. या कार्डसाठी अर्ज करतांना तुम्हाला छुप्या शुल्काबद्दल माहिती असणे गरजेचे असते.नियमांनुसार, SBI बँकेने ग्राहकांना अर्जाच्या वेळी शुल्क आणि शुल्कासंबंधी माहिती प्रदान देणे आवश्यक आहे. क्रेडीट कार्डसाठी हे नवीन शुल्क 17 मार्च, 2023 पासून आकारले जाणार आहे. SBI क्रेडीटकार्डच्या ग्राहकांना जारी करण्यात आलेल्या एसएमएस आणि ईमेलमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की जे ग्राहक क्रेडिट कार्ड वापरून त्यांचे भाडे भरत आहेत त्यांना आता 199 अधिक GSTअसा कर आकारला जाईल.