Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Good Credit Score: कर्ज देण्यासाठी बँकांची लागेल रांग; 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर ठेवण्यासाठी 'हे' कराच!

Good Credit Score

जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर बँका कर्ज देण्यासाठी लगेच तयार होतात. मात्र, जर क्रेडिट स्कोअर खराब असेल तर कर्ज, क्रेडिट कार्ड मिळण्यात अडचणी येतात. 750 पेक्षा जास्त स्कोअर चांगला समजला जातो. यापेक्षा जर तुमचा स्कोअर कमी असेल तर काही सोप्या पर्यायांनी तुम्ही क्रेडिट स्कोअर वाढवू शकता.

Good Credit Score: तुमचा क्रेडिट स्कोअर तुमची आर्थिक स्थिती दर्शवत असतो. बँक किंवा कोणतीही संस्था तुम्हाला कर्ज देणार की नाही हे तुमच्या क्रेडिट स्कोअरवर ठरत असते. सर्वसामान्यपणे 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असेल तर तुमची पत चांगली समजली जाते. म्हणजेच बँक तुमच्यावर विश्वास ठेवण्यास तयार होते. आर्थिक व्यवहार तुम्ही चोखपणे पार पाडता. कर्जाचे हप्ते, क्रेडिट कार्ड बिल्स वेळेवर चुकता असा अर्थ बँक काढते. मात्र, जर 750 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. या लेखात पाहूया चांगला क्रेडिट स्कोअर राखण्यासाठी तुम्ही काय करू शकता.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, क्रेडिट स्कोअर 650 ते 700 दरम्यान, असेल तर काही चुकीचे नाही. (How to improve credit score) याचा अर्थ असा की तुम्ही आर्थिक व्यवहार चोखपणे वेळेवर पार पाडता. मात्र, कर्ज घेण्याचे प्रमाण म्हणजेच क्रेडिट युटिलाइझेशन कमी असू शकते. जसे की क्रेडिट कार्डचा अत्यल्प वापर. मात्र, हा स्कोअर 750 पर्यंत नेण्यास तुम्हाला फक्त काही महिने लागू शकतात.

जर तुमचा क्रेडिट स्कोअर 750 च्या पुढे असेल तर बँक तुम्हाला सहज कर्ज देईल. मात्र, जर यापेक्षा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तुम्हाला जास्त व्याजदराने कर्ज मिळेल. (Impact of bad credit score) तसेच कर्ज न नाकारले जाण्याची शक्यताही जास्त असते. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळवण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात.

750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर कसा राखू शकता? (How to keep Good Credit Score)

चांगला क्रेडिट स्कोअर एका दिवसात तर नक्कीच मिळणार नाही. काही महिने तुम्हाला शिस्तीने आर्थिक व्यवहार करावे लागतील. वेळेवर बिल आणि कर्जाचे हप्ते भरावे लागतील. त्यासोबतच खालील काही गोष्टी करून तुम्ही क्रेडिट स्कोअर सुधारू शकता.

तुमचा क्रेडिट रिपोर्ट सुधारा

भारतामध्ये CIBIL, Experian, Equifax, or CRIF या चार क्रेडिट ब्युरो कंपन्या आहेत. यापैकी एका कंपनीकडून तुमचा क्रेडिट स्कोअर तपासून घ्या. या रिपोर्टमध्ये काही चुका असतील तर त्या दुरूस्त करून घ्या. अन्यथा तुम्ही आर्थिक व्यवहार चोखपणे करत राहिलात. मात्र, बँक खात्यांची, क्रेडिट कार्डची माहिती चुकीची असल्यामुळे तुमचा स्कोअर वाढणार नाही.

वेळेवर बिल पेमेंट करा

तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला किंवा खराब असण्यामध्ये पेमेंट हिस्ट्री हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे वेळेवर कर्जाचे हप्ते, क्रेडिट कार्ड बिल्स आणि शुल्क भरत जा. जर तारखा लक्षात राहत नसतील तर तुम्ही अॅटो पेमेंट मोडही ठेवू शकता. (Good Credit Score) ज्यामुळे तुम्हाला बिल पेमेंटची शेवटची तारीख लक्षात ठेवण्याची गरज नाही. कर्जाचे हप्ते चुकवू नका. याचा नकारात्मक परिणाम क्रेडिट स्कोअरवर होतो. जर हप्ते भरण्यास अडचणी येत असतील तर कर्जदार संस्थेशी विविध पर्यायांबाबत चर्चा करा. कर्जाचे हप्ते नव्याने पाडून घेता येतील. तसेच मुदतही वाढून मिळू शकते.

क्रेडिट वापराचे प्रमाण

जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर सर्सास करत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. (How to improve Credit Score) तुमच्या क्रेडिट लिमिटच्या 30% पेक्षा जास्त वापर करत असाल तर त्याचा क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे सहसा, क्रेडिट मर्यादेच्या फक्त 30% वापर ठेवा. उदा. जर तुमच्या क्रेडिट कार्डचे लिमिट 1 लाख रुपये असेल तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी वापर करा.

कर्जाचे विविध पर्याय वापरा

क्रेडिट कार्डचा वापर, वैयक्तिक कर्ज, गृहकर्ज यांसारख्या विविध पर्यायांचा वापर करा. फक्त एकाच पर्यायाचा वापर करत असाल तर क्रेडिट स्कोअर वाढणार नाही. मात्र, असे करताना एकाच वेळी भल्या मोठ्या रकमेच्या कर्जासाठी विविध ठिकाणी अर्ज करू नका, त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. (How to improve Credit Score) जेव्हा गरज असेल तेव्हाच कर्ज किंवा क्रेडिट कार्डसाठी अॅप्लाय करा. अल्प कालावधीत अनेक ठिकाणी अर्ज केल्यास स्कोअर खराब होऊ शकतो.

जुने क्रेडिट कार्ड खाती बंद करू नका

ज्या क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही मागील खूप वर्षांपासून व्यवहार करत आलेले असाल ती खाती बंद करू नका. त्याचा निगेटिव्ह परिणाम क्रेडिट स्कोअरवर होऊ शकतो. तुमची जुनी खाती कधीतरी वापरत असाल तरी अॅक्टिव्ह ठेवा.