Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

टेक-गॅजेट

Tim Cook India Visit : Apple CEO टीम कुक मुकेश अंबानी, एन. चंद्रशेखरन यांच्या भेटीला, आज मुंबई स्टोअरचं ओपनिंग

Apple CEO टीम कुक यांनी भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची अँटिलिया निवासस्थानी भेट घेतली. (Tim cook India visit) तसेच टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखन यांनाही टीम कूक भेटले. आज (मंगळवार) मुंबईतील बीकेसी येथे ॲपलच्या पहिल्या स्टोअरचे अनावरण होणार आहे. अॅपलचे हे भारतातील पहिले स्वत:च्या मालकीचे स्टोअर असणार आहे.

Read More

Tim Cook Visit in India: तब्बल 40% वेतन कपात तरीही Apple चे सीईओ टीम कुक घेतात शेकडो कोटींचे पॅकेज

Tim Cook Visit in India: टीम कुक मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांमध्ये अॅपल स्टोअरचा शुभारंभ करणार आहेत. टीम कुक हे ग्लोबल सीईओंमध्ये सर्वात जास्त पॅकेज घेणाऱ्या सीईओंपैकी एक आहे. अॅपलकडून टीम कुक यांच्या वेतनात 40% कपात केली. मात्र तरिही वर्ष 2023 मध्ये टीम कुक यांचे एकूण पॅकेज 398 कोटी 75 लाख 75 हजार रुपये (49 मिलियन डॉलर्स) इतके होते.

Read More

Apple India Store: अॅपल भारतीय मार्केट कसं काबीज करणार? CEO टीम कूक यांच्या भेटीचे संकेत काय सांगतात?

मुंबईतील बिकेसी येथे उद्या (18 एप्रिल) आणि दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला अॅपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहतील, अशी माहिती समोर येत आहे. भारतातील प्रिमियम गॅझेट बाजारपेठ काबीज करण्याचे नियोजन कंपनीने आखले आहे. सोबतच अॅपल निर्मिती प्रकल्पही उभे राहत आहेत. पुढील काही वर्षात अॅपलचा भारतातील प्रवास कसा असेल, जाणून घ्या.

Read More

IT Industry Lay-Off : यंदा आयटी कर्मचाऱ्यांची पगार वाढ होणार की नाही

IT Industry Lay-Off : गेल्या अनेक दिवसांपासून आयटी क्षेत्रात मंदीचे वारे सुरु आहेत. अनेक मोठ-मोठ्या आयटी कंपन्यांनी प्रचंड प्रमाणात कर्मचारी कपात केलेली आहे. या तिमाहीत देखील आयटी क्षेत्राची कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी दिसून आली. या सगळ्याचा या क्षेत्रातल्या नोकर भरतीवर नेमका काय परिणाम होईल, पाहूया...

Read More

Twitter Launches Monetization Feature : एलॉन मस्क यांचा नवीन प्लान, ट्विटरमुळे लोकांना मिळणार पार्ट टाईम रोजगार

Twitter Launches Monetization Feature Plan : ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी आता ट्विटर यूजर्स करिता नवीन प्लान आणला आहे. आता ट्विटरचे पेड यूजर्स 10,000 कैरेक्टर पर्यंत लिहु शकतील. याआधी केवळ 280 शब्दांची लिमिट होती. सोबतच ट्विटरने नवीन मोनेटाइजेशन फीचर देखील आणले आहे. याअंतर्गत यूजर्स त्यांच्या फॉलोअर्सना सबस्क्रिप्शन प्लान देऊ शकतात.

Read More

Apple Store Concept : ॲपल स्टोरची संकल्पना काय आहे, जगात कुठे आहेत अशी स्टोअर

Apple Store : टेक जायंट ॲपल भारतात आपलं पहिलं रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच ॲपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे.

Read More

Apple Store in Mumbai: तब्बल 22 टॉप ब्रॅंड्सला Apple Store च्या आसपास फिरकण्यास बंदी, काय आहे प्रकरण वाचा

Apple Store in Mumbai: मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास 22 ब्रँड्सला अॅपल स्टोअरच्या जवळपास नवीन स्टोअर सुरु करता येणार नाही. एका कायदेशीर करारानुसार हे सगळं घडणार आहे. एवढंच नाही तर स्टोअरच्या आसपास प्रतिस्पर्धी कंपन्या जाहिरातीचे फलक लावू शकणार नाहीत.जाणून घेऊयात कायद्यात अशा प्रकारची तरतूद आहे का?

Read More

Mobile Phone Export: जगभरातून 'मेड इन इंडिया' फोनला मागणी, निर्यातीत 100 टक्के वाढ

Mobile Phone Export: जगभरातून ‘मेड इन इंडिया’ फोन्सची मागणी वाढली. भारतातील मोबाईल निर्यात 11.12 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. तसेच ICEA ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 2021-22 मधील भारतातून आयफोनची निर्यात 45,000 कोटींवरून वाढून 2022-23 मध्ये दुप्पट 90,000 कोटी इतकी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Read More

Twitter Now Part Of Musk's X : यापुढे ट्विटर होणार मस्कच्या 'या' कंपनीत विलीन

Twitter : गेल्या अनेक महिन्यांपासुन चर्चेत असलेल्या ट्विटरने आपल्या यूजर्सला आणखी एक धक्का दिला आहे. ट्विटर हे एलन मस्कच्या एक्स कॉर्प (X Corp)नावाच्या अॅप मध्ये विलिन केलं गेलं आहे. तर ट्विटरने देखील अमेरिकेतील न्यायालायात दाखल केलेल्या माहितीचा खुलासा करीत, ही माहिती अधिकृत असल्याचे सांगितले आहे.

Read More

YouTube New Features : युट्यूबवर व्हीडिओ पाहा ऑफलाईन असतानाही...

YouTube : यूट्यूबने नुकतेच 5 नवीन फिचर्स आणले आहेत. युट्यूबवर व्हीडिओ बघण्याचा तुमचा अनुभव त्यामुळे बदलून जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑफलाईन असतानाही तुम्ही आता व्हीडिओ पाहू शकणार आहात. कसं ते पाहा.

Read More

Google Pay Error: 'गुगल'ने केली चूक मात्र लाखो युजर्सला झाला धनलाभ! 'GPay'वर मिळाला 1000 डॉलर्सचा कॅशबॅक

Google Pay Error: गुगल पिक्सेल फोन किंवा गुगलपेवर ट्रान्झॅक्शन केल्यानंतर युजर्सला रिवार्ड म्हणून काही डॉलर्सचे कॅशबॅक मिळत असल्याचा अमेरिकेतील अनेक युजर्सने दावा केला होता. काहींना 16 ट्रान्झॅक्शननंतर तर काहींना 10 ट्रान्झॅक्शननंतर गुगलकडून अचानक कॅशबॅक मिळाला.

Read More