गेल्या कित्येक दिवसांपासून भारतातील सॅमसंगचे चाहते Samsung Galaxy A05s ची वाट बघत होते. आता मात्र या स्मार्टफोनची प्रतीक्षा संपली आहे. सॅमसंग आपल्या A सीरीज अंतर्गत Samsung Galaxy A05s हा फोन भारतीय वापरकर्त्यांसाठी लॉन्च करणार आहे.
भारतात हा स्मार्टफोन लॉन्च करण्यापूर्वी सॅमसंगने मलेशियन बाजारपेठेत हा स्मार्टफोन सादर केला होता. तिथे या स्मार्टफोनला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून ग्राहकांनी प्रिबुकिंग करून हा मोबाईल फोन खरेदी केलाय. आता भारतातील ग्राहकसंख्या आणि देशातील स्मार्टफोनचे मार्केट लक्षात घेता कंपनीने भारतात हा स्मार्टफोन विक्रीसाठी आणण्याचे जाहीर केले आहे.
सणासुदीच्या काळात होणार लॉन्च
सॅमसंगने मार्केट रिसर्च करत हा स्मार्टफोन भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. दसरा, दिवाळी हे महत्वाचे सण लक्षात घेऊन उद्या 17 ऑक्टोबरपासून या स्मार्टफोनची विक्री केली जाणार आहे.
सणासुदीच्या निमित्ताने नवीन वस्तू खरेदी करण्याची भारतीय परंपरा आहे. या निमित्ताने बाजारपेठांमध्ये कोट्यावधींची उलाढाल होत असते. हेच कारण लक्षात घेत कंपनीने स्मार्टफोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतल्याचे जाणकार सांगतात. चला तर मग या फोनची किंमती आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती घेऊयात.
परवडणाऱ्या दरात मिळेल Samsung Galaxy A05s
सॅमसंग हा A सीरीज स्मार्टफोन ग्राहकांसाठी बजेट फ्रेंडली किमतीत विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आजच्या तरुणाईच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन या स्मार्टफोनचे डिझाईन बनवण्यात आले आहे. या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारपेठेत सुमारे 12,999 रुपये निश्चित केली जाऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. नेमकी किंमत ही उद्याच जाहीर केली जाणार असली तरी, हा स्मार्टफोन 13 हजारांच्या आताच ग्राहकांना खरेदी करता येईल असे जाणकारांचे म्हणणे आहे.
काय आहेत फीचर्स?
Samsung Galaxy A05s हा मोबाईल वापरताना ग्राहकांना स्वस्तात मस्त स्मार्टफोनचा अनुभव घेता येणार आहे. युजर्सला 6.7 इंच फुल एचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला जाणार आहे. या डिस्प्लचा रिफ्रेश रेट 90Hz असणार आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच 6GB रॅमसह 128GB स्टोरेज देण्यात येईल तसेच 12GB पर्यंत रॅम वाढवण्याचा पर्यायही दिला जाणार आहे. याशिवाय फास्ट चार्जिंगची सुविधा देखील ग्राहकांना मिळणार असून 25W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी ग्राहकांना दिली जाणार आहे.
याशिवाय हा स्मार्टफोन वापरून उच्च गुणवत्तेचे व्हिडियो युजर्सला रेकॉर्ड करता येणार आहेत. amsung Galaxy A05s मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप करण्यात आला असून स्मार्टफोनचा प्रायमरी कॅमेरा हा 50MP असून यासोबत 2MP डेप्थ सेन्सर आणि 2MP मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 13MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. व्हिडियो आणि फोटोग्राफीचा उत्तम अनुभव युजर्सला घेता येणार आहे.