Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Laptop Buying Guide: दिवाळीच्या निमित्ताने लॅपटॉप खरेदी करताना ‘या’ टिप्स फॉलो केल्यास नक्कीच होईल फायदा

Laptop, Laptop Buying Guide, Diwali,

Image Source : https://www.freepik.com/

दिवाळीच्या निमित्ताने नवीन लॅपटॉपवर बंपर डिस्काउंट मिळते. तुम्ही देखील नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या टिप्स नक्कीच उपयोगी येतील.

सणांच्या काळात नवीन गाडी, लॅपटॉप, मोबाइल खरेदी करण्याची चांगली संधी असते. या दिवसांमध्ये अनेक ऑनलाइन शॉपिंग साइट्सवर सेलचे आयोजन केले जाते. ज्यामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे फायद्याचे ठरते. तुम्ही जर यंदाच्या दिवाळीत नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे गरजेचे आहे. बाजारात अनेक कंपन्यांचे असंख्य लॅपटॉप उपलब्ध असल्याने नक्की कोणत्या लॅपटॉपची निवड करावी लक्षात येत नाही. अशावेळी लॅपटॉप खरेदी करताना या टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी येतील. 

लॅपटॉप खरेदी करताना या गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

तुमचे बजेट ठरवानवीन लॅपटॉप खरेदी करण्याआधी तुमचे बजेट ठरवणे गरजेचे आहे. बाजारात अगदी 20 हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत किंमतीचे लॅपटॉप्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या बजेटनुसार लॅपटॉपची कंपनी व स्पेसिफिकेशन्स ठरवू शकता. याशिवाय, तुम्हाला कमी किंमतीत चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह येणारा लॅपटॉप हवा असल्यास सेकंड हँड डिव्हाइसचा देखील विचार करू शकता. अगदी 1-2 वर्ष वापरलेले अनेक चांगले लॅपटॉप देखील बाजारात मिळतात.
तुमची गरज लक्षात घ्यातुम्ही नक्की कोणत्या कामासाठी लॅपटॉपचा वापर करणार आहात, त्यानुसार योग्य डिव्हाइसची निवड करणे सोपे जाते. तुम्हाला जर केवळ ऑफिस अथवा कॉलेजच्या कामासाठी डिव्हाइसची गरज असल्यास, बेसिक स्पेसिफिकेशन्सह येणारा स्वस्त लॅपटॉप खरेदी करू शकता. मात्र, गेमिंग अथवा व्हीडिओ एडिटिंग सारख्या कामासाठी लॅपटॉप हवा असल्यास तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. 
डिस्प्ले

डिस्प्ले हा लॅपटॉपचा महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे लॅपटॉप खरेदी करताना योग्य स्क्रिन साइजचा खरेदी करावा, अन्यथा नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. तुम्हाला जर लॅपटॉपसह वारंवार प्रवास करावा लागत असल्यास कमी आकाराच्या स्क्रिनचा लॅपटॉप खरेदी करू शकता. मात्र, ग्राफिक्स अथवा प्रोग्रामिंगशी संबंधित कामे करावी लागत असल्यास मोठ्या स्क्रिनचा लॅपटॉप फायदेशीर ठरतो.

बाजारात 13 ते 17 इंच स्क्रीनसह येणारे लॅपटॉप उपलब्ध आहेत. याशिवाय, फुल एचडी, क्वाड एचडी, 4के अल्ट्रा एचडी या स्क्रीन रिझॉल्यूशन येणारे लॅपटॉप देखील बाजारात आहेत. तुम्ही जर गेमिंगसाठी डिव्हाइस वापरणार असाल तर 120 हर्ट्ज अथवा 144 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणार लॅपटॉप चांगला ठरेल.

ऑपरेटिंग सिस्टमतुम्ही लॅपटॉपमध्ये कोणते सॉफ्टवेअर वापरणार आहात, त्यानुसार ऑपरेटिंग सिस्टमची निवड करू शकता. बाजारात प्रामुख्याने macOS, Chrome OS, Windows आणि Linux ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणारे लॅपटॉप उपलब्ध असतात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार याची निवड करू शकता. 
प्रोसेसरतुम्ही कोणत्या कामासाठी लॅपटॉप खरेदी करत आहात, त्यानुसार प्रोसेसरची निवड करता येते. सर्वसाधारणपणे कमी बजेटमध्ये Intel Core i5 10th-generation प्रोसेसरसह येणारे लॅपटॉप नियमित कामासाठी पुरेसे ठरतात. मात्र, तुमचे बजेट थोडे जास्त असल्यास Intel Core i9 अथवा AMD Ryzen 7 या हाय-परफॉर्मेंस प्रोसेसरसह येणारे लॅटॉप देखील खरेदी करू शकता.
रॅम आणि स्टोरेज 

तुमचा सर्व डेटा लॅपटॉपमध्ये स्टोर होणार हार्ड ड्राइव्ह महत्त्वाची ठरते. बाजारात एसएसडी (Solid State Drives) आणि एचडीडीसह (Hard Disk Drives) येणारे लॅपटॉप उपलब्ध आहेत. एसएसडीसह येणारे लॅपटॉप खरेदी करणे कधीही फायदेशीर ठरते. तसेच, स्टोरेज क्षमता कमीत कमी 256जीबी असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार 512 जीबी ते 1 टीबी स्टोरेजसह येणारा लॅपटॉप खरेदी करू शकता, मात्र यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. 

याशिवाय, 4 जीबी ते 8 जीबी रॅमसह येणाऱ्या लॅपटॉपवर तुम्ही छोटी-मोठी कामे सहज करू शकता. मात्र गेमिंग, प्रोग्रामिंग अथवा व्हीडिओ एडिटिंगचे काम करत असाल तर कमीत कमी 16 जीबी ते 32 जीबी रॅम असणे गरजेचे आहे.

लॅपटॉपचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहालॅपटॉप खरेदी करताना त्याची बॅटरी लाईफ, त्यावर मिळणारी वॉरंटी या गोष्टी देखील जाणून घेतल्यास नक्कीच फायदा होईल. याशिवाय, USB-C, USB-A, HDMI आणि  मायक्रोफोन जॅक सारखे पोर्ट दिले आहेत का ते तपासा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे केवळ कंपनीच्या नावावर व डिस्काउंट ऑफरचा विचार न करता स्पेसिफिकेशनुसार इतर ब्रँडच्या लॅपटॉपशी देखील तुलना करा. ग्राहकांचे रिव्ह्यू वाचा. लॅपटॉप खरेदी केल्यास कंपनी त्यासोबत बॅग्स, माउस सारखी आवश्यक अॅक्सेसरीज देते का ते पाहा.