Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crop Insurance App : घरबसल्या मोबाईलवर करता येणार पीक विम्यासाठी अर्ज; जाणून घ्या प्रोसेस

Crop Insurance App : घरबसल्या मोबाईलवर करता येणार पीक विम्यासाठी अर्ज; जाणून घ्या प्रोसेस

Image Source : www.play.google.com

पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना मोबाईलवरून नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक पीक विमा हे मोबाईल अॅप्लिकेशन देखील उपलब्ध करून दिले आहे. या crop Insurance App च्या माध्यमातून पीक विमा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या पिकांची नोंदणी करणे सोपे होणार आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय जोखमीचा झाला आहे. त्यामुळे पीक विम्याच्या माध्यमातून शेतकरी होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीपासून संरक्षण घेऊ शकतो. यासाठी सरकारकडून खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनाही राबवण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने तर यंदापासून 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली आहे. याचा शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होणार आहे. दरम्यान, पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना विमा अर्ज भरणे आवश्यक आहे. तो अर्ज तुम्हाला घरबसल्या मोबाईलवरूनही भरता येणार आहे. तो कसा भरायचा त्यासाठीची प्रक्रिया काय आहे? याबाबतती माहिती जाणून घेऊयात..

पीक विमा मोबाईल ॲप

शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान झाल्यास त्यांना विम्याच्या माध्यमातून भरपाई मिळावी म्हणून केंद्र सरकारने Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) सुरू केली. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामासाठी आपला अर्ज सादर करू शकतात यासाठी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या https://pmfby.gov.in/ या संकेतस्थळावर किंवा पीक विमा ॲप (crop Insurance App) च्या माध्यमातून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. रब्बी हंगामातील पिकांसाठी पीक विम्याची नोंदणी करण्यासाठी 30 नोव्हेंबपर्यंतची मूदत आहे. आता या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना मोबाईलवरून नोंदणी करण्यासाठी केंद्र सरकारने एक पीक विमा हे मोबाईल अॅप्लिकेशन देखील उपलब्ध करून दिले आहे. या crop Insurance App च्या माध्यमातून पीक विमा नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही पायऱ्यांचे अनुसरण करावे लागेल. ज्यामुळे तुम्हाला घर बसल्या पिकांची नोंदणी करणे सोपे होणार आहे.

मोबाईलवरील पीक विमा अॅपच्या माध्यमातून पीक विमा नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील काही स्टेप पूर्ण करायच्या आहेत.

सर्वप्रथम शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअरवरून Crop Insurance App डाऊनलोड करावे 

  • त्यानंतर तुम्हाला शेतकरी म्हणून रजिस्ट्रेशन करावे लागेल
  • त्यानंतर तुम्हाला पीक विमा योजनेसाठी अर्ज केला आहे किंवा याची माहिती विचारली जाईल
  • त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव आणि मोबाईल क्रमांक टाकून रजिस्ट्रेशन करावे लागेल
  • यामध्ये तुम्हाला तुमचा पासवर्ड तयार करायचा आहे.
  • मोबाईल क्रमांक हा तुमचा युजर नेम राहिल आणि तुमचा पासवर्ड तुम्ही लक्षात ठेवा
  • त्यानंतर लॉगिन फॉर पॉलिसीवर क्लिक करा
  • त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड, कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा
  • त्यानंतर पीक विमा योजनेसाठी अर्ज ओपन होईल, यामध्ये तुम्ही आधारकार्ड, बँक पासबूक आणि इतर आवश्यक माहिती भरावी
  • यामध्ये तुम्हाला गाव, जिल्हा, राज्य, पीन कोड, ओळखपत्र क्रमांक टाकून व्हेरीफाय पर्यायावर क्लिक करा
  • आधारकार्ड क्रमांक टाकून तुमचे नाव पडताळून घ्या, त्यानंतर तुमचे लॉगिन यशस्वी होईल.

पीक विमा भरण्यासाठी ची प्रक्रिया

  •  तुम्हाला न्यू इन्शुरन्स पर्यायावर क्लिक करायची आहे
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील भरायचा आहे. IFSC , बँक खाते क्रमांक टाकायचा आहे
  • पुढे तुम्हाला पुढे या पर्यायवर क्लिक करा
  • त्यानंतर तुम्हाला ज्या पिकासाठी विमा अर्ज करायचा आहे. त्याची माहिती भरा
  • यामध्ये राज्य पीक विमा योजना, पिकांचा हंगाम याबाबतची माहिती भरायची आहे
  • पुढे तुम्हाला शेती आणि पिकाची माहिती द्यायची आहे
  • तुमच्या क्षेत्रफळाची माहिती, महसूल मंडळाची माहिती द्यावी
  • पीक पद्धतीची माहिती द्यावी एक पीक , बहु पीक याची माहिती द्यावी
  • पीक विम्याचा रेशो तुम्हाला (एकूण लागवडीखालील क्षेत्रफळाची माहिती तुम्हाला द्यायची आहे)
  • त्यानंतर तुम्हाला पेरणीची तारीख टाकायची आहे.
  • त्यानंतर पीक हंगाम (रब्बी / खरीप), वर्ष, योजनेचे नाव, तुमच्या राज्याचे नाव, जिल्हा आणि पीक इ माहिती द्यावी.

अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातून घरबसल्या तुमच्या पीकाचा विमा काढू शकणार आहात. या पीक विमा अॅपच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देखील पीक विमा कंपनीला देऊ शकता. मात्र तुम्हाला पिकाचे नुकसान झाल्यानंतर 72 तासांच्या आत याबाबतची माहिती पीक विमा कंपनीला देणे आवश्यक आहे.